शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
2
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
3
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
4
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
5
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
6
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
7
Latest Marathi News LIVE Updates: राज्यातील सर्व बस स्थानकांवरील शौचालय सुविधा १ जूनपासून मोफत; प्रताप सरनाईक यांची घोषणा
8
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
9
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
10
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
11
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
12
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
13
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
14
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
15
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
16
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
17
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
18
T20 वर्ल्ड कपच्या कोणत्या सामन्यात झाली मॅच फिक्सिंग? कसा घडला सगळा प्रकार? वाचा सविस्तर
19
Simple Ultra: एकदा चार्ज केल्यानंतर ४०० किलोमीटर धावणार! इलेक्ट्रीक स्कूटर सिंपल अल्ट्रा भारतात लॉन्च
20
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

सुविधांअभावी लाखोंचे नुकसान

By admin | Updated: July 27, 2015 01:12 IST

बीड : औद्योगिक वसाहत महामंडळाच्या दुर्लक्षामुळे जिल्ह्यातील उद्योगांना रस्ता, पाणी, नाला, पथदिवे या सुविधा मिळत मिळत नाहीत. त्यामुळे लाखो रूपयांचे नुकसान सहन करावे

बीड : औद्योगिक वसाहत महामंडळाच्या दुर्लक्षामुळे जिल्ह्यातील उद्योगांना रस्ता, पाणी, नाला, पथदिवे या सुविधा मिळत मिळत नाहीत. त्यामुळे लाखो रूपयांचे नुकसान सहन करावे लागत असून उद्योजकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.जिल्ह्यात बीड, पाटोदा, धारूर आणि आष्टी येथे औद्योगिक वसाहती आहेत. परंतु कोणत्याच औद्योगिक वसाहतीत उद्योगांना सोयी-सुविधा मिळत नसल्याची ओरड उद्योजकांमधून ऐकावयास मिळत आहे.अचानक वीज गेली तर..२० मिनीटासाठी बत्ती गुल झाली तर याचा विपरीत परिणाम उद्योगांवर होतो. आॅईल मिलधारकांना सर्व कच्चा माल काढून तिला साफ करावे लागते. यासाठी सुमारे चार ते पाच तास वेळ लागत असून २० ते २५ हजार रूपयांचे नुकसान सहन करावे लागते. रिमोल्डींग फॅक्टरीबाबतही असेच आहे. मशीनमधील रबर खराब होते. नव्याने ती प्रक्रिया सुरू करावी लागते. तसेच आईस फॅक्टरीमध्ये बर्फ वितळल्याने मोठे नुकसान होते. बीडमध्ये विविध असे शंभरावर उद्योग सुरू आहेत. अचानक वीज गायब झाल्याने संतापलेले उद्योजक अधिकारी, कर्मचाऱ्यांशी हुज्जत घालतात आणि वाद निर्माण होतो.नाल्या नसल्याने साचले डबकेएमआयडीसी भागात कारखान्यातील घाण पाणी बाहेर जाण्यासाठी नाल्या नाहीत. त्यामुळे कारखान्यासमोर पाण्याचे डबके साचले असून दुर्गंधी पसरत आहे. कामगारांना व परिसरातील लोकांना याचा त्रास होतो.दोन विहिरीतून पाणीपुरवठासध्या बीड एमआयडीसीतील उद्योगांना दोन विहिरींतून पाणीपुरवठा सुरू आहे. दररोज १०० घनमीटर पाण्याची गरज उद्योगांना आहे तर नगरपालिकेचे येणारे पाणी साठवून तेच पाणी उद्योगांना पुरविले जात असल्याचे प्रभारी उपविगायीय अभियंता परळीकर म्हणाले.(प्रतिनिधी)