प्रा. लोंढे हत्याकांड: रीलस्टार विशालला हातकड्यांत गावात मिरवले; कार जप्त, घराची झाडाझडती

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2026 12:25 IST2026-03-19T12:24:13+5:302026-03-19T12:25:28+5:30

प्रा. लोंढे हत्याकांड : हत्येनंतर संशय टाळण्यासाठी ‘सर, परत या’ असा संदेश पाठवून मोबाइलची विल्हेवाट लावली

Londhe Murder Case: Reel-star Vishal Rathod Paraded in Handcuffs; 4-Hour House Search Conducted, Car Seized | प्रा. लोंढे हत्याकांड: रीलस्टार विशालला हातकड्यांत गावात मिरवले; कार जप्त, घराची झाडाझडती

प्रा. लोंढे हत्याकांड: रीलस्टार विशालला हातकड्यांत गावात मिरवले; कार जप्त, घराची झाडाझडती

 

छत्रपती संभाजीनगर : निवृत्त प्राध्यापक राजाराम लोंढे यांचा मुख्य मारेकरी विशाल राठोड याला सोबत घेऊन गुन्हे शाखेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळासह त्याच्या घराची तब्बल चार तास झाडाझडती घेतली. शिवाय, हत्येत वापरलेली कारही जप्त केली.

विशाल राठाेड व त्याचा मेव्हणा आकाश विनोद पवार यांना लोंढे यांच्या हत्येसाठी १४ मार्च रोजी अटक करण्यात आली. त्यांच्या पहिल्या पोलिस कोठडीचा कालावधी संपल्याने मंगळवारी पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले. यात विशालच्या पोलिस कोठडीत २२ मार्चपर्यंत वाढ होऊन आकाशची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली. बुधवारी विशालच्या संपर्कातील सहा जणांची कसून चौकशी करण्यात आली. त्यांनाही नोटिसा बजावून चौकशीसाठी बोलावल्यानंतर हजर राहण्याची सूचना करण्यात आली. लोंढे यांच्यासोबत आर्थिक व्यवहार असलेल्या तिघांचीदेखील पोलिस आयुक्तालयात चौकशी करण्यात आली.

चार तास झाडाझडती
बुधवारी दुपारपर्यंत विशालची चौकशी झाल्यानंतर गुन्हे शाखेचे सहायक पोलिस आयुक्त अशोक राजपूत, वरिष्ठ पोलिस निरीक्षक गजानन कल्याणकर यांनी विशालला सोबत घेऊन घटनास्थळाची पाहणी केली. शिवाय, चार तास त्याच्या घराची झाडाझडती घेण्यात आली. लोंढे यांच्या काही मौल्यवान वस्तूदेखील आरोपींनी घेतल्याचा दाट संशय पोलिसांना आहे. त्या अनुषंगाने तपास करण्यात आला. शिवाय, लाखोंच्या व्यवहाराचे काही कागदपत्रेही विशालने लपवल्याचा संशय पोलिसांना आहे. रात्री उशिरापर्यंत त्याच्या घराची तपासणी सुरू होती. विशेष म्हणजे, विशालचा भाऊ राजकीय पदाधिकारी असून त्याने ग्रामपंचायतीच्या उच्च पदावर काम केले आहे.

आडेला आज न्यायालयात हजर करणार
लोंढे यांच्या हत्येनंतर गावात मृतदेह घेऊन गेल्यानंतर करण विलास आडे हा विशाल, आकाशसाठी दारू घेऊन आला होता. त्याने मृतदेह पुरण्यासाठी अवजारेही आणली. आडेला रविवारी अटक करण्यात आली. गुरुवारी त्याच्या पोलिस कोठडीचा कालावधी संपत असल्याने त्याला न्यायालयात हजर करण्यात येईल.

सर, घरी परत या, सर्व काळजीत आहेत, मेसेज करून मोबाइल लंपास
चौकशीत विशाल पोलिसांना अपेक्षित सहकार्य करत नसल्याचे सांगण्यात येत आहे. चौकशीत तो प्रत्येक प्रश्नाचे उत्तर सुरुवातीला खोटे देतो. पुरावे दिल्यानंतर, उलटतपासणीनंतर खरे कबूल करतो. यामुळे तपासाला विलंब होत आहे. लोंढे यांचा मोबाइल पुण्याला नेऊन फोडल्याचे तो सुरुवातीपासून सांगत आहे. मात्र, पोलिसांचा त्याच्यावर विश्वास नाही. लोंढे यांच्या हत्येनंतर विशालने लोंढे यांचा मोबाइल स्वत:कडे घेतला. चार दिवसांनी स्वत:च त्यावर 'सर, घरी परत या, सर्व काळजी करत आहेत' असा मेसेज केला. त्यानंतर त्यांच्या मोबाइलची विल्हेवाट लावली. हा मोबाइल लंपास करताना स्वत:चा मोबाइल शहरातच ठेवला. मात्र, दुसऱ्या कोणाकडून त्याने मोबाइलची विल्हेवाट लावली की स्वत:चा मोबाइल शहरात ठेवून तो पुण्याला गेला, यासाठी स्वतंत्र पथक तपास करत आहे.

Web Title : प्रोफेसर लोंढे हत्याकांड: रीलस्टार विशाल की परेड; कार जब्त, घर की तलाशी

Web Summary : प्रोफेसर लोंढे की हत्या के मुख्य संदिग्ध विशाल राठौड़ की परेड कराई गई। पुलिस ने उसके घर की तलाशी ली, अपराध में इस्तेमाल कार जब्त की, और मामले से जुड़े कई लोगों से पूछताछ की। लापता कीमती सामान और वित्तीय दस्तावेजों की जांच जारी है।

Web Title : Professor Londhe Murder: Reeelstar Vishal Paraded; Car Seized, House Searched

Web Summary : Vishal Rathod, the main suspect in Professor Londhe's murder, was paraded. Police searched his house, seized the car used in the crime, and questioned several individuals linked to the case. Investigations continue into missing valuables and financial documents.