शहरं
Join us  
Trending Stories
1
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
2
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
3
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
4
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
5
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
6
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
7
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
8
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
9
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
10
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
11
Maharashtra Weather: उष्णतेच्या तडाख्यातून दिलासा मिळणार, चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! पुढील चार दिवस कसे असेल हवामान?
12
"दादा वाचव, हे मला मारतील!" बहिणीची शेवटची हाक अन् बरेलीत लव्ह मॅरेजचा रक्तरंजित शेवट!
13
IPL 2026: रोहित शर्मा अखेर 'मुंबई इंडियन्स' सोडणार? एका व्हायरल पोस्टमुळे चर्चांना उधाण
14
आंबा पाहताच तोंडाला पाणी सुटतं, पण जरा थांबा; जास्त खाल्ल्याने शरीरात उष्णता वाढते, कारण...
15
इराणचा शांततेचा हात, ट्रम्प यांचा लाथ मारण्याचा इशारा! "चुकीचं वागलात तर याद राखा..."
16
नेपाळमध्ये 'बालेन' स्टाईल दणका! एका क्षणात १५०० सरकारी अधिकाऱ्यांना बसवलं घरी; नव्या सरकारचा मोठा निर्णय
17
मिस्ट्री स्पिनर सुनील नरेनचा ऐतिहासिक पराक्रम! IPL मध्ये २०० विकेट्स घेणारा पहिला परदेशी गोलंदाज
18
IPL मधील पहिला भारतीय शतकवीर! KKR कडून संधी मिळताच पठ्ठ्याची रोहित-विराटच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
19
Sara Tendulkar : "कसं वागावं, कोणते कपडे घालावे?"; सारा तेंडुलकरने केला सचिनच्या 'कडक' शिस्तीबाबत खुलासा
20
...तर नसरापूरच्या नराधमाला १५ ते २१ दिवसांत फाशीची शिक्षा झाली असती- राज्याचे माजी गृहमंत्री
Daily Top 2Weekly Top 5

वाहनधारकांचा ‘पीयूसी’ तपासणीला खो

By admin | Updated: December 16, 2015 23:30 IST

परभणी : शहरातील दुचाकी, तीन चाकी आॅटो व ट्रक, बसेससारख्या वाहनातून प्रदूषण मोठ्या प्रमाणावर होत आहे. वाहनातून होणाऱ्या धुराच्या प्रदूषणाच्या तपासणीकडे वाहनधारक दुर्लक्ष करीत आहेत.

परभणी : शहरातील दुचाकी, तीन चाकी आॅटो व ट्रक, बसेससारख्या वाहनातून प्रदूषण मोठ्या प्रमाणावर होत आहे. वाहनातून होणाऱ्या धुराच्या प्रदूषणाच्या तपासणीकडे वाहनधारक दुर्लक्ष करीत आहेत. कागदोपत्री पीयूसी प्रमाणपत्र जोडून आपली कामे करून घेण्याचा सपाटा सध्या वाहनधारकांनी लावला आहे. परभणी येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे दोन अधिकृत पीयूसी केंद्रांची नोंद आहे़ प्रत्येक वाहनधारकाने दर सहा महिन्यांतून एकदा त्यांच्याकडील वाहनाची पीयूसी तपासणी करून घेणे बंधनकारक आहे़. असे असले तरी शहरातील वाहनधारक पीयूसीची तपासणी करीत नाहीत़ यात जुने आॅटो, ट्रक, टेम्पो, ट्रॅक्टर व जड वाहने, बसेसच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर वायू प्रदूषण होत आहे. काही वाहनधारक आपल्या वाहनात रॉकेलचा वापर करतात़ त्यामुळे या प्रदूषणात वाढ होते़ उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे नोंदणी असलेल्या सर्व वाहनधारकांनी दर सहा महिन्यातून एकदा ही तपासणी करणे आवश्यक असते़ असे न केल्यास त्या वाहनांवर दंडात्मक कारवाईचा बडगा उचलला जातो़ बहुतांश वाहनांमधून घातक काळा धूर बाहेर पडतो़ या धुरामुळे श्वसनाचे विकार होण्याची शक्यता असते़ एसटी बसेसमधून उत्सर्जीत होणाऱ्या हधुरामुळेही आरोग्याला धोका निर्माण होवू शकतो़ परंतु, परभणी जिल्ह्यात वाहनचालक पीयूसी तपासणीकडे कानाडोळा करीत असल्याचे आरटीओकडून सांगण्यात आले़