शहरं
Join us  
Trending Stories
1
“पंजाब स्फोटाबाबत भगवंत मान पाक ISIला क्लीन चिट का देतात, भाजपाशी एवढे वैर का?”: राघव चड्ढा
2
"माझ्या स्वतःच्याच बापाने माझ्या मुलीवर..., त्याला फाशी द्या', पुण्यातील चिमुकलीच्या आईचा आक्रोश
3
५ राज्यांत एकूण किती मुस्लीम उमेदवार निवडणूक जिंकले? बंगालमध्ये सर्वाधिक; भाजपचा एकही नाही!
4
अजितदादांच्या कार्याला सलाम, २१० किमी पोहायचा विक्रम; आर्यनसिंह यांनी घेतली सुनेत्रा पवारांची भेट
5
प्रेयसीसोबत हॉटेलमध्ये गेलेल्या तरुणाचा संशयास्पद मृत्यू; बेडजवळ मिळालं औषधांचं पाकीट
6
Ahilyangar: "घर बांधण्यासाठी माहेरहून ४ लाख रुपये आण" सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेचं टोकाचं पाऊल
7
वॉशिंग मशीन वापरताना 'ही' चूक टाळा; कपडे होतील लवकर खराब, खिशालाही लागेल कात्री
8
'ऑपरेशन सिंदूर'चा विसर पडला? पाक परराष्ट्र मंत्र्यांचा थयथयाट; सिंधू नदीच्या पाण्यावरून भारताला दिला इशारा
9
Top Marathi News LIVE: मुंबई हायकोर्टाकडून बेकायदा फेरीवाल्यांबाबत नाराजी, अहवाल सादर करण्याचे दिले निर्देश
10
West Bengal Violence: हिंसेचा भडका! भाजपा आमदाराच्या भावाची हत्या, हिंसाचारात आतापर्यंत चौघांचा मृत्यू; जवानांवरही गोळीबार
11
४ चतुर्थी १ अंगारकी, ४ एकादशी, २ गुरुपुष्यामृत योग, ज्येष्ठ ठरणार खास; अधिक मासातील व्रते-सण
12
IPL 2026: बंगळुरूमध्ये होणाऱ्या अंतिम सामन्याची जागा का बदलण्यात आली? अचानक असं काय घडलं?
13
बंगालमध्ये भाजपा जिंकली, पण फायदा काँग्रेसचा, अनेक वर्षांपासून तृणमूलच्या ताब्यात असलेलं कार्यालय झालं मुक्त
14
दिवस-रात्र 'एसी'चा गारवा; मग लगेच थांबा; तुमच्या आरोग्यावर होतील गंभीर परिणाम
15
स्वामींच्या मठात काय करू नये? सगळी सेवा एका क्षणात शून्य होईल; ‘हे’ केल्यास पुण्यच लाभेल!
16
Hanta Virus : ताप, खोकला, श्वास घेण्यास त्रास... हंता व्हायरसने घेतला ३ जणांचा बळी, 'ही' आहेत लक्षणं
17
तामिळ इंडस्ट्रीमधील स्टार, लेखिका, दिग्दर्शिका म्हणून काम, कोण आहे विजयची आई?
18
"...तर पाकिस्तानी खेळाडू भारतात खेळू शकतात" सरकारचा मोठा निर्णय!
19
Akola Crime: आई-वडील कामावर जाताच राक्षसी कृत्य; चिमुकलीवर शेजारी राहणाऱ्या ६० वर्षाच्या व्यक्तींकडून अनेकवेळा अत्याचार
20
"भारतात स्फोट होतच असतात, यात नवीन काय?" पंजाबमधील स्फोटांवर फारुख अब्दुल्लांचे वादग्रस्त विधान
Daily Top 2Weekly Top 5

खाम नदी सिव्हरेजमुक्त करण्याची गरज

By admin | Updated: September 4, 2014 00:55 IST

नजीर शेख, औरंगाबाद सिव्हरेजचे पाणी आणि मैला नाल्यात आणि त्याद्वारे नदीत सोडणारे कदाचित औरंगाबाद हे एकमेव शहर असेल

