शहरं
Join us  
Trending Stories
1
“ममता दीदी अन् किशोरी पेडणेकर बहिणी, दोघींना खुर्चीचा मोह सुटत नाही”; कुणी केली खोचक टीका?
2
पश्चिम बंगाल, आसाम झाले, आता पुढचा नंबर कोणाचा? BJPचे टार्गेट सेट; काँग्रेसचे टेन्शन वाढणार?
3
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
4
“सेक्यूलर पक्ष भाजपाला रोखू शकत नाही, जनादेश स्वीकारा”; प. बंगाल निकालावर ओवेसी थेट बोलले
5
“ममतादीदी पडतील असे कधी वाटले नाही”; पश्चिम बंगाल निवडणूक निकालावर मनोज जरांगेंनाही शंका
6
ममता बॅनर्जींचा CMपद सोडण्यास नकार, आता भाजप सत्तास्थापना कशी करणार? हे आहेत २ पर्याय
7
कोणत्याही ट्रेनमध्ये सहजपणे लोअर बर्थ कसा मिळेल? IRCTCनेच सांगितली खास ट्रिक, तुम्ही वापरली का?
8
चौकट मोडली, T20 मध्ये छाप सोडली! केएल राहुल म्हणतो; "प्रत्येक वेळी मनासारखं घडत नाही, पण…"
9
टी-२० क्रिकेटमध्ये टीम इंडियाला तोड नाही; IPL दरम्यान ICC नं केली मोठी घोषणा
10
TMC ला गळती; मनोज तिवारींचा पक्षाला रामराम, ममतांवर केला ५ कोटी मागितल्याचा आरोप
11
इंडिगो विमानात पॉवर बँकचा स्फोट; विमानतळावर प्रवाशांची आपत्कालीन सुटका, एक महिला जखमी
12
Latest Marathi News LIVE: गोंदियात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी; शेतकरी चिंतेत
13
IPL 2026 : पलटवार करण्यासाठी DC नं खेळला हा डाव! मॅच विनरच्या कमबॅकसह CSK ची ताकद वाढली
14
पश्चिम बंगालमधील भाजपा विजयानंतर पाकची मोठी प्रतिक्रिया; थेट युद्धाची भाषा केली, म्हणाले...
15
Budget Travel: अवघ्या २० हजारांत अनुभवा केरळचं सौंदर्य; वायनाडला भेट देण्यापूर्वी हे नक्की वाचा!
16
IAS Ayush Goel : वडिलांनी चहा, भाजी विकून शिकवलं, लेकाने कष्टाचं सोनं केलं; २८ लाखांची नोकरी सोडली, झाला IAS
17
"माझ्या पोटात लाथ मारली, मतमोजणी केंद्रातून बाहेर फेकून दिलं"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
18
सावधान! एसीचा ब्लास्ट होण्यापूर्वी मिळतात 'हे' ६ संकेत; दुर्लक्ष केल्यास जिवावर बेतू शकतं, वेळीच व्हा सतर्क!
19
काँग्रेसचे बहुतांश विजयी उमेदवार मुस्लिम; ५ राज्यांमध्ये दिसला सारखाच ट्रेंड...
20
२७ कोटींच्या प्राइज टॅगवर कोच लँगर यांचं मोठं वक्तव्य; पंतच्या फ्लॉप शोमागचं कारणही सांगून टाकलं
Daily Top 2Weekly Top 5

तेलघणा शाळेला आठ दिवसांपासून कुलूप

By admin | Updated: June 23, 2014 23:50 IST

घाटनांदूर: आरटीई नुसार सर्वांना शिक्षण सक्तीचे करण्यात आले असले तरी त्यातील तरतुदी कठोर असतानाही तो कायदा धाब्यावर बसविण्याचा प्रकार घाटनांदूर आणि परिसरात होत आहे.

