शहरं
Join us  
Trending Stories
1
US-Iran Ceasefire: इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम
2
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
3
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
4
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
5
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
6
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
7
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
8
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
9
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
10
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
11
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
12
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
13
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
14
लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!
15
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
16
आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?
17
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
18
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
19
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
20
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
Daily Top 2Weekly Top 5

शौचालय जनजागृतीसाठी सीईओंकडून ‘धडे’!

By admin | Updated: December 28, 2014 01:15 IST

बीड : शौचालयाचे महत्त्व पटवून देण्यासाठी आता प्रशासन थेट घराघरात जाऊन जनजागृती करणार आहे़ त्यासाठी शनिवारी गटसमन्वयकांना प्रशिक्षण देण्यात आले. सीईओ नामदेव ननावरे यांनी स्वत: समन्वयकांना धडे दिले.

बीड : शौचालयाचे महत्त्व पटवून देण्यासाठी आता प्रशासन थेट घराघरात जाऊन जनजागृती करणार आहे़ त्यासाठी शनिवारी गटसमन्वयकांना प्रशिक्षण देण्यात आले. सीईओ नामदेव ननावरे यांनी स्वत: समन्वयकांना धडे दिले.जिल्ह्याला २०१५ १६ मध्ये ७४ हजार ३४६ इतकी शौचालये उभारण्याचे उद्दिष्ट्य आहे़ लक्ष्य गाठण्यासाठी पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग झपाट्याने कामाला लागला आहे़ युनिसेफने १५ साहित्यांचा समावेश असलेल्या बॅग जिल्ह्यातील गटसमन्वय, समूहसमन्वयक यांना उपलब्ध करुन दिल्या आहेत़ समन्वयांकाची संख्या ४० इतकी असून त्यांच्यामार्फत शौचलय नसलेल्या प्रत्येक कुटुंबापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न राहणार आहे. शनिवारी पाणी व स्वच्छता विभागाकडून आंतरव्यक्ती संवाद कार्यशाळा पार पडली. शौचालये उभारण्यासाठी गृहभेटी, गटचर्चा आदी कार्यक्रम आयोजित करायचे आहेत. त्यानुषंगाने ही कार्यशाळा घेण्यात आली. सीईओ ननावरे यांनी शौचालयाचे महत्त्व सामान्यांना पटवून देण्यासाठी नेमके कशा पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचायचे? इथपासून ते जनजागृती कशी करायची? इथपर्यंत इथ्यंभूत माहिती पटवून दिली. बोलक्या चित्रांच्या सहाय्याने मार्गदर्शन केले. शिवाय समन्वयकांच्या अडचणीही जाणून घेतल्या. यावेळी पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सी. एम. ढोकणे यांची प्रमुख उपस्थिती होती. तज्ज्ञ मार्गदर्शक, संवादतज्ज्ञ यांची उपस्थिती होती. (प्रतिनिधी)४शौचालय योजनेचा लाभ सामान्यांपर्यंत पोहोचण्यासाठी जनजागृतीवर भर दिला जाणार आहे. त्यासाठी समन्वयकांमार्फत घरोघर संदेश पोहोचविण्यात येईल. योजना यशस्वी करण्यासाठी कसोशीचे प्रयत्न असल्याचे पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सी. एम. ढोकणे यांनी सांगितले.