सुविधांअभावी लाखोंचे नुकसान

By Admin | Updated: July 27, 2015 01:12 IST2015-07-27T00:35:50+5:302015-07-27T01:12:33+5:30

बीड : औद्योगिक वसाहत महामंडळाच्या दुर्लक्षामुळे जिल्ह्यातील उद्योगांना रस्ता, पाणी, नाला, पथदिवे या सुविधा मिळत मिळत नाहीत. त्यामुळे लाखो रूपयांचे नुकसान सहन करावे

Lack of millions due to convenience | सुविधांअभावी लाखोंचे नुकसान

सुविधांअभावी लाखोंचे नुकसान


बीड : औद्योगिक वसाहत महामंडळाच्या दुर्लक्षामुळे जिल्ह्यातील उद्योगांना रस्ता, पाणी, नाला, पथदिवे या सुविधा मिळत मिळत नाहीत. त्यामुळे लाखो रूपयांचे नुकसान सहन करावे लागत असून उद्योजकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
जिल्ह्यात बीड, पाटोदा, धारूर आणि आष्टी येथे औद्योगिक वसाहती आहेत. परंतु कोणत्याच औद्योगिक वसाहतीत उद्योगांना सोयी-सुविधा मिळत नसल्याची ओरड उद्योजकांमधून ऐकावयास मिळत आहे.
अचानक वीज गेली तर..
२० मिनीटासाठी बत्ती गुल झाली तर याचा विपरीत परिणाम उद्योगांवर होतो. आॅईल मिलधारकांना सर्व कच्चा माल काढून तिला साफ करावे लागते. यासाठी सुमारे चार ते पाच तास वेळ लागत असून २० ते २५ हजार रूपयांचे नुकसान सहन करावे लागते. रिमोल्डींग फॅक्टरीबाबतही असेच आहे. मशीनमधील रबर खराब होते. नव्याने ती प्रक्रिया सुरू करावी लागते. तसेच आईस फॅक्टरीमध्ये बर्फ वितळल्याने मोठे नुकसान होते. बीडमध्ये विविध असे शंभरावर उद्योग सुरू आहेत. अचानक वीज गायब झाल्याने संतापलेले उद्योजक अधिकारी, कर्मचाऱ्यांशी हुज्जत घालतात आणि वाद निर्माण होतो.
नाल्या नसल्याने साचले डबके
एमआयडीसी भागात कारखान्यातील घाण पाणी बाहेर जाण्यासाठी नाल्या नाहीत. त्यामुळे कारखान्यासमोर पाण्याचे डबके साचले असून दुर्गंधी पसरत आहे. कामगारांना व परिसरातील लोकांना याचा त्रास होतो.
दोन विहिरीतून पाणीपुरवठा
सध्या बीड एमआयडीसीतील उद्योगांना दोन विहिरींतून पाणीपुरवठा सुरू आहे. दररोज १०० घनमीटर पाण्याची गरज उद्योगांना आहे तर नगरपालिकेचे येणारे पाणी साठवून तेच पाणी उद्योगांना पुरविले जात असल्याचे प्रभारी उपविगायीय अभियंता परळीकर म्हणाले.(प्रतिनिधी)

Web Title: Lack of millions due to convenience