घाटनांदूर: आरटीई नुसार सर्वांना शिक्षण सक्तीचे करण्यात आले असले तरी त्यातील तरतुदी कठोर असतानाही तो कायदा धाब्यावर बसविण्याचा प्रकार घाटनांदूर आणि परिसरात होत आहे. शाळा सुरु होऊनही आठ दिवसांचा कालावधी उलटला असला तरी घाटनांदूरजवळील तेलघणा शाळेचे कुलूप अद्याप उघडलेले नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत.घाटनांदूर केंद्रांतर्गत असलेल्या तेलघणा येथील जि. प. शाळेत पहिली ते चौथीपर्यंतचे वर्ग आहेत. एस. एस. चव्हाण या एकट्या महिला कर्मचाऱ्यावर शाळेचा कारभार चालतो. या शाळेवर नियुक्त करण्यात आलेली दुसरी शिक्षिका चंद्रकला भारती या दोन वर्षापासून प्रतिनियुक्तीवर वेगवेगळ्या ठिकाणी जात आहेत. उन्हाळी सुट्टया संपल्यानंतर १६ जून रोजी शाळा सुरु होणे अपेक्षित होते. मात्र घाटनांदूर केंद्रांतर्गत येणाऱ्या तेलघना शाळेचे कुलूप अद्याप न उघडण्याचा प्रताप येथे दिसून येत आहे. एस. एस. चव्हाण या रजेवर असल्याने गट शिक्षणाधिकाऱ्यांनी तेलघना शाळेवर नियुक्त असलेल्या दुसऱ्या शिक्षिका चंद्रकला भारती यांना जा. क्र. २७५/१४ दि. १० जून २०१४ या आदेश पत्रान्वये जि. प. शाळेवर रुजू होण्याचे आदेश दिले होते. मात्र सदरील शिक्षिकेने गट शिक्षणाधिकाऱ्यांचे लेखी आदेश धाब्यावर बसवत शाळेकडे अद्यापही फिरकलेले नाहीत. शिक्षिकांच्या या गलथान कारभारामुळे विद्यार्थ्यांच्या ज्ञानाचा प्रश्न उपस्थित झाला आहे.भारती या २०१२-१३ मध्ये गट शिक्षणाधिकारी कार्यालय अंबाजोगाई येथे प्रतिनियुक्तीवर होत्या. १३-१४ या वर्षात अंबासाखर जि. प. केंदांतर्गत तहसील कार्यालय, अंबाजोगाई, रविवार पेठ केंद्र, अंबाजोगाई, मांडवा जि. प. शाळा आदी ठिकाणी प्रतिनियुक्तीवर कार्यरत होत्या. अंबाजोगाईचे तहसीलदार ९ जून रोजी कार्यमुक्त केले तर गट शिक्षणाधिकारी कार्यालयाने १० जूनच्या लेखी पत्रान्वये तेलघना जि. प. शाळेवर रुजू होण्याचे आदेश दिले. मात्र आदेश धाब्यावर बसवून सदरील शिक्षिका अद्याप शाळेकडे फिरकलीच नाही. शाळा सुरु होण्याअगोदर शिक्षकांनी शाळेत येऊन शाळेचा परिसर पाहणी करुन स्वच्छ करणे अपेक्षित असते. मात्र अद्यापही शाळेकडे शिक्षकच फिरकले नसल्याने ग्रामस्थांमधून संताप व्यक्त होत आहे.ग्रामस्थांच्या तक्रारीवरुन गट शिक्षणाधिकारी बावणे व केंद्रप्रमुख स्वामी यांनी शाळेला भेट देऊन तात्पुरता शिक्षक देण्याचा घाट घातला होता. मात्र बाबासाहेब सिरसाट यांच्यासह इतर शिक्षकांनी कायमस्वरुपी शिक्षक देण्याची मागणी केल्याने अद्यापही शाळेला कुलूपच आहे. गैरहजर शिक्षकांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.याबाबत शिक्षणाधिकारी देवगुडे यांनी सांगितले की, हा प्रकार भयंकर असून आरटीई अ‍ॅक्टनुसार प्रतिनियुक्ती देता येतच नाही. वेतन अदा करता येत नसल्याचे संबंधित शिक्षिकेवर कारवाई करण्याचे संकेत दिले.गट शिक्षणाधिकारी बावणे व केंद्रप्रमुख स्वामी म्हणाले की, शाळा न उघडणे हा गुन्हा असून संबंधित शिक्षिकेवर निलंबनाची कारवाई प्रस्तावित करणार आहोत. (वार्ताहर)