‘भाजप सरकार चले जाव’ आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2020 17:19 IST2020-10-08T17:19:03+5:302020-10-08T17:19:50+5:30

राष्ट्रवादी शहर जिल्हा अध्यक्ष विजय साळवे यांच्या नेतृत्वात गुरूवारी दुपारी गुलमंडी येथे  ‘भाजप सरकार चलेजाव’  आंदोलन  करण्यात आले.

‘Leave BJP government’ movement | ‘भाजप सरकार चले जाव’ आंदोलन

‘भाजप सरकार चले जाव’ आंदोलन

औरंगाबाद : राष्ट्रवादी शहर जिल्हा अध्यक्ष विजय साळवे यांच्या नेतृत्वात गुरूवारी दुपारी गुलमंडी येथे  ‘भाजप सरकार चलेजाव’  आंदोलन  करण्यात आले. या आंदोलनाला राष्ट्रवादीचे पदाधिकारी तसेच कार्यकर्ते यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने देशातील जनतेचा विश्‍वासघात केला असल्याने या केंद्र शासनाने सत्तेवर राहण्याचा हक्क पूर्णपणे गमावला असल्याचे विजयराव साळवे यांनी सांगितले. पुढे बोलताना ते म्हणाले की, समाजात अविश्‍वासाची भावना दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे. महिला तसेच गोरगरीबांवर रोज अत्याचार होत आहे. देशातील केंद्र शासन तसेच भाजपा पक्षाच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारे जनतेच्या हक्कासाठी काही न करता जनतेवर हुकुमशाही पद्धतीने दडपशाही करीत आहे. बेरोजगार युवकांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने या युवकांमध्ये मोठ्या प्रमाणात नैराश्य येऊन ते नाईलाजाने गुन्हेगारी व देशविघातक कृत्यांकडे वळत आहेत.

देशातील कायदा सुव्यवस्था, न्याय व्यवस्था दिवसेंदिवस ढासळत चालली असल्याने केंद्र शासनाच्या विरुद्ध ‘भाजपा सरकार चले जाव’ हे आंदोलन करण्यात येत असल्याचे साळवे यांनी नमूद केले. कार्याध्यक्ष अभिषेक देशमुख, सरचिटणीस सलीम शेख, पूर्व विधानसभा कार्याध्यक्ष अय्युबखान, उपाध्यक्ष रफीक शेख, हरषद पाटील, महिला जिल्हाध्यक्ष छाया यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्याची व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

Web Title: ‘Leave BJP government’ movement