शहरं
Join us  
Trending Stories
1
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
2
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
3
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
4
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
5
२७ वर्षांपूर्वी दया नायक यांनी केलेल्या एन्काउंटरचा बदला घेतला; पुतण्याने 'त्या' खबऱ्याला शोधून संपवलं
6
रेकॉर्ड ब्रेकर KL राहुल! हिटमॅन रोहित, विराटला जमलं नाही ते या पठ्ठ्यानं करुन दाखवलं
7
क्रूरतेचा कळस! दात तोडले, डोकं फोडलं अन् शेवटी... ब्लॉक केल्याच्या रागातून २ मुलांच्या आईला संपवलं
8
बघून धक्का बसेल! कारमधून चक्क सहा जनावरांची तस्करी, अपघातामुळे फुटले बिंग; एका गायीचा मृत्यू
9
KL Rahul Fastest Century : १२ धावांवर कॅच सुटला! मग KL राहुलनं ठोकली विक्रमी सेंच्युरी
10
नीचभंग विपरीत धनयोग: ६ राशींना चांगले दिवस, नोकरीत यश-प्रगती; अडकलेले पैसे मिळतील, लाभ काळ!
11
“इतिहास, अध्यात्म, विकास अन् नारीशक्तीचा महासंगम!”; DCM एकनाथ शिंदे यांचे नवे विकास मॉडेल
12
बापरे! बेन स्टोक्सचा चेहरा सर्जरीनंतर पूर्णच बदलून गेला, पहिली झलक पाहताच फॅन्सना बसेल धक्का
13
भाजपा नेत्यांची धाकधूक वाढली! जोशी, केचेंना पुन्हा संधी की पोतदार, सोले, कोठेकर, भेंडे, तिवारी; विधान परिषदेवर कुणाला संधी?
14
सकाळी फ्रेश अन् दुपारी चेहरा निस्तेज, केसही खराब? ऑफिसमधील AC ठरतोय तुमच्या सौंदर्याचा शत्रू
15
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
16
जेवणाचा डबा द्यायला गेली अन् आगीत जळून खाक झाली... भंगाराच्या गोदामात मृत्यूचं तांडव! ४ जणांचा मृत्यू
17
इस्लामाबादमध्ये युद्धाचा फैसला! ट्रम्प यांचे दूत अन् इराणचे मंत्री आमनेसामने; जगात शांतता प्रस्थापित होणार?
18
"माझ्या कानाखाली मारण्याच्या मुद्द्यावरून हरभजनने १ कोटी कमावले"; श्रीसंतचा गंभीर आरोप
19
भोंदू मनोहर भोसलेचा मुक्काम वाढला; माढा न्यायालयाने सुनावली तीन दिवसाची पोलीस कोठडी
20
Rohit Pawar : "शिवछत्रपतींचा अवमान करणाऱ्या बागेश्वरवर महाराष्ट्रात बंदी घाला,अन्यथा..."; रोहित पवार आक्रमक
Daily Top 2Weekly Top 5

पीककर्जासाठी आमदारांसमक्ष ठोकले बँकेला कुलूप

By admin | Updated: July 9, 2015 00:23 IST

राजूर : शेतकऱ्यांचे पीक कर्ज वाटपासह पुनर्गठणाच्या कामात बँकेचे अधिकारी जाणीवपूर्वक शेतकऱ्यांची अडवणूक करीत असल्याच्या तक्रारीवरून

राजूर : शेतकऱ्यांचे पीक कर्ज वाटपासह पुनर्गठणाच्या कामात बँकेचे अधिकारी जाणीवपूर्वक शेतकऱ्यांची अडवणूक करीत असल्याच्या तक्रारीवरून आ. संतोष दानवे यांनी दि.८ रोजी राजूर येथील महाराष्ट्र ग्रामीण बॅक गाठून अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. आ. दानवेंचा रौद्रावतार पाहून अधिकाऱ्यांची भंबेरी उडाली होती. संतप्त शेतकरी व कार्यकर्त्यांनी आ. दानवेंच्या उपस्थितीत बँकेला कुलूप ठोकले.राजूर येथील महाराष्ट्र ग्रामीण बॅकेचे शाखाधिकारी ए.एस. कुलकर्णी हे शेतकऱ्यांचे पुनर्गठण व नवीन वीक कर्ज वाटपात शेतकऱ्यांची जाणीवपुर्वक अडवणुक करीत असल्याच्या तक्रारी मोठया प्रमाणात वाढल्या होत्या. तसेच ग्रामीण बॅक व बँक आॅफ इंडियाच्या शाखेत दलालांचा मोठा शिरकाव वाढल्याने सर्वसामान्य शेतकऱ्यांची कामे खोळंबली होती. दरम्यान, याबाबत शेतकऱ्यांनी आ. संतोष दानवे यांंच्याकडे तक्रारी केल्या होत्या. यावरून आज आ. दानवे यांनी ग्रामीण बॅक गाठून शाखाधिकाऱ्यांविषयी विचारणा केली असता, ते रजेवर असल्याचे सांगण्यात आले. यावेळी सहाय्यक शाखाधिकारी क्षीरसागर यांना शेतकऱ्यांची अडवणूक का करता, असा जाब विचारला. त्यांनी उडवाउडवाीची उत्तरे दिली तर कुलकर्णी यांनी आ. दानवे यांचा भ्रमणध्वनी घेण्यास नकार दिल्याने आ. दानवे संतापले होते. यावेळी आ. दानवे यांनी गेल्या तीन वर्षापासून शेतकरी दुष्काळाचा सामना करीत असून सलग चौथ्या वर्षी दुष्काळाचे सावट पसरलेले आहे. ही गंभीर समस्या लक्षात घेवून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बॅकाना शेतकऱ्यांना विनाविलंब पीक कर्ज वाटपाचे आदेश दिलेले आहे. असे असतांना अधिकारी मुद्दामहून शेतकऱ्यांना त्रास देत असल्याचे सांगीतले. आपण जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेवून शाखाधिकाऱ्याच्या कामचुकार पणाविषयी तक्रार करणार असल्याचे पत्रकारांना सांगीतले. यावेळी जि.प.सदस्य रामेश्वर सोनवणे, सरपंच रवींद्र शेळके, रतन ठोंबरे, भगवान नागवे, जगनराव पवार, राहूल दरक, गजानन नागवे, गणेशराव साबळे, गणेश पुंगळे, सदाशिव नागवे डिगांबर शेजूळ यांच्यासह शेतकरी, कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते. (वार्ताहर)