शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
2
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
3
Latest Marathi News LIVE Updates: हे महिला आरक्षण विधेयक नाही, तर मतदारसंघ पुर्नरचना विधेयक; राहुल गांधींचा घणाघात
4
"खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
5
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
6
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
7
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
8
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
9
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
10
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
11
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
12
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
13
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
14
T20 वर्ल्ड कपच्या कोणत्या सामन्यात झाली मॅच फिक्सिंग? कसा घडला सगळा प्रकार? वाचा सविस्तर
15
Simple Ultra: एकदा चार्ज केल्यानंतर ४०० किलोमीटर धावणार! इलेक्ट्रीक स्कूटर सिंपल अल्ट्रा भारतात लॉन्च
16
LPG नंतर आता सोन्या-चांदीची टंचाई जाणवणार? भारतीय बँकांनी उचललं 'हे' मोठं पाऊल
17
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
18
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
19
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
20
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
Daily Top 2Weekly Top 5

लातूरची आश्लेषा फड ‘नॅशनल स्कूल आॅफ ड्रामा’त !

By admin | Updated: August 20, 2016 00:51 IST

लातूर : लातूरसारख्या गावातून अभिनयाद्वारे करिअरची वेगळी वाट चोखाळणाऱ्या आश्लेषा फड या विद्यार्थिनीने बाराशेहून अधिक मुला-मुलींमधून अत्यंत

लातूर : लातूरसारख्या गावातून अभिनयाद्वारे करिअरची वेगळी वाट चोखाळणाऱ्या आश्लेषा फड या विद्यार्थिनीने बाराशेहून अधिक मुला-मुलींमधून अत्यंत प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या ‘नॅशनल स्कूल आॅफ ड्रामा’ ची पात्रता परीक्षा उत्तीर्ण होऊन प्रवेश मिळविला आहे. डॉक्टर आणि इंजिनिअर होण्यासाठी प्रवेश घेणाऱ्यांच्या भाऊगर्दीत तिच्या निवडलेल्या वाटेवर लातूरच्या सांस्कृतिक वर्तुळात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे. जिल्ह्यातून नॅशनल स्कूल आॅफ ड्रामात शिकणारी ती पहिलीच विद्यार्थी ठरली आहे. आश्लेषा फड ही मूळची बीडची. मात्र तिच्या आई-वडिलांनी स्वत:चे करिअर आणि मुलांचे शिक्षण यासाठी लातुरात वास्तव्य केले. बीडच्या संस्कार विद्यालयातून गुरु सतीश साळुंके यांच्याकडून अभ्यासाबरोबर अभिनयाचाही संस्कार घेऊन लातुरात आलेली आश्लेषा देशी केंद्र विद्यालयात माध्यमिक तर उच्च माध्यमिकपर्यंत विज्ञान शाखेतून दयानंद महाविद्यालयात शिकली. तिच्यातल्या अभिनेत्रीला दयानंदने जिवंत ठेवले पण जाणिवा दिल्या त्या ‘नुपूर अकादमी’च्या नभा बडे यांनी. इथे तिने भरतनाट्यम् या शास्त्रीय नृत्याचे प्रशिक्षण घेऊन विशारद पूर्णत्वाला नेले. विज्ञान शाखेत असूनही आपल्यातील अभिनयाची ओढ मरु दिली नाहीच. शिवाय बारावी विज्ञानला चांगले गुण पडूनही अस्मिता फड या डॉक्टर आणि आणि परशुराम फड या केमिस्ट पित्याची ही मुलगी अभिनयाच्या प्रशिक्षणासाठी पुण्याच्या ललित कला गुरुकुल केंद्रातून नाटकाची पदवी घेऊन बाहेर पडली. पण शिकण्याची ओढ संपली नाही. कोणत्याही नाट्य आणि सिने कलावंताला नॅशनल स्कूल आॅफ ड्रामा’त जाऊन नाटक शिकावे हे मनस्वी वाटतेच. तसेच तिला वाटले. देशभरातून दीड - दोन हजार विद्यार्थी प्रवेश पात्रता फेरीला होते. परंतु आश्लेषाने लेखीसह सादरीकरणाद्वारे प्रॅक्टीकलही उत्तम देऊन अंतिम २७ जणांत आपले स्थान पक्के केले. आता तीन वर्षांच्या तिच्या नाट्य शिक्षणाचा ३ लाख २० हजारांचा खर्च शासन करणार आहे. अंतिम निवड झालेल्या २७ मध्ये महाराष्ट्राच्या चार मुली आणि एक मुलगा असे पाचजण आहेत. मराठवाड्यातून आश्लेषा ही एकमेव आहे. लातूरमधून या संस्थेत प्रवेश मिळविणारी ती एकमेव ठरली आहे.