शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

नेत्यांनो खबरदार, छत्रपती संभाजीनगरच्या पाणीपुरवठा योजनेविषयी वक्तव्ये कराल तर: हायकोर्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2024 12:28 IST

प्रकरण न्यायप्रविष्ट असताना विसंगत वक्तव्यांमुळे संभ्रम, औरंगाबाद उच्च न्यायालयाने फटकारले

छत्रपती संभाजीनगर : संभाजीनगरच्या पाणीपुरवठा योजनेबद्दल कोणत्याही राजकीय पक्षाच्या नेत्याने लोकांमध्ये संभ्रम निर्माण होईल, अशी एकमेकांशी विसंगत जाहीर वक्तव्ये करू नयेत, अशा शब्दात मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. रवींद्र घुगे आणि न्या. आर. जी. खोब्रागडे यांनी गुरूवारी तीव्र नाराजी व्यक्त करत नेत्यांना फटकारले.

याबाबत संबंधितांना उच्च न्यायालयाची तीव्र नाराजी कळवू, असे आश्वासन राज्य सरकारच्यावतीने मुख्य सरकारी वकील अमरजीतसिंह गिरासे यांनी दिले. सदर प्रकरण न्यायप्रविष्ट असताना नुकतेच विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी ‘संभाजीनगरची पाणी योजना मीच आणली’, ‘डिसेंबरपर्यंत शहराला नवीन पाणीपुरवठा योजनेतून पाणीपुरवठा करू’, तसेच ‘योजनेची सद्य:स्थिती पाहता डिसेंबरपर्यंत शहराला नवीन पाणीपुरवठा योजनेतून पाणीपुरवठा होऊच शकत नाही,’ अशी लोकांमध्ये संभ्रम निर्माण होईल अशी एकमेकांशी विसंगत जाहीर वक्तव्ये केल्याची बाब ‘अमायकस क्युरी’ (न्यायालयाचे मित्र) सचिन देशमुख यांनी खंडपीठाच्या निदर्शनास आणून देत तीव्र नाराजी व्यक्त केली. खंडपीठाने याची गंभीर दखल घेण्याची विनंती त्यांनी केली.

उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्य शासनाने २५ जून रोजी विभागीय आयुक्तांची नियुक्ती केल्याचे गिरासे यांनी सांगितले. तर उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार केंद्र शासनाने वाळू उत्खननासंदर्भात ‘राज्यस्तरीय पर्यावरण समिती’ गठीत केल्याचे असिस्टंट सॉलिसिटर जनरल अजय तल्हार यांनी सांगितले. खंडपीठाच्या ७ जूनच्या आदेशानुसार पाणीपुरवठा योजनेच्या जलवाहिनी टाकण्यासाठी तोडण्यात आलेल्या झाडांची संयुक्त पाहणी आणि मोजणी करून तोडलेल्या झाडांच्या बदल्यात किती झाडे लावली, याचा अहवाल सादर करण्यात आला. त्यानुसार जळगाव रोडवरील २६७ झाडे तोडली व त्या बदल्यात २६७० झाडे लावली. तर पैठण रोडवरील ३१७ झाडे तोडून ३१७० झाडे लावल्याचा अहवाल सादर करण्यात आला.

खंडपीठातर्फे गठीत समितीने सादर केलेल्या अहवालात एमजेपीचे मुख्य अभियंता लोलापोड सदस्य नसताना समितीपुढे विसंगत माहिती सादर करत असल्याबद्दल कंत्राटदाराचे वकील आर. एन. धोर्डे यांनी तीव्र आक्षेप घेतला. त्याची गंभीर दखल घेत एमजेपीचे वकील राजेंद्र देशमुख यांना संबंधिताला योग्य ती समज देण्यास सांगितले. तर जलवाहिन्यांसाठीच्या खोदकामामुळे शहरातील रस्त्यांच्या झालेल्या दुरवस्थेकडे ॲड. टोपे यांनी लक्ष वेधले. याबाबत ७ जूनच्या आदेशात निर्देश दिल्याचे खंडपीठाने स्पष्ट केले.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादWaterपाणीAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाAurangabad High Courtऔरंगाबाद खंडपीठ