कमी किंमतीमध्ये सोने देण्याच्या आमिषाने महिलेस लुटले 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2018 18:07 IST2018-10-26T18:06:31+5:302018-10-26T18:07:09+5:30

कमी किंमतीत सोने देतो असे आमिष देत एका महिलेस मुरमा शिवारात सात जणांनी लुटल्याची घटना गुरुवारी सायंकाळी घडली.  

Looted woman by robbers | कमी किंमतीमध्ये सोने देण्याच्या आमिषाने महिलेस लुटले 

कमी किंमतीमध्ये सोने देण्याच्या आमिषाने महिलेस लुटले 

पाचोड (औरंगाबाद ) : कमी किंमतीत सोने देतो असे आमिष देत एका महिलेस मुरमा शिवारात सात जणांनी लुटल्याची घटना गुरुवारी सायंकाळी घडली.  पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतले असून अधिक तपास सुरु आहे. 

गुरुवारी सायंकाळी एका महिलेला दरोडेखोरांनी कमी किंमतीत सोने देण्याचे आमिष देत मुरमा शिवारात बोलावले. महिला येथे आली असता त्यांनी तिच्याकडून पैस्यांची पिशवी हिसकावली व तेथून पळ काढला. 

दरम्यान, या महिलेने पाचोड पोलिस ठाण्यात येऊन तक्रार नोंदवली. यानंतर पाचोड पोलीस व औरंगाबाद ग्रामीण गुन्हे शाखेच्या पथकाने संयुक्तपणे तपास करत अवघ्या काही तासांतच आरोपींना अटक केली. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत. 

Web Title: Looted woman by robbers