शहरं
Join us  
Trending Stories
1
आईच्या नावाने मुलाला ओळखणार, कागदपत्रांवर मातेचे नाव लागणार! सर्व शाळांमध्ये एकच नियम लागू
2
Watermelon Death Case Mumbai : कलिंगडामुळे मृत्यू नाही! FDA अहवालाने संभ्रम मिटला; मुंबईतील 'त्या' ४ जणांच्या मृत्यूचे गूढ कायम
3
बरगी धरणात देवदूत धावले! स्वतःचा जीव धोक्यात घालून कामगारांनी वाचवले डझनभर प्राण; मुख्यमंत्र्यांनी बक्षीस केले जाहीर
4
IPL 2026 Playoffs Race: पुढचं पुढं बघू, आधी CSK चा बदला घेऊ! याच इराद्याने चेपॉकच्या मैदानात उतरेल MI
5
Post Office Scheme : सोन्यासारखी आहे पोस्ट ऑफिसची 'ही' स्कीम; ₹१ लाख जमा करा, मिळेल ₹४५,००० चं व्याज
6
युद्धामुळे तेलाच्या दराचा भडका! सर्वाधिक फटका भारताला, पेट्रोल-डिझेलच्या किमतींचा ‘टाइम बॉम्ब’
7
‘त्या’ मृतांपैकी एकाच्या अवयवाचा रंग हिरवट; खरे कारण अहवाल आल्यानंतर कळणार?
8
बोट बुडू लागली तेव्हा आतमध्ये काय घडलं? लाईफ जॅकेट कुठे होते? दुर्घटनेच्या व्हिडीओत दिसलं असं काही
9
साडेतीन वर्षांच्या बालिकेचा लैंगिक अत्याचार करून खून; नराधमास ताब्यात द्या, ग्रामस्थ संतप्त, महामार्ग दोन तास रोखला
10
कमर्शियल LPG दरवाढीचा हॉटेल उद्योगाला जोरदार फटका; खाद्यपदार्थांचे दर १५ टक्क्यांपर्यंत वाढण्याची शक्यता
11
भारतीय उद्योगांना चीनचा विळखा; इलेक्ट्रॉनिक, रसायने, औषध क्षेत्र संकटात येण्याची भीती
12
"इराणला अण्वस्त्रे देऊ नका, ते क्षणातच विध्वंस घडवतील", ट्रम्प यांनी 'नाटो'ला केलं सावध!
13
ईव्हीएममध्ये फेरफार केल्याच्या आरोप; बंगालमधील १५ मतदान केंद्रांवर फेरमतदान सुरू
14
आजचे राशीभविष्य - २ मे २०२६, आर्थिक, सामाजिक व कौटुंबिक क्षेत्रांत लाभ होतील, कुटुंबात सुख-शांती नांदेल
15
ट्रम्प चिडले, पण फेमस झाल्या जॉर्जिया मेलोनी! तरुणाई तर त्यांच्यामागे खंबीरपणे उभी राहिली
16
मुंबईत ‘ऑपरेशन व्हाइट स्ट्राइक’, १,७४५ कोटींचे अमली पदार्थ जप्त; ३४९ किलो कोकेनही हस्तगत
17
IPL 2026 : वैभव-यशस्वी सुपरहिट जोडीचा फ्लॉप शो! तरी RR निर्धास्त; KL राहुलच्या खेळीने DC ला दिलासा
18
महामुंबईत सायकल ट्रॅकचा ‘ट्रॅक’च हरवला!, सायकल आहे, पण चालवायची कुठे?; कोट्यवधींचा खर्च वाया
19
पेट्रोल-डिझेल दरवाढ उंबरठ्यावर?; व्यावसायिक गॅस सिलिंडरही महागले, निवडणुका आटोपताच तगडा झटका
Daily Top 2Weekly Top 5

संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना गोंजारण्यास नेते सरसावले

By admin | Updated: September 13, 2014 23:13 IST

व्यंकटेश वैष्णव , बीड विधानसभा निवडणुकांचे बिगुल शुक्रवार पासून वाजले़ जशी आचारसंहिता लागू झाली तशी ज्या नेत्यांना पक्ष श्रेष्ठींकडून उमेदवारीचा हिरवा कंदिल मिळाला आहे.

