शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान, महायुती वरचढ ठरणार
2
Latest Marathi News LIVE Updates: लोकसभेत सीमांकन विधेयकावर चर्चा सुरू, उद्या दुपारी ४ वाजता मतदान
3
परतवाडा व्हिडीओकांड ते बंगालमधील फसवणूक! अयान तनवीर आणि आनंदचे अनेक महिलांशी संबंध; धक्कादायक खुलासा
4
हाफिज सईदच्या खास माणसावर बेछुट गोळीबार; लष्करचा संस्थापक अमीर हमजा मृत्यूच्या दारात
5
“भारताच्या अर्ध्या लोकसंख्येत मुस्लिम महिलांचा समावेश होत नाही का?”; अखिलेश यादवांचा सवाल
6
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा पिण्यापूर्वी की नंतर... कधी पाणी पिणं ठरेल आरोग्यासाठी घातक?
7
जगातील फक्त १६ देशांमध्ये महिला राष्ट्राध्यक्षा; जागतिक राजकारणात किती आहे भागीदारी?
8
PPF मध्ये ₹१२,००० ची बचत तुम्हाला बनवू शकते कोट्यधीश, मिळणार हमखास परतावा; आणखी कोणते आहेत फायदे?
9
चैत्र अमावस्या २०२६: चैत्र अमावास्येला दुपारी १२ नंतर 'या' ७ राशींना सतर्कतेचा इशारा; पण का? वाचा!
10
"मी वैतागलो होतो, म्हणून आईला मारून टाकलं" मुलाचं ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली!
11
तुमची एक चूक आणि FASTag होईल ब्लॅकलिस्ट; पटापट करा 'हे' काम; NHAI चे बँकांना महत्त्वाचे निर्देश
12
महागाई ३८ महिन्यांच्या उच्चांकावर! पश्चिम आशियातील युद्धाचा थेट परिणाम भारतीय नागरिकांवर
13
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
14
“भारताशी आमचे संबंध ५ हजार वर्ष जुने, युद्धानंतर आणखी मजबूत होणार”; इराणचे नेते थेट बोलले
15
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
16
Ashok Kharat : 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक
17
"त्यांनी भोंदूबाबाचा सगळा प्रकार संवेदनशीलतेने हाताळला..."; प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केलं कौतुक
18
Rasikh Salam Dar: वय लपवलं, BCCI कडून २ वर्षांची बंदी; शिक्षकाचा मुलगा RCB साठी कसा बनला ‘कमबॅक किंग’?
19
इराणमध्ये पहिल्यांदाच महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे Bita Hemmati? तिच्यावर नेमका आरोप काय?
20
३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
Daily Top 2Weekly Top 5

गुरूंच्या चरणी लीन

By admin | Updated: July 13, 2014 00:40 IST

औरंगाबाद : जीवनाला दिशा देत प्रेरणा देणाऱ्या गुरूंच्या चरणी लीन होऊन आज शिष्यांनी गुरू- शिष्य परंपरेचे दर्शन घडवले.

औरंगाबाद : जीवनाला दिशा देत प्रेरणा देणाऱ्या गुरूंच्या चरणी लीन होऊन आज शिष्यांनी गुरू- शिष्य परंपरेचे दर्शन घडवले. गुरुपौर्णिमेनिमित्त गुरुपूजनापासून ते नेत्रदान शिबिरापर्यंत विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांनी शहर गजबजून गेले होते. विशेषत: गजानन महाराज मंदिर, साईबाबा मंदिर, बाळकृष्ण महाराज मंदिर, रेणुकामाता मंदिर, स्वामी समर्थ केंद्र, स्वामी मच्छिंद्रनाथ मंदिरासह विविध मंदिरांत सकाळपासूनच भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. गारखेडा परिसरातील गजानन महाराज मंदिरात पहाटे काकडा आरतीने सुरुवात झाली. महाराजांची पूजा झाल्यानंतर भाविकांनी दर्शनास सुरुवात केली. महाराजांच्या दर्शनासाठी औरंगाबादच नव्हे तर आसपासच्या परिसरातूनही भाविक आले होते. सायंकाळी दर्शनासाठी भाविकांची रांग लागली होती. अनेक भाविक सहपरिवार आले होते. औरंगपुऱ्यातील एकनाथ महाराज मंदिर, श्रीदत्त मंदिर तसेच बाळकृष्ण महाराज मंदिरातही विधिवत गुरुपूजन करण्यात आले. सद्गुरू लक्ष्मीकांत महाराज आजूबाई संस्थानच्या वतीने सिडको एन-९ येथून सद्गुरूंच्या पादुकांची शोभायात्रा काढण्यात आली. सप्तपदी मंगल कार्यालयात पादुकांचे दर्शन घेण्यासाठी भाविक मोठ्या संख्येने जमले होते. बीड बायपास परिसरातील हरिहर शक्तिपीठ आश्रमात अप्पा महाराजांचे प्रवचन झाले यानंतर भाविकांनी भक्तिपदे म्हटली. स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज यांच्या शिष्यांनी गुरुपौर्णिमा साजरी केली. यावेळी पं. विजयकुमार पल्लोड यांच्या मार्गदर्शनाखाली विविध कार्यक्रम झाले. स्वामी मच्छिंद्रनाथ मंदिरात डॉ. मंगलनाथ महाराजांचे पूजन करण्यात आले. नाथ संप्रदायातील नाना महाराज पाथर्डीकर यांचे गुरुपूजन करण्यात आले. यावेळी लघु रुद्राभिषेक करण्यात आला. रामचंद्र पारनेरकर महाराज यांच्या जन्मोत्सवानिमित्त गुरुप्रसादनगर, बाळापूर, सातारा मंदिर, शिवराम मंदिर, समर्थनगर, न्यायालयीन सोसायटी येथील पादुका मंदिरात शिष्यांनी पूजन केले. रात्री महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. व्यंकटेश मंगल कार्यालयात माई महाराज यांच्या गुरुपूजनासाठी भाविकांनी गर्दी केली होती. येथे अनेकांनी गुरुमंत्र घेतला.सामाजिक उपक्रमहडकोतील स्वामी समर्थ सेवा केंद्रात गुरुपूजन करण्यात आले. यानंतर सामुदायिक स्वामी चरित्र व दुर्गा सप्तशतीचे पारायण झाले. याशिवाय भाविकांची मोफत नेत्र तपासणी, दंत चिकित्सा, आरोग्य तपासणी करण्यात आली.पॅन कार्ड व विवाह नोंदणी करण्यात आली. पावसासाठी पर्जन्यसूक्ताचे वाचन करण्यात आले. सर्व उपक्रमांत युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.