नजीर शेख, औरंगाबाद
सिव्हरेजचे पाणी आणि मैला नाल्यात आणि त्याद्वारे नदीत सोडणारे कदाचित औरंगाबाद हे एकमेव शहर असेल. यामुळे शहरातील नाले आणि खाम नदी दुर्गंधीयुक्त झाली असून खाम नदी सिव्हरेजमुक्त करण्याची गरज असल्याचे मत, अकोला अर्बन बँकेचे चेअरमन पुरुषोत्तम हेडा यांनी व्यक्त केले.
‘माझ्या शहरात काय हवे?’ यासंदर्भात त्यांनी आपली मते मांडली. पाणी आणि सिव्हरेज ट्रीटमेंट प्लांट याबाबत आपण फारसे गंभीर नाही, असे चित्र आहे. शहरातील मैला वाहणाऱ्या वाहिन्या आपण नाल्यातून आणि खाम नदीतून नेल्या आहेत. फुटलेल्या वाहिन्यांमुळे हा मैला नदीत आणि नाल्यांत मिसळतो. अतिक्रमण आणि प्रदूषण यामुळे खाम नदी ‘गंदा नाला’ बनली आहे. आपल्याकडे एक गंमतच आहे असे म्हणावे लागेल. शहरातील नाल्यांचे पाणी आणि खाम नदीचे दूषित पाणी पुढे जाऊन ब्रह्मगव्हाणजवळ जायकवाडी धरणाच्या पाण्यात मिसळते. आपण पुन्हा जायकवाडीचे शुद्ध पाणी शहरात आणतो. देशामध्ये आता गंगा नदीच्या प्रदूषण मुक्तीचा विषय चर्चिला जात आहे. आपणही आपल्या गावातील नदी प्रदूषणमुक्त व्हावी, यासाठी का प्रयत्न करू नयेत. आपण याचे मायक्रोबायोलॉजिकल विश्लेषण केले तर आपल्याला धक्कादायक गोष्टी आढळून येतील. शहरातील मैला वाहून जाण्यासाठी आणि ट्रीटमेंट प्लांटसाठी वेगळा विचार करण्याची गरज आहे. शहरातील नाल्यांची दुर्गंधी जीवघेणी आहे. तरीही काही लोक याठिकाणी राहतात. खरे तर पर्यटन राजधानी असलेल्या आपल्या शहरात दुर्गंधीचे असे साम्राज्य असणे चांगली गोष्ट नाही. शासनाकडून विविध योजनांसाठी पैसा येतो. तो जातो कुठे, असाही प्रश्न आहे. खाम नदीच्या तीरावर औरंगाबाद शहर वसले आहे, हे नदीचा गंदा नाला झाल्यानंतर आपल्याला कसे सांगता येईल. कोणत्याही परिस्थितीत सिव्हरेजचे पाणी नाल्यात किं वा खाम नदीत मिसळले जाता कामा नये.
पाण्याचे ओहोळ जपले पाहिजेत
शहरीकरणामध्ये आपण पाण्याचे ओहोळ दुलर्क्षित करून चालणार नाही. सध्या डीएमआयसीसाठी भूसंपादनाची प्रक्रिया चालू आहे. या जमिनीच्या ठिकाणी असलेले नैसर्गिक प्रवाह, नाले, लहान बंधारे याबाबत विचार व्हायला हवा.
उद्योगांसाठी आपण जमीन सपाटीकरण करीत असताना या प्रवाहांचा विचार करायला हवा, असे मला वाटते. शहरीकरणामध्येही ‘वॉटर बॉडीज’ टिकल्या पाहिजेत. पाण्याचे निसर्गनिर्मित असलेले स्रोत आणि प्रवाह महत्त्वाचे असतात. असे प्रवाह न करता पाणी त्याच ठिकाणी जिरले पाहिजे, अशी यंत्रणा निर्माण करता येऊ शकते. औद्योगिकीकरणासाठी या पाण्याचा मोठा हातभार लागू शकतो.
आम्ही जटवाडा परिसरात पाण्याच्या प्रवाहांचा अभ्यास करून बंधाऱ्यांचे काम केले आहे. पर्जन्यमान कमी असलेल्या आपल्या प्रदेशात आपण पाण्याच्या स्रोताबाबत गंभीर होण्याची गरज आहे. पाणी आणि सिव्हरेज याबाबत आपल्या शहरात चिंतन होण्याची गरज आहे.