महिलेच्या सतर्कतेने वाचले विहिरीत पडलेल्या वन्यप्राण्यांचे प्राण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2018 17:13 IST2018-11-21T17:12:10+5:302018-11-21T17:13:09+5:30
सातारा वॉर्डातील विहिरीत तीन दिवसांपासून पडलेल्या एका कोल्ह्याचे प्राण महिलेच्या सतर्केतेमुळे वाचले.

महिलेच्या सतर्कतेने वाचले विहिरीत पडलेल्या वन्यप्राण्यांचे प्राण
औरंगाबाद : सातारा वॉर्डातील विहिरीत तीन दिवसांपासून पडलेल्या एका कोल्ह्याचे प्राण महिलेच्या सतर्केतेमुळे वाचले. महिलेने दिलेल्या माहितीवरून मनपा कर्मचाऱ्यांनी कोल्ह्यास बाहेर काढून त्यास जंगलात सोडले.
सुनीता घोडके यांना सातारा परिसरातील एका विहिरीत मागील तीन दिवसांपासून एक कोल्हा पडल्याचे निदर्शनास आले. याची माहिती त्यांनी नगरसेविका सायली जमादार यांना दिली. जमादार यांनी अग्निशमन दलास कळवले. यानंतर अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्याने विहिरीत उतरून कोल्हयास बाहेर काढले व जंगलात सोडून दिले.
यात मनपा कर्मचारी जवान मूनवर शेख, विनोद कदम, हरिभाऊ घुगे, वाहन चालक अशोक खोतकर, आप्पासाहेब गायकवाड, प्रसाद शिंदे, महेंद्र खोतकर, दिनेश मुंगसे, परमेश्वर साळुंके,ईसाक शेख, विजय कोथमिरे,जगदीश सलामबाद यांनी सहभाग घेतला.