शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

पैशांसाठी वाळू व्यावसायिकाचे अपहरण अन् नाट्यमय सुटका

By admin | Updated: November 5, 2014 01:00 IST

औरंगाबाद : पैशांसाठी एका टोळीने वाळू व्यावसायिकाचे मध्यवर्ती बसस्थानकाजवळील एका हॉटेलमधून अपहरण केले. नंतर पोलीस आपल्या मागावर असल्याचे लक्षात येताच

औरंगाबाद : पैशांसाठी एका टोळीने वाळू व्यावसायिकाचे मध्यवर्ती बसस्थानकाजवळील एका हॉटेलमधून अपहरण केले. नंतर पोलीस आपल्या मागावर असल्याचे लक्षात येताच अपहरणकर्त्यांनी या वाळू व्यावसायिकाची मिटमिट्याजवळ सुटका केली. हे अपहरण नाट्य मंगळवारी घडले.अपहरणकर्त्यांच्या टोळीतील गणेश ऊर्फ पप्पू अशोक इंगळे (रा. दलालवाडी) व फिरोज मोहंमद तांबोळी (रा. मिल कॉर्नर) या दोन जणांना गुन्हे शाखा पोलिसांनी अटक केली आहे. या टोळीतील राजू भुतेकर, रिडलॉन व चावरिया हे तीन आरोपी फरार झाले आहेत. गुन्हे शाखेचे निरीक्षक अविनाश आघाव यांनी सांगितले की, काचीवाड्यातील संदीप प्रकाश हिवराळे (२८) या वाळू व्यावसायिकाचा पैशांच्या देवाणघेवाणीवरून आरोपी राजू भुतेकरसोबत वाद सुरू आहे. दरम्यान, मंगळवारी सकाळी संदीप हा त्याच्या मैत्रिणीसोबत मध्यवर्ती बसस्थानकाजवळील हॉटेल रविराजमध्ये गप्पा मारत बसलेला होता. साडेअकरा वाजेच्या सुमारास आरोपी भुतेकर हा पप्पू इंगळे, फिरोज तांबोळी, रिडलॉन, चावरिया याच्यासह हॉटेलमध्ये पोहोचला. आरोपी इंगळे व इतरांनी ‘चल भुतेकरचे ७० हजार रुपये त्याला आताच दे अन् हे प्रकरण मिटविण्यासाठी आम्हालाही पैसे दे,’ असे म्हणत संदीपला धमकाविले.इकडे संदीपच्या वडिलांनी तातडीने पोलीस नियंत्रण कक्षात संपर्क साधून आपल्या मुलाचे काही जणांनी अपहरण केले असून, त्याला ते मिटमिट्याकडे घेऊन गेले आहेत, अशी माहिती कळविली. माहिती मिळताच गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शिवा ठाकरे, फौजदार गिरीधर ठाकूर, सुभाष खंडागळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी मिटमिट्याच्या दिशेने धाव घेतली. पोलिसांच्या गाड्या रस्त्यावर दिसताच आरोपींचे धाबे दणाणले. मिटमिट्याजवळच आरोपींनी संदीपला धमकावत कारमधून खाली ढकलून दिले. आरोपींचे असेही धाडसआरोपींच्या तावडीतून सुटका होताच संदीपने वडिलांशी संपर्क साधला. तेव्हा त्याचे वडील पोलीस आयुक्तालयात बसलेले होते. त्यांनी त्याला थेट आयुक्तालयात येण्यास सांगितले. रिक्षा पकडून तो पोलीस आयुक्तालयासमोर आला. विशेष म्हणजे आरोपी पप्पू इंगळे व फिरोज तांबोळी हे दोघे एका दुचाकीवर त्याचा पाठलाग करीत आले आणि त्यांनी आयुक्तालयाच्या प्रवेशद्वारातून पुन्हा संदीपचे अपहरण करण्याचा प्रयत्न केला; परंतु संदीपने आरडाओरड केल्याने तेथे असलेले गुन्हे शाखेचे पोलीस धावत आले आणि त्यांनी दोन्ही आरोपींना अटक केली.