शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
2
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
3
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
4
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
5
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
6
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
7
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
8
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
9
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
10
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
11
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
12
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
13
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
14
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
15
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
16
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
17
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
18
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
19
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
20
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...

लढेंगे जितेंगे हम सब जरांगे! महाशांतता रॅलीसाठी मराठा बांधव छत्रपती संभाजीनगरात एकवटले

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2024 13:22 IST

छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी जय शिवाजी, तुमचं आमचं नातं काय? जय जिजाऊ जय शिवराय असा जयघोष करीत आहेत.

छत्रपती संभाजीनगर: मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या महाशांतता रॅलीसाठी शहरातील सिडको चौकात बांधव एकत्र येण्यास सुरुवात झाली आहे. महाशांतता रॅलीसाठी आलेले मराठा बांधव' लढेंगे जितेंगे, हम सब जरांगे ,अशा घोषणा देत आहेत. छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी जय शिवाजी, तुमचं आमचं नातं काय? जय जिजाऊ जय शिवराय असा जयघोष करीत आहेत.

सकल मराठा समाजाच्यावतीने जरांगे यांच्या या रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. सिडकोतील वसंतराव नाईक चाैक ते क्रांती चौक अशी ही रॅली जाईल. यासाठी सकाळपासून मराठा बांधव सिडको चौकात जमत आहेत. रॅलीच्या निमित्ताने शहरात ठिकठिकाणी आरोग्य तपासणी, अन्नदान आदी उपक्रम राबविण्यात येत आहेत. तसेच आंदोलक विविध माध्यमातून रॅलीत सहभागी होताना दिसत आहेत. कोणाच्या माथ्यावर तर कोणाच्या हातावर  'एक मराठा,लाख मराठा' असे पेंटिंग्ज आहे. हातात जरांगे पाटील यांच्या प्रतिमा घेऊन आंदोलक घोषणा देत सिडकोच्या चौकात जमत आहेत.रॅलीत महिला आणि तरुणांचा सहभाग मोठा आहे. दरम्यान, सकाळी अकरा वाजता तब्बल ३६१ ट्रॅक्टरचा रॅलीत सहभाग असून सर्वांनी क्रांती चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला फेरी मारून अभिवादन केले. 

दहा रुग्णालयांकडून मोफत आपत्कालीन सेवाजरांगे यांच्या महाशांतता रॅलीदरम्यान सहभागी समाजबांधवांपैकी कोणाची प्रकृती अचानक खालावल्यास रॅली मार्गालगतच्या दहा रुग्णालयांमार्फत मोफत आपत्कालीन सेवा देण्याचा निर्णय संत तुकाराम मेडिकल फाऊंडेशनने घेतला. यासाठी रुग्णालयांची यादीही फाऊंडेशनने जाहीर केली आहे.

सुमारे ५०० स्वयंसेवक सज्ज१३ जुलै २०१६ रोजी नगर जिल्ह्यातील कोपर्डीत मराठा समाजातील मुलीवर अत्याचाराची घटना घडली होती. या घटनेनंतर राज्यातील पहिला मराठा क्रांती मूक मोर्चा छत्रपती संभाजीनगरमध्ये ९ ऑगस्ट २०१६ रोजी काढण्यात आला होता. या घटनेला ८ वर्षे होत असताना शनिवारी जरांगे यांची महाशांतता रॅली होत आहे. यामुळे छत्रपती संभाजीनगरच्या रॅलीसाठी लाखोंच्या संख्येने मराठा समाज येणार आहे. शिस्तबद्ध रॅलीचे दर्शन घडविण्यासाठी समाजातील सुमारे ५०० स्वयंसेवक सज्ज आहेत.

बाहेरील तालुक्यातून येणाऱ्यांसाठी पार्किंग व्यवस्था१.जालना, करमाडकडून येणाऱ्या वाहनांसाठी - रामनगर कमानीसमोर ग्रॅमफोर्थ समोरील पार्किंग.२.सिल्लोड, फुलंब्रीकडून येणाऱ्या वाहनांसाठी - शरद टी सिग्नलजवळील खुले मैदान.आंबेडकर चौक पिसादेवी रोडवरील राममंदिर ट्रस्ट मैदान, मिलिनियम पार्क मैदान.३. कन्नड, वैजापूर, नगर रोडकडून येणाऱ्या वाहनांसाठी - आयकर भवनजवळील फुटबॉल मैदान, कर्णपुरा पार्किंग.४. पाचोड, आडोळकडून येणाऱ्या वाहनांसाठी - जबिंदा मैदान.५. बिडकीन, पैठणकडून येणाऱ्या वाहनांसाठी - अयोध्या मैदान.

पहिल्यांदाच जालना रोड बंदपहिल्यांदाच शहराची मुख्य वाहिनी समजला जाणारा जालना रोड केंब्रिज चौक ते नगर नाकापर्यंत सकाळी ११ वाजेपासून बंद करण्यात आला आहे. केंब्रिज चौक ते नगर नाका १४.८ किमीचा रस्ता रॅली संपेपर्यंत बंद असेल. त्यासोबतच क्रांती चौकाला जोडणारा कोकणवाडी चौक ते सिल्लेखाना चौक या मार्गावर देखील सर्व प्रकारची वाहतूक बंद असेल. नागरिकांनी पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे. 

हे पर्यायी मार्ग वापरा:-केंब्रिज चौक, झाल्टा फाटा ते बीड बायपास मार्गे महानुभव आश्रम चौक या मार्गे जातील व येतील.-केंब्रिज चौक ते सावंगी बायपास, हर्सुल टी, हडको कॉर्नर, अण्णा भाऊ साठे चौक, सिटी क्लब, मिलकॉर्नर, महावीर चौक (बाबा पेट्रोलपंप)-नगर नाका, लोखंडी पूल, पंचवटी, रेल्वेस्थानक मार्गे महानुभव चौक.-कोकणवाडी चाैक, पंचवटी चौक, महावीर चौक मार्गे पुढे जातील व येतील.

२४ ठिकाणी ब्लॉकिंग पॉइंट, त्यामुळे जालना रोडवर वाहनांना बंदीचजालना रोडवर जोडले जाणारे महत्त्वाचे २४ चौक बॅरिकेडब्लॉक केले जातील. यात प्रामुख्याने केंब्रिज चौक, मुकुंदवाडी येथील एसटी वर्कशॉप, एपीआय कॉर्नर, सिडको चौकातील कामगार चौक व जळगाव रोडकडे जाणारे मार्ग, हायकोर्ट चौक, कॅनॉटकडून रामगिरीकडे येणारा मार्ग, एअर इंडियाचे कार्यालय, मनियार दुकानाजवळील चौक (एमजीएम), गजानन महाराज मंदिरापासून जालना रोडच्या दिशेने चौक बंद केला जाईल, ॲपेक्स रुग्णालय मार्ग, त्रिमूर्ती चौक, लक्ष्मण चावडी, अजबनगर, बंजारा कॉलनी, सावजी रुग्णालय, सिल्लेखाना, उस्मानपुरा चौक, काल्डा कॉर्नर, कोकणवाडी, जिल्हा न्यायालय चौक, रमानगर, महावीर चौक बॅरिकेड्स लावून बंद केले जातील.

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणManoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलAurangabadऔरंगाबाद