शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावतीत अल्पवयीन मुलींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल; १९ वर्षीय अयान अहमदला पोलिसांनी केली अटक
2
PNB मध्ये ६० महिन्यांच्या FD मध्ये ₹२,००,००० जमा केले तर किती मिळेल व्याज? पाहा कॅलक्युलेशन
3
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
4
Noida Protest: हिंसक आंदोलनानंतर अखेर सरकारचा मोठा निर्णय; कामगारांना ३ हजारांची पगारवाढ
5
वैभवला शून्यावर बाद करण्याच्या १०० दिवस आधी, प्रफुल अन् पांड्या यांच्यात 'असं'च काही घडलं होतं
6
Mutual Fund मध्ये भरभरुन पैसे ओतताहेत लोक; ₹७० लाख कोटींच्या पार पोहोचलं AUM
7
Praful Hinge: प्रफुल हिंगेच्या यशाचं गुपित कळलं! वडील म्हणाले, "त्या दोन दिग्गज क्रिकेटपटूंनी माझ्या मुलाला घडवलं"
8
"शेवटचं बोलणंही होऊ शकलं नाही..."; जवळच्या मैत्रिणीच्या निधनानंतर गहिवरल्या मुमताज
9
३ व्रतांचा महासंयोग: प्रदोष-शिवरात्रि, स्वामी स्मरण दिन एकाच दिवशी; ३ उपाय करा, पुण्य मिळवा!
10
डोळ्यात मिरचीची पूड फेकली अन् ५ सेकंदात कोयत्याने केले सपासप वार; महिलेने युवकावर का केला हल्ला?
11
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
12
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याच कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
13
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
14
चैत्र प्रदोष शिवरात्रि योग २०२६: कसे कराल व्रत? ‘असे’ करा शिवपूजन, म्हणा ‘हे’ प्रभावी मंत्र
15
भाजप सोडून नेताजी बोस यांचे पणतू चंद्रकुमार तृणमूलमध्ये, म्हणाले, ‘मी आता चूक सुधारली’
16
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
17
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
18
बॉलिंग ॲक्शनवरुन वाद; वडिल अन् बहिणीची साथ! जाणून घ्या 'विदर्भ एक्स्प्रेस' Praful Hinge चा प्रवास
19
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
20
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
Daily Top 2Weekly Top 5

कर्ज पुनर्गठनाकडे शेतकऱ्यांची पाठ !

By admin | Updated: July 8, 2016 00:36 IST

उस्मानाबाद : दुष्काळी परिस्थितीमुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळावा यासाठी पीक कर्जाचे पुनर्गठन करून नवीन कर्ज वाटप करण्याचा निर्णय शासनाकडून घेण्यात आला होता.

उस्मानाबाद : दुष्काळी परिस्थितीमुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळावा यासाठी पीक कर्जाचे पुनर्गठन करून नवीन कर्ज वाटप करण्याचा निर्णय शासनाकडून घेण्यात आला होता. परंतु, जिल्ह्यात कर्ज पुनर्गठनास फारसा प्रतिसाद मिळत नसल्याचे प्राप्त आकडेवारीवरून समोर आले आहे. ३७ हजार शेतकरी पात्र असताना आजवर अवघ्या १ हजार ६८ शेतकऱ्यांनी कर्जाचे पुनर्गठन केले. पुनर्गठन करून शेतकऱ्यांच्या हाती काहीच पडत नसल्याची शेतकऱ्यांमध्ये भावना आहे.जिल्ह्यातील शेतकरी मागील दोन ते तीन वर्षांपासून दुष्काळी परिस्थितीचा सामना करीत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे अर्थकारण पूर्णत: कोलमडले आहे. अशा परिस्थितीत खरीप पेरणीसाठी पैसे आणायचे कोठून? असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर होता. हे संकट लक्षात घेऊन शासनाने जुन्या पीक कर्जाचे पुनर्गठन करण्याचा निर्णय घेऊन ही प्रक्रिया तातडीने राबविण्याचे निर्देश जिल्हा प्रशासन आणि सर्व बँकांना दिले होते. त्यानुसार जिल्हा मध्यवर्ती बँकेचे ११ हजार ३७, राष्ट्रीयकृत बँकेचे १५ हजार ९६६, खाजगी बँकेचे ३ हजार ८९९ आणि महाराष्ट्र ग्रामीण बँकेकडून कर्ज घेतलेले ६ हजार ४७४ असे एकूण ३७ हजार ३७६ शेतकरी कर्जाच्या पुनर्गठनासाठी पात्र होते. या सर्व शेतकऱ्यांकडे मिळून सुमारे २७ हजार २५४.७९ लाख रूपये एवढे पीक कर्ज आहे. परंतु, शासनाच्या या योजनेनुसार पुर्नगठन झाले तरी भरावी लागणारी वाढीव रक्कम व यादरम्यान मिळणाऱ्या नवीन वाढीव कर्जाची रक्कम अल्प असल्याने पुनर्गठनासाठी शेतकरी पुढे येत नाहीत. पुनर्गठन करूनही हाती काहीच पडत नाही. केवळ थकबाकीतील कर्ज चालू बाकीत येते, अशी भावना शेतकरी बोलून दाखवित आहेत. यामुळेच की काय पुनर्गठनाची प्रक्रिया अत्यंत धिम्या गतीने सुरू आहे. आजवर ३७ हजार ३७६ पैकी आजवर केवळ १ हजार ६८ शेतकऱ्यांच्या कर्जाच्या कर्जाचे पुनर्गठन झाले.सर्वाधिक सभासद संख्या असलेल्या जिल्हा मध्यवर्ती बँक सध्या चलन तुटवड्याचा सामना करीत आहे. त्यामुळे ११ हजार ३७ पैकी एकाही शेतकऱ्याच्या कर्जाचे पुनर्गठन होऊ शकले नाही. संबंधित शेतकऱ्यांकडे ३०७८.७९ लाख रूपये कर्ज आहे. राष्ट्रीयकृत बँकांचाही ‘परफॉर्मन्स’ फारसा समाधानकारक नाही. १५ हजार ९६६ पैकी केवळ १ हजार ६८ जणांच्या कर्जाचे पुनर्गठन केले. खाजगी बँकांची कामगिरी तर अत्यंत निराशाजनक आहे. ३ हजार ८९९ पैकी एकाही शेतकऱ्याच्या कर्जाचे पुनर्गठन केले नाही. या सर्व शेतकऱ्यांकडे सुमारे ३ हजार २०६ लक्ष रूपये कर्ज आहे. महाराष्ट्र ग्रामीण बँकेकडून कर्ज घेतलेल्यांपैकी ६ हजार ४७४ शेतकरी कर्जाच्या पुनर्गठनासाठी पात्र आहेत. यांच्याकडे ६ हजार ८१५ लाख रूपये कर्ज आहे. परंतु, आजवर एकाही शेतकऱ्याच्या कर्जाचे पुनर्गठन झालेले नाही, हे विशेष. (प्रतिनिधी)