शहरं
Join us  
Trending Stories
1
अग्निमित्रा पॉल यांना दिल्लीतून बोलावणे...! पश्चिम बंगालच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची चर्चा, अमित शाह निवडणार... 
2
Top Marathi News Live: पश्चिम बंगालमध्येही भाजपाचे धक्कातंत्र? मुख्यमंत्रिपदासाठी 'दिल्ली पॅटर्न'?
3
६ राज्ये, १९ जिल्हे आणि ८३ लाख लोकांना थेट फायदा; ₹२३,४०० कोटींमध्ये रेल्वे करणार 'हे' महत्त्वाचं काम
4
पाकिस्तानला अमेरिकेचा मोठा धक्का! सुरक्षेच्या कारणास्तव दूतावास कायमचा बंद केला
5
नसरापूर प्रकरण: …तर राज ठाकरेंवर दाखल होऊ शकतो गुन्हा, असीम सरोदेंचा दावा
6
'प्रोजेक्ट फ्रीडम' बंद, होर्मुझमधील जहाजांना यापुढे सुरक्षा देणार नाही; ट्रम्प यांची मोठी घोषणा
7
'राजा शिवाजी'मध्ये विद्या बालनच्या जागी दिसली असती 'ही' अभिनेत्री, मात्र दिला नकार; कारण...
8
डॉ. संग्राम पाटील यांचा यूकेमध्ये जाण्याचा मार्ग मोकळा; हायकोर्टाने दिला दिलासा, काय म्हटलं?
9
प्रसिद्ध अभिनेत्रीने सांगितलं इंडस्ट्रीतलं वास्तव, म्हणाली, "किसींग सीनला नकार, थकलेले मानधन..."
10
ममता बॅनर्जी राजीनामा देणार नाहीत, निवडणूक आयोगाने नोटिफिकेशन जारी केले; भाजप सत्ता कशी स्थापन करणार?
11
Palghar Crime: अघोरी पूजेसाठी बोलावले अन् १३ वर्षाच्या मुलीवर भोंदूबाबाने केला बलात्कार, पालघर हादरले
12
Samudrik Shastra: गालावरची खळी: केवळ सौंदर्य की भाग्याचं लक्षण? सामुद्रिक शास्त्र काय सांगते?
13
Multibagger Stock : १ लाखाचे बनले ३ कोटी रुपये; या शेअरनं दिला ३१०००% पेक्षा अधिक रिटर्न, एकेकाळी ₹१० पेक्षा कमी होती किंमत
14
आसाम, बंगालमधील विजयानंतर भाजपा ‘या’ राज्यात ऑपरेशन लोटसच्या तयारीत? बड्या नेत्याने दिले संकेत
15
पंजाबमध्ये हायअलर्ट! जालंधरनंतर अमृतसरमध्येही स्फोट; लष्करी तळ आणि BSF मुख्यालयाजवळ खळबळ
16
ममतांचा किल्ला कसा भेदला? काय होता विजयाचा फॉर्म्युला? भाजपचे चाणक्य अमित शाह यांच्या प्लॅनची ‘इनसाइड स्टोरी’
17
पश्चिम बंगालमध्ये मोठा राडा! भाजपने मध्यरात्री हॉग मार्केटमधील तृणमूल काँग्रेसचे कार्यालय पाडले, बुलडोझर आणला अन्...
18
तामिळनाडूत विजय होणार मुख्यमंत्री; काँग्रेसची पाठिंबा देण्याची तयारी, पण त्याबदल्यात काय हवं?
19
पाकिस्तान नौदलाने मदतीसाठी काश्मीर जहाज पाठविले! अरबी समुद्रात अडकलेल्या ७ भारतीय खलाशांची केली मदत
20
आजचे राशीभविष्य ६ मे २०२६: आर्थिक गुंतवणुकीसाठी अनुकूल दिवस, धनलाभ होण्याची शक्यता
Daily Top 2Weekly Top 5

सात कुटुंबांना लाखाची मदत

By admin | Updated: November 15, 2014 23:54 IST

हिंगोली : मागील काही दिवसांत जिल्ह्यात पुन्हा शेतकरी आत्महत्यांचे सत्र सुरू झाले आहे. वर्षभरात जवळपास २५ ते ३0 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत.

हिंगोली : मागील काही दिवसांत जिल्ह्यात पुन्हा शेतकरी आत्महत्यांचे सत्र सुरू झाले आहे. वर्षभरात जवळपास २५ ते ३0 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. या महिन्यात शेतकरी आत्महत्या समितीसमोर मदतीसाठी आलेल्या प्रस्तावांपैकी ७ मंजूर झाले असून त्यांच्या कुटुंबियांना लाखाची मदत मिळणार आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी प्रवीण फुलारी यांनी दिली.जिल्ह्यातील एकूण ९ शेतकऱ्यांच्या आत्महत्याबाबत कुटुंबियांना मदतीसाठी प्रस्ताव तहसील प्रशासनाकडून सादर करण्यात आले होते. जिल्हास्तरीय समितीने केलेल्या तपासणीअंती त्यातील ७ प्रस्ताव मदतीसाठी पात्र ठरले आहेत. यात औंढा नागनाथ तालुक्यातील पार्डी सावळी येथील डिगांबर किशन सांगळे, माथा येथील उमराव मारोतराव कुटे, अनखळी वाडी येथील संपत मारोतराव चाटे, पार्डी सावळी येथील सोपान किशनराव सांगळे, कळमनुरी तालुक्यातील येलकी येथील विठ्ठल जगदेवराव माने, सेनगाव तालुक्यातील खुडज येथील नवनाथ विश्वनाथ घोशिर, वसमत तालुक्यातील दारेफळ येथील माणिक उमाजी भालेराव या शेतकऱ्यांच्या आत्महत्या मदतीसाठी पात्र ठरल्या आहेत. नापिकी व कर्जाच्या तगाद्याला कंटाळून या शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले होते. त्यामुळे त्यांच्या कुटुंबियांना लाखाची मदत दिली जाणार आहे. यासाठी सात लाखांची मदत जिल्हाधिकारी कार्यालयातून संबंधित तहसीलला धनादेशाद्वारे पाठविण्यात आली आहे. ३0 हजारांची थेट मदत व ७0 हजार रुपये पोस्टाद्वारे टप्प्या-टप्प्याने दिले जातात. आणखी दोन आत्महत्याग्रस्तांचे प्रस्ताव समितीसमोर चर्चेला आले होते. मात्र त्यातील एक अपात्र ठरले तर दुसरे फेरतपासणीसाठी ठेवण्यात आले आहे.(वार्ताहर)