लठ्ठ पोलिसांना डॉ. जगन्नाथ दीक्षितांकडून टिप्स
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2019 22:56 IST2019-05-06T22:55:55+5:302019-05-06T22:56:23+5:30
पोलीस आयुक्तालयांतर्गत कार्यरत लठ्ठ पोलिसांचे वजन कमी करण्याचे पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी मनावर घेतले आहे. या पोलिसांसाठी सोमवारी पोलीस आयुक्तालयात डॉ. जगन्नाथ दीक्षित यांचे व्याख्यान आयोजित केले होते. डॉ. दीक्षित यांनी पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांना तंदुरुस्त शरीरयष्टी राखण्यासाठी विशेष टिप्स दिल्या.

लठ्ठ पोलिसांना डॉ. जगन्नाथ दीक्षितांकडून टिप्स
औरंगाबाद : पोलीस आयुक्तालयांतर्गत कार्यरत लठ्ठ पोलिसांचे वजन कमी करण्याचे पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी मनावर घेतले आहे. या पोलिसांसाठी सोमवारी पोलीस आयुक्तालयात डॉ. जगन्नाथ दीक्षित यांचे व्याख्यान आयोजित केले होते. डॉ. दीक्षित यांनी पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांना तंदुरुस्त शरीरयष्टी राखण्यासाठी विशेष टिप्स दिल्या.
पोलीस आयुक्तालयात अनेक पोलिसांच्या ढेºया वाढलेल्या आहेत. यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर परिणाम होतो. ही बाब लक्षात घेऊन ज्या पोलीस कर्मचाºयाचे बॉडी मास इंडेक्स (बीएमआय) २७ पेक्षा अधिक आहे, त्यांच्यासाठी विशेष उजळणी शिबीर सुरू केले. हे उजळणी शिबीर निवासी आहे. यात ३० पोलीस कर्मचारी सहभागी आहे. या पोलिसांना रोज सकाळी पी. टी. करावी लागते. त्यांना आता योगाभ्यास आणि प्राणायाम शिकविला जाणार आहे. याकरिता योग प्रशिक्षक बोलविल्याची माहिती पोलीस उपायुक्त डॉ. दीपाली धाटे-घाडगे यांनी दिली. सोमवारी सकाळी पोलीस आयुक्तालयात डॉ. जगन्नाथ दीक्षित यांचे व्याख्यान झाले. या व्याख्यानासाठी सुमारे १५० अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. डॉ. दीक्षित यांनी पोलिसांना दैनंदिन आहार आणि फिटनेसबाबत मार्गदर्शन केले. त्यानुसार पोलिसांना आता आहार दिला जाणार असल्याचे उपायुक्तांनी सांगितले. उजळणी कोर्समधील पोलिसांची वैद्यकीय तपासणी केली जाणार आहे. या तपासणीमध्ये आजार असलेल्या पोलिसांवर उपचार केले जातील, असे त्यांनी सांगितले.