शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

मराठवाड्यात पाऊस लांबल्याने खरीपाची ९ हजार कोटींची गुंतवणूक संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2018 11:37 IST

मराठवाड्याचे खरीप पीकाखालील क्षेत्र ४९ लाख ११ हजार हेक्टर असून त्यापैकी ४४ लाख १९ हजार हेक्टरवर पेरणी झाली आहे.

ठळक मुद्देमराठवाड्यात साधारण महिनाभरापासून पावसाने पाठ फिरविली आहे.यामुळे शेतीमधील अंदाजे ८ ते ९ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक संकटात आली आहे.

औरंगाबाद : मराठवाड्याचे खरीप पीकाखालील क्षेत्र ४९ लाख ११ हजार हेक्टर असून त्यापैकी ४४ लाख १९ हजार हेक्टरवर पेरणी झाली आहे. साधारण महिनाभरापासून पावसाने पाठ फिरविल्याने अंदाजे ८ ते ९ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक संकटात आली आहे.

मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, बीड आणि काही प्रमाणात उस्मानाबाद, परभणी जिल्ह्यात अपेक्षित पावसापेक्षा कमी पाऊस झाला आहे. त्यामुळे खरीप हंगामाची दुबार पेरणी करणेही अवघड असून दुष्काळाच्या उंबरठ्यावर मराठवाडा उभा आहे. येत्या काही दिवसांत अपेक्षित पाऊस झाला नाही तर परिस्थिती आवाक्याबाहेर जाण्याची चिन्हे आहेत. आॅगस्ट महिन्याचा तिसरा आठवडा सुरू झालेला आहे. या महिन्यांत दुबारपेरणी कशी करणार असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर असतांना कृषि विभागाने मराठवाड्यात दुबारपेरणीचे संकट असल्याचा अहवाल विभागीय प्रशासनाला गेल्या आठवड्यात दिला आहे.

विभागात मका २ लाख ३५ हेक्टरवर पेरणी करण्यात आला आहे. कापूस १४ लाख ३२ हजार हेक्टर (बोंडअळीच्या संकटाने पीक धोक्यात), तूर ४ लाख ३३ हजार हेक्टर, मूग १ लाख ६२ हजार हेक्टर, उडीद १ लाख ४५ हजार हेक्टर, सोयाबीन १७ लाख ५१ हजार हेक्टर, बाजरी १ लाख हेक्टरवर पेरणी करण्यात आली आहे. या सर्व पिकांना पावसाची आवश्यकता आहे. या सर्व पिकांच्या पेरण्याचा खर्च वेगवेगळा असतो. यातील मका, कापूस, सोयाबीन पेरणीचा खर्च जवळपास सारखाच असतो. कडधान्य व बाजरी पेरणीचा खर्च तुलनेने थोडा कमी येतो.

१५ ते २० हजारांचा हेक्टरी खर्च नांगरणीसाठी २५०० रुपये हेक्टरी खर्च झाला आहे. मोगडण्यासाठी १२५० रुपये, चरी पाडण्यासाठी १२५० रुपये, ५ हजार रुपयांचे बियाणे  हेक्टरी लागतात. निंदण्यासाठी ३ हजार ७५० रुपये हेक्टरी खर्च झाला आहे. १०:२६ च्या खतांच्या दोन बॅगा हेक्टरी लागल्या आहेत. शिवाय युरिया आणि फवारणीचा खर्च वेगळा झाला आहे. वखरण्यासाठी १२५० रुपये हेक्टरी खर्च झाला आहे. ४ वेळा शेतकऱ्यांनी वखरणी केली आहे. या सगळ्या खर्चाची गोळाबेरीज केली तर सरासरी १५ ते २० हजार रुपये हेक्टरी खर्च शेतकऱ्यांनी केला आहे. काही ठिकाणी जास्तीचा खर्च झाला असल्याचे गंगापूर तालुक्यातील आंबेगाव येथील शेतकरी मनोहर थोरात यांनी सांगितले. 

विभागीय महसूल उपायुक्त म्हणतात...मराठवाड्यातील खरीप हंगामाबाबत सोमवारी सचिव पातळीवर आढावा घेण्यात आला. खत, पेरणी, बियाणे, मजुरी, नांगरणी व इतर शेतीकामांच्या खर्चात वाढ होत आहे. विभागातील खरीप हंगामात शेतीमध्ये झालेल्या गुंतवणुकीचा निश्चित आकडा सांगणे अवघड आहे. परंतु जी काही गुंतवणूक विभागातील शेतकऱ्यांनी केली, ती पावसाअभावी संकटात असल्याचे प्रभारी महसुल उपायुक्त शिवानंद टाकसाळे यांनी व्यक्त केले. 

टॅग्स :MarathwadaमराठवाडाFarmerशेतकरीagricultureशेतीRainपाऊस