व्यंकटेश वैष्णव , बीडविधानसभा निवडणुकांचे बिगुल शुक्रवार पासून वाजले़ जशी आचारसंहिता लागू झाली तशी ज्या नेत्यांना पक्ष श्रेष्ठींकडून उमेदवारीचा हिरवा कंदिल मिळाला आहे. ते नेते आपापल्या मतदार संघाकडे रवाना झाले आहेत. प्रचारासाठी कमी दिवस हातात असल्यामुळे उमेदवारांनी इतर प्रचार साधनांबरोबरच जिल्ह्यातील सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या छोट्या मोठ्या संघटनांची यादी मिळवून त्यांना गोंजारण्याचा प्रयत्न संभाव्य उमेदवार आपापल्या मतदार संघात करत असल्याचे चित्र बीड जिल्हयात पहावयास मिळत आहे़विधानसभा व लोकसभा पोटनिवडणूक बीड जिल्हयात एकाच वेळी होत आहे़ शुक्रवारी आदर्श आचारसंहिता शुक्रवारी जाहीर झाली़ आता पर्यंत मुंबईत दबा धरून बसलेले नेते आता हळूहळू मतदार संघाकडे प्रस्थान करत असल्याचे पहावयास मिळत आहे़ प्रचारासाठी बारा-तेरा दिवस हातात असल्याने जलद प्रचाराचे वेगवेगळे फंडे वापरून जास्तीत जास्त मतदारांपर्यंत कसे पोहचू शकतो यासाठी नवनविन क्लृप्त्या राबविल्या जात आहेत़ याचाच एक भाग म्हणून काही पक्षाच्या संभाव्य उमेदवारांनी बीड जिल्हयातील विविध क्षेत्रात काम करणाऱ्या सामाजिक संघटनांची यादी करून संघटनेच्या प्रमुखांशी संपर्क करण्याचे काम हाती घेतलेले आहे़ बीड जिल्हयात दोन ते अडीच हजाराच्या जवळपास सामाजिक व सेवाभावी विविध संघटना आहेत़ मागील पाच वर्षात सामाजिक संघटनांकडे ढुंकुनही न पहाणारे नेते आता मतासाठी सामाजिक व सेवाभावी संघटनेच्या प्रमुखांना गोजांरत असल्याने संघटनांच्या कार्यकर्त्यांनी देखील आश्चर्य व्यक्त केले आहे़यावेळी विधानसभा व लोकसभा पोटनिवडणुक एकत्रीत होत असल्याने दोन्ही उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असणार आहेत. यामुळे निवडणुकीची रणधुमाळी रंगतदार होण्याची चिन्हे बीडमध्ये सध्या पहावयास मिळत आहे. असे असताना सर्वच पक्षाचे संभाव्य उमेदवार प्रचाराचे नवनवे फंडे वापरण्याच्या तयारीत आहेत. ज्या- ज्या नेत्यांना पक्ष श्रेष्ठींकडून हिरवा कंदिल मिळाला आहे. ते इतर वेळी मुंबईत तळ ठोकून असणारे संभाव्य उमेदवार आचारसंहिता जाहीर होताच आपापल्या मतदारसंघाकडे रवाना होताना पहावयास मिळत आहेत. प्रचारासाठी बारा ते तेरा दिवसच हातात असल्याने व ते कमी पडत असल्यामुळे सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या संघटनांना भुरळ घालण्याचा प्रयत्न केला जात आहे. अनेक सामाजिक संघटनांचे जाळे गावागावांमध्ये विस्तारलेले आहे. याची पुरती कल्पना धुरंधर राजकारण्यांना आहे. यामुळे कमी वेळेत जास्त लोकांपर्यंत पोहंचण्यासाठी संघटनांची मदत घेता येऊ शकते का याची चाचपणी सुरू आहे. मात्र सामाजिक संघटनांचे कार्यकर्ते देखील आलेल्या सर्वच पक्षाच्या नेत्यांना हो- हो म्हणून वाटेला लावताना दिसत आहेत. असे चित्र सध्या तरी बीड जिल्ह्यात पहावयास मिळत आहे.