मोबाईल फॉरमॅट करणाऱ्यावर नजर

By Admin | Updated: August 25, 2014 01:39 IST2014-08-25T00:02:12+5:302014-08-25T01:39:29+5:30

बीड : येथील विद्यानगर पूर्व भागामध्ये दोघांना मोबाईल फॉरमॅट करुन त्यांचा आयएमइआय क्रमांक बदलत असताना रंगेहाथ पकडण्यात आले़

Look at the mobile format operator | मोबाईल फॉरमॅट करणाऱ्यावर नजर

मोबाईल फॉरमॅट करणाऱ्यावर नजर


बीड : येथील विद्यानगर पूर्व भागामध्ये दोघांना मोबाईल फॉरमॅट करुन त्यांचा आयएमइआय क्रमांक बदलत असताना रंगेहाथ पकडण्यात आले़ यानंतर पोलिसांनी जिल्ह्यात मोबाईल फॉरमॅट करणाऱ्या व्यावसायिकांच्या पाहणीची मोहीम हाती घेतली आहे़
जिल्ह्यात विविध ठिकाणी चोरीचे मोबाईल खरेदी करुन त्यांचा आयएमइआय क्रमांक बदलला जात असल्याची माहिती स्थानिक पोलिसांना मिळाली होती़ त्यानुसार दोघे ताब्यात घेतले आहेत़ विशेष म्हणजे ताब्यात घेतलेल्या संगणकावर एका नामांकित कंपनीचे सॉफ्टवेअर होते़ त्यामुळे त्यांना मोबाईल आयएमइआय क्रमांक बदलणे सहज शक्य झाले होते़
हे सॉफ्टवेअर जिल्ह्यात इतर ठिकाणी आहे काय ? कोणाला त्याचा पुरवठा केला आहे काय ? याची तपासणी मोहिमेद्वारे करण्यात येत आहे़ बहुतांश वेळा चोरीला गेलेले मोबाईल फॉरमॅट करणाऱ्या व्यक्तींकडे दिले जातात, अशी गुप्त माहिती पोलिसांना मिळालेली आहे़ त्यामुळे अशा प्रकारचा गोरख धंदा कोठे आणखी सुरु आहे काय ? याची पाहणी करण्यात येत आहे़ आयएमइआय क्रमांक बदलणे अतिशय गंभीर बाब असल्याने याकडे पोलिसांनी लक्ष दिले आहे़ त्यातूनच मोहीम सुरु करण्यात आली आहे़
चोरीच्या मोबाईलला नवीन आयएमइआय नंबर टाकल्यास तो नंबर ट्रेस करणे पोलिसांना अवघड बनते़ अशा मोबाईलचा वापर घातपातासाठी केला जाऊ शकतो याची शक्यता नाकारता येत नसल्याने याची पोलिस प्रशासनाने गंभीर दखल घेतली आहे़ त्यामुळे ज्या ठिकाणी मोबाईलची दुरुस्ती किंवा मोबाईल फॉरमॅट केले जातात त्या दुकानाची गरज पडल्यास पाहणी करण्यात येत आहे़ मोबाईलच्या दुकानामध्ये कोणकोणत्या प्रकारचे सॉफ्टवेअर वापरले जात आहेत याचीही पाहणी करण्यात येत आहे़ बीड येथून पकडलेल्या दोघांची चौकशी करण्यात आली असून त्यांच्याद्वारे इतर गुन्हे समोर येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे़ (प्रतिनिधी)
स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी पकडले होते दोघांना
४ताब्यात घेतलेल्या संगणकामधून स्पेशल सॉफ्टवेअर असल्याचे आले समोऱ
४याची दखल घेत मोबाईल फॉरमॅट करणाऱ्यांची तपासणी सुरु
४चोरीचे मोबाईल आणून बदलला जायचा आयएमइआय क्रमांक
४आयएमइआय बदलेल्या मोबाईलचा होऊ शकतो घातपातासाठी वापर
४स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांकडून दुकानाची
तपासणी सुरु

Web Title: Look at the mobile format operator

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.