तुळजापूर : शारदीय नवरात्रोत्सवाच्या पाचव्या दिवशी सोमवारी २९ सप्टेंबर रोजी तुळजाभवानी मातेच्या सकाळच्या नित्योपचार पूजेनंतर मुरली अलंकार विशेष महापूजा मांडण्यात आली. या पूजेचे पायी चालत आलेल्या लाखो भाविकांनी दर्शन घेतले. देवी दर्शनासाठी तुळजापुरात दररोज लाखोच्या संख्येने भाविक दाखल होत आहेत. वाढत्या गर्दीमुळे तुळजापुरातील दोन्ही बसस्थानकांचा परिसर, सोलापूर, उस्मानाबाद, नळदुर्ग व लातूर रोड भाविकांच्या गर्दीने फुलून गेले आहेत. गर्दी वाढल्याने मंदिरातील दर्शन मंडपाचे चारही मजले भाविकांनी भरले. कर्नाटक, तेलंगणा भागातील भाविकांना धर्मदर्शन आणि मुखदर्शन रांगेतील फरक न कळल्याने अनेकांच्या नातेवाईकांची चुकामूक होताना दिसून आली. त्यामुळे यासंदर्भात वारंवार स्पीकरवरून सूचना द्याव्या लागत होत्या. दर्शन मंडपात पोलिसांनी व सुरक्षा रक्षकांनी भाविकांना धर्मदर्शनाची रांग व मुखदर्शनाची रांग यातील फरक समजावून सांगितल्यास भाविकांची दिशाभूल होणार नाही, असे पुजारी वर्गातून बोलले जात होते. दरम्यान लांब पल्ल्याच्या बसगाड्या सोडल्याने भाविकांची चांगली सोय झाली आहे. जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी स्वत: जातीने यात्रेची पाहणी करीत आहेत. त्या-त्या संबंधित यंत्रणा प्रमुखांना आवश्यक त्या सूचना देत आहेत. यात्रेत राबविण्यात आलेले शाळकरी विद्यार्थ्यांचे स्वच्छता अभियान हेही देवी भक्तांचे आकर्षण ठरले. वाढत्या गर्दीमुळे अनुचित प्रकार घडू नये, यासाठी ठिकठिकाणी चोख पोलीस बंदोबस्त दिसून आला. (वार्ताहर)
लाखो भाविकांनी घेतले मातेचे दर्शन
By admin | Updated: September 30, 2014 01:26 IST
तुळजापूर : शारदीय नवरात्रोत्सवाच्या पाचव्या दिवशी सोमवारी २९ सप्टेंबर रोजी तुळजाभवानी मातेच्या सकाळच्या नित्योपचार पूजेनंतर मुरली अलंकार विशेष महापूजा मांडण्यात आली.
लाखो भाविकांनी घेतले मातेचे दर्शन
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}