छत्रपती संभाजीनगर : बजाजनगरमधील उद्योजक संतोष लड्डा यांच्या घरावर १५ मे रोजी पडलेल्या दरोड्यातील बहुतांश सोने एन्कांऊटरमध्ये मारल्या गेलेल्या अमोल खोतकरची बहीण रोहिणी बाबूराव खोतकर (वय ३५, रा. पडेगाव) हिनेच लपवले असल्याबाबत काही धागेदोरे हाती लागले. यामुळे गुन्हे शाखेने तिला मंगळवारी हर्सूल कारागृहातून पुन्हा चौकशीसाठी ताब्यात घेतले.
१५ मे च्या या दरोड्यात २७ मे रोजी दरोड्याचा सूत्रधार अमोलचे एन्काउंटर झाले. त्याच्या काही दिवसांतच त्याची बहीण रोहिणीकडेच त्याने बहुतांश चांदी ठेवल्याचे सबळ पुरावे पोलिसांना मिळाले. निरीक्षक संभाजी पवार यांनी पडेगावच्या एका गॅरेजसमोर उभ्या कारमधून ३१ किलो ३८९ ग्रॅम चांदी जप्त केली. आरोपींच्या अटक व सखोल चौकशीनंतर सर्व २१ आरोपींची हर्सूल कारागृहात रवानगी झाली होती. मात्र, लुटलेले सोने कुठे, हा प्रश्न अद्यापही अनुत्तरित आहे.
सबळ धोगेदोरे, न्यायालयाला विनंतीपोलिस आयुक्त प्रवीण पवार यांनी गुन्हे शाखेला तत्परतेने तपासाच्या सूचना केल्या होत्या. पोलिस निरीक्षक संभाजी पवार, उपनिरीक्षक प्रवीण पाथरकर याबाबत तपास करत होते. त्यात लड्डा यांच्या सोन्याचे धागेदोरे रोहिणीच्या दिशेने गेल्याचा दाट संशय पोलिसांना आला आहे. त्यामुळे न्यायालयाला विनंती करून तिचा पुन्हा ताबा घेत अटक करण्यात आली. न्यायालयाने तिला १५ ऑगस्टपर्यंत पाेलिस कोठडी सुनावली.
आतापर्यंत काय आहे जप्त ?सोने - ७८९.११४ ग्रॅमचांदी - ३१ किलो ३८९ ग्रॅमरोख -२३ लाख़ १४ हजार ६०० रुपयेवाहने - तीन कार, एक दुचाकी
२१ पैकी ६ आरोपी जामिनावर बाहेरयोगेश सुभाष हाजबे, सय्यद अजहरोद्दीन सय्यद कबीरुद्दीन, महेंद्र माधव बिडवे, सुरेश ऊर्फ सूर्यकांत रामकिसन गंगणे, सोहेल जलील शेख, देवीदास नाना शिंदे, बाळासाहेब चंद्रकांत इंगोले, आदिनाथ जाधव, गणेश गोराडे, महेश गोराडे, आशिष जयकुमार बाकलीवाल, शेख शाहरूख शेख रफीक, शेख अबुजर ऊर्फ शाहिद शेख सोहेल शेख मुस्तफा, बबिता सुरेश गंगणे, भारत नरहरी कांबळे व रोहिणी खोतकर. यातील बाकलीवाल, शाहरूख, भारत, बबितासह एकूण सहाजणांना जामीन मंजूर झाला.