शहरं
Join us  
Trending Stories
1
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाने राहुल गांधींना सुनावले खडेबोल  
2
“सप्टेंबरमध्ये देशात मोठ्या राजकीय घडामोडी”; संजय राऊतांचे भाकित, म्हणाले, “RSS बैठकीत...”
3
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
4
पाणी पाकिस्तानची पाठ सोडेना! उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळेना, पावसाळ्यात महापूर
5
"२० वर्षांनी आम्ही भाऊ एकत्र येऊ शकतो, मग..."; मनसे मेळाव्यात राज ठाकरेंचा कार्यकर्त्यांना कानमंत्र
6
रेपो दराच्या बैठकीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात वाढ, तुमच्या शहरात २४ कॅरेट सोन्याचा भाव काय?
7
"माझ्या नादी लागू नका, पुराव्यासह फाईल्स उघडू..."; भाजपात प्रवेश करताच शिंदेसेनेच्या नेत्याला इशारा
8
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
9
रॉयल एनफिल्डने चीनचे रेअर अर्थ मटेरिअल टाळले! नवीन धातू वापरला, ऑटो कंपन्या चकीत झाल्या...
10
काहीही करा, ‘हम नही सुधरेंगे’; CM देवेंद्र फडणवीसांचा क्लास वाया, वादग्रस्त विधाने सुरूच!
11
AI घेणार तुमच्या नोकरीची जागा? गुंतवणूकदार विनोद खोसला यांचा इशारा, म्हणाले यातून वाचायचं असेल तर..
12
‘झुकेगा नही’! ट्रम्प यांची धमकी, पण सरकार ठाम; अमेरिकेला भारताचं स्वतंत्र धोरण का खुपतंय?
13
मराठी अभिनेत्याचं साउथ इंडस्ट्रीत काम करण्याचं होतं स्वप्न, लॉकडाऊननंतर हैदराबाद गाठलं अन्...
14
चहा करताना 'ही' छोटीशी चूक कराल तर आयुष्याला मुकाल, योग्य पद्धत कोणती एकदा बघाच
15
ऑपरेशन महादेवमध्ये मारले गेलेले सगळे दहशतवादी पाकिस्तानीच! 'त्या' एका पुराव्याने समोर आली कुंडली
16
IND vs ENG: ३५ धावा की ४ गडी... पाचवी कसोटी निर्णायक वळणावर, 'हा' घटक भारतासाठी ठरेल 'गेमचेंजर'
17
ट्रम्प यांच्यासोबतची मैत्री तुटल्यानंतर मस्क मोठ्या अडचणीत; टेस्लाला द्यावे लागणार तब्बल २ हजार कोटी
18
ट्रम्पच्या जिगरी दोस्तावर पाकिस्तान का चिडला? पोस्ट लिहीत व्यक्त केला राग! शाहबाज शरीफ म्हणाले... 
19
"सचिन माझ्या मुलाचा बाप...", महिलेने दाखवला DNA रिपोर्ट; राजा रघुवंशीच्या घरात भलताच वाद
20
हृदयस्पर्शी! बाळासाठी वडील झाले वासुदेव, पुराच्या पाण्यातून काढली वाट, भावुक करणारा Video

२०१६ मध्ये झाले नुकसान; २०१८ मध्ये दिले अनुदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2018 14:13 IST

दोन वर्षांपूर्वी अतिवृष्टी व अवकाळी पावसामुळे पिकांचे आणि पुरामुळे झालेल्या नुकसानीच्या भरपाईसाठी शासनाने १९ जुलै रोजी अनुदान जाहीर केले.

ठळक मुद्दे. मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांसाठी ४९ कोटी रुपये मिळणार आहेत. 

औरंगाबाद : दोन वर्षांपूर्वी अतिवृष्टी व अवकाळी पावसामुळे पिकांचे आणि पुरामुळे झालेल्या नुकसानीच्या भरपाईसाठी शासनाने १९ जुलै रोजी राज्यभरासाठी ५१५ कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले आहे. मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांसाठी ४९ कोटी रुपये मिळणार आहेत. 

दोन वर्षांपूर्वी झालेल्या नुकसानीचा लाभ दोन वर्षांनी देण्याचे जाहीर होत असल्यामुळे शासन किती गतिमानतेने काम करीत आहे, याचा प्रत्यय येत आहे. महसूल व कृषी विभागाने केलेल्या संयुक्त पंचनाम्याच्या आधारे पिकांचे ३३ टक्के व त्यापेक्षा जास्त नुकसान झालेल्यांना ही मदत मिळणार आहे. ही रक्कम बँक खात्यावर जमा करण्यात  येणार असून त्यातून बँकेने खातेदारांच्या खात्यातून कोणतीही थकबाकी वसूल करू नये, अशा सूचना शासनाने विभागीय आयुक्तांना केल्या आहेत. 

औरंगाबादला फक्त ५१ लाखऔरंगाबाद जिल्ह्यातील २४८८ शेतकऱ्यांना ५१ लाख रुपयांची मदत जाहीर झाली आहे. सुमारे साडेतीन हजार रुपये प्रती हेक्टरी शेतकऱ्याच्या खात्यावर जाणे अपेक्षित आहे. पीक विमा नुकसानभरपाईच्या ५० टक्क्यांप्रमाणे ही मदत देण्याचे निश्चित करण्यात आले आहे. १६ व १७ सप्टेंबर २०१६ रोजी जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यात पावसामुळे सर्वाधिक नुकसान झाले होते. दोन वर्षांनंतर शासनाने तुटपुंजी का होईना शेतकऱ्यांना मदत जाहीर केली. 

मराठवाड्याला दिले ४९ कोटीमराठवाड्यातील आठ जिल्ह्यांसाठी शासनाने ४९ कोटी रुपये दिले आहेत. २१ लाख ५० हजार २८४ शेतकऱ्यांना ती मदत मिळणार आहे. यामध्ये औरंगाबादला ५१ लाख, परभणी ५० लाख, हिंगोली सव्वाकोटी, नांदेड २६ कोटी, बीड ६ कोटी तर लातूरला ५ कोटी, उस्मानाबादला ११ कोटी असे सुमारे ४९ कोटींच्या आसपासची रक्कम विभागाला मिळणार आहे. 

टॅग्स :State Governmentराज्य सरकारfundsनिधीFarmerशेतकरी