लड्डा दरोडा प्रकरण: लड्डांच्या घरातील संपत्तीची माहिती देणारा सातवा आरोपी अटकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2025 11:43 IST2025-05-31T11:39:18+5:302025-05-31T11:43:50+5:30

१५ मे रोजी लड्डा यांच्या घरावर पडलेल्या दरोड्याविषयी रोज नवे धक्कादायक खुलासे होत आहेत.

Ladda robbery case: Seventh accused arrested for giving information about assets in Ladda's house | लड्डा दरोडा प्रकरण: लड्डांच्या घरातील संपत्तीची माहिती देणारा सातवा आरोपी अटकेत

लड्डा दरोडा प्रकरण: लड्डांच्या घरातील संपत्तीची माहिती देणारा सातवा आरोपी अटकेत

छत्रपती संभाजीनगर : बजाजनगर, आर. एल. सेक्टरमधील उद्योजक संतोष लड्डा यांच्या घरातील संपत्तीविषयी वडगाव कोल्हाटीच्या शिवाजीनगरमध्ये राहणाऱ्या देवीदास नाना शिंदे (४५) याने माहिती देऊन दरोडा टाकण्यास सांगितल्याचे शुक्रवारी उघड झाले. हे पुराव्यानिशी निष्पन्न होताच गुन्हे शाखेने त्याला रात्री अटक केली.

१५ मे रोजी लड्डा यांच्या घरावर पडलेल्या दरोड्याविषयी रोज नवे धक्कादायक खुलासे होत आहेत. सोमवारी रात्री दरोड्यातील प्रमुख सूत्रधार अमोल बाबूराव खोतकर (३४, रा. पडेगाव) याचे गुन्हे शाखेने ‘एन्काउंटर’ केले, तर त्याचे साथीदार याेगेश सुभाष हाजबे (३१, रा. वडगाव कोल्हाटी), सय्यद अजहरोद्दीन सय्यद कबिरोद्दीन (३७, रा. रांजणगाव शेणपुंजी), महेंद्र माधव बिडवे (३८, रा. साजापूर), सुरेश ऊर्फ सूर्यकांत रामकिसन गंगणे (४५, रा. अंबाजोगाई), सोहेल जलील शेख (२२, रा. अंबाजोगाई) यांची सध्या पोलिस कोठडीत कसून चौकशी सुरू आहे.

शिंदे कोण, कसा अडकला ?
देवीदास शिंदे वाळूजमधीलच एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील विद्यार्थ्यांच्या बसवर चालक आहे. २०१६ मध्ये त्याच्यावर एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, देवीदासला गुप्तधन, काळ्या जादूचा नाद आहे. तो हाजबेचा मित्र असून त्यांनी यापूर्वी अनेक वेळा काही ठिकाणी गुप्तधनाच्या लालसेने खोदकाम केल्याचे स्थानिकांनी सांगितले. देवीदासला देखील त्याच्या मित्राकडून लड्डा यांच्या घरात काेट्यवधींची रक्कम असल्याची माहिती मिळाली होती. त्या दोघांनी हाजबे व खोतकरला ती माहिती पुरवली. देवीदासला माहिती देणाऱ्यालाही पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याची कसून चौकशी सुरू होती.

रेकीत वापरलेली वाहने जप्त
पोलिसांना शिंदेवर पहिल्यापासून संशय होता. हाजबेने दरोड्याच्या आधीच शिंदेला कॉल केला होता. हाजबेने दरोड्याच्या रेकीसाठी वापरलेली चारचाकी व माेपेड पोलिसांनी शुक्रवारी जप्त केली.

Web Title: Ladda robbery case: Seventh accused arrested for giving information about assets in Ladda's house

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.