शहरं
Join us  
Trending Stories
1
टीएमसी की भाजप... पश्चिम बंगालमध्ये महिला अन् पुरुषांची पहिली पसंती कुणाला?  'हे' आकडे सत्तेचं गणित बदलणार
2
कोल्हापूर जिल्ह्यातील मुलींच्या शोषण प्रकरणाला वेगळे वळण, बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी
3
नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र
4
SRH विरुद्ध नमन धीरच्या चुकांवर चुका! हेडला तीनदा जीवनदान; तिथंच MI च्या हातून सामना निसटला
5
धारमध्ये भीषण अपघात; ३५ मजुरांनी भरलेली पिकअप उलटून स्कॉर्पिओला धडकली; १२ जणांचा जागीच मृत्यू, १५ हून अधिक जखमी
6
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
7
IPL 2026 : हेडच्या वादळानंतर क्लासेनचा क्लास शो! SRH कडून पराभवानंतर MI साठी वाजली धोक्याची घंटा
8
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
9
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
10
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
11
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
12
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
13
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
14
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
15
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
16
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
17
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
18
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
19
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
20
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षकाचा पालकावर चाकू हल्ला

By admin | Updated: January 9, 2015 00:51 IST

केज : पाल्याला मारहाण केल्याची विचारणा करणाऱ्या पालकावर शिक्षकाने चाकूने हल्ला केल्याची घटना केज तालुक्यातील नांदुरघाट फाट्यावर गुरुवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास घडली.

केज : पाल्याला मारहाण केल्याची विचारणा करणाऱ्या पालकावर शिक्षकाने चाकूने हल्ला केल्याची घटना केज तालुक्यातील नांदुरघाट फाट्यावर गुरुवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास घडली. मात्र, दुष्काळ पडला असल्याने गावातील लोक वारंवार पैसे मागत असल्याने राग अनावर झाल्याने हा प्रकार घडला असल्याचे शिक्षक शाम गुंजोटे याने पोलिसांना चौकशी दरम्यान सांगितले. त्यामुळे खरे कोणाचे हा पेच पोलिसांना पडला आहे. शाम गुंजोटे असे त्या चाकू हल्ला करणाऱ्या शिक्षकाचे नाव असून ते केज तालुक्यातील खाडेवाडी येथील प्राथमिक शाळेत शिक्षक आहेत. या जिल्हा परिषद शाळेत दोन शिक्षक आहेत. पहिलीच्या वर्गात शिकणाऱ्या एका मुलास शाम गुंजोटे याने बुधवारी शाळेत मारले होते. यामुळे त्या मुलाच्या शरीरावर सूज आली होती. त्याने हा प्रकार घरी सांगितला.दरम्यान मुलाचे आजोबा श्रीराम भानुदास खाडे ( वय ५०, रा. खाडेवाडी) यांना शाम गुंजोटे हे नांदुरघाट फाट्यावर भेटले असता त्यांनी याबाबतची विचारणा केली असता त्यांना शिविगाळ करून राम गुंजोटे याने त्यांच्यावर चाकूहल्ला केल्याचे खाडे यांनी पोलिसांना सांगितल्याचे समजते.हल्ला झाल्यानंतर खाडे घाटनांदुर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. त्यानंतर पुढील उपचारासाठी बीड जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. केज पोलिसांनी शिक्षक शाम गुंजोटे यास ताब्यात घेतले असून चौकशी सुरू केली आहे. खाडे यांचा जबाब घेतल्यानंतर शिक्षक गुंजोटे याच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, दुष्काळ पडल्याने गावातील लोक वारंवार पैसे मागण्यासाठी येत असत. गुरुवारी पैसे मागण्यासाठी गावातील खाडे आले होते.राग अनावर झाल्याने हे कृत्य घडले असल्याचे गुंजोटे यांनी पोलिसांना चौकशी दरम्यान सांगितले. मुलाला मारहाण का केली ? अशी विचारणा करणाऱ्यावर चाकु हल्ला शिक्षक करु शकतो ही बाब बुद्धीला न पटणारी आहे.दोघांचे म्हणणे पोलिसांनी ऐकले असून तपासानंतरच खरा प्रकार समोर येईल, असे एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. (वार्ताहर)