शहरं
Join us  
Trending Stories
1
ढगांचा गडगडाट, विजांचा कडकडाट... पनवेल, नवी मुंबई, रायगडात पावसाची हजेरी, नागरिकांची तारांबळ
2
Latest Marathi News LIVE Updates: मध्य रेल्वेची सेवा आजही विस्कळीत, डोंबिवली स्थानकावर प्रचंड गर्दी; चाकरमान्यांचे हाल
3
ट्रम्प आता पाकिस्तानचेही ऐकेनात, इराणला दिली उघड धमकी; म्हणाले, “करार होत नाही तोपर्यंत...”
4
Raigad Crime: तरुणीचा रक्ताच्या थारोळ्यात विवस्त्र अवस्थेत सापडला मृतदेह; लॉजमध्ये हत्या करून आरोपी फरार
5
धडधड वाढली, युद्ध पुन्हा पेटणार? नेतन्याहू म्हणाले, "इराणमधील आमचे मिशन अजून बाकी आहे"; ट्रम्प यांचीही धमकी
6
“जिथे कोणी जात नाही तिथे मी जातो”; DCM शिंदेंचा दुर्गम भागापर्यंत विकास पोहोचवायचा निर्धार
7
IPL 2026: अवघ्या ३० रूपयांनी बदललं Ashwani Kumarचं नशीब; ४ बळी घेत Mumbai Indiansला जिंकवलं!
8
आजचे राशी भविष्य: २१ एप्रिल २०२६: हाती घेतलेली कामे पूर्ण होतील, 'या' राशींना धनलाभाचा योग
9
“महिला आरक्षणावरील चर्चेसाठी CM फडणवीसांनी PM मोदींनाही आणावे”; प्रणिती शिंदेंचे प्रतिआव्हान
10
Supreme Court: फक्त उच्च शिक्षण पुरेसे नाही, सरकारी नोकरीसाठी सर्वोच्च न्यायालयाने घातली अट!
11
शनि नक्षत्र गोचर २०२६: ८ राशींची भरभराट, नवीन नोकरीची संधी; उत्पन्नात वाढ, पण बजेट सांभाळा!
12
Learning License: लर्निंग लायसन्स प्रक्रिया पुन्हा 'ऑफलाईन'; गैरप्रकार रोखण्यासाठी आरटीओचे पाऊल
13
Government Employees Strike: सरकारी कर्मचारी, शिक्षक आजपासून बेमुदत संपावर, त्यांच्या मागण्या काय आहेत? 
14
Jammu Ramnagar Bus Accident: चालकाचे नियंत्रण सुटलं, बस डोंगरावरून १०० मीटर खोल दरीत कोसळली, २१ जण ठार
15
Ashwini Paul: पार्टनरला भेटायला गेली अन् बनली ड्रग्ज सप्लायर, कोण आहे अश्विनी पॉल?
16
नेस्को ड्रग्ज प्रकरण: अनेक ड्रग्ज पेडलर्स, कॉन्सर्टमध्ये ‘विदाउट तिकीट’!
17
Donald Trump: शांतता करार आजच होणार; इराणचे शिष्टमंडळही पोहोचणार, डोनाल्ड ट्रम्प काय म्हणाले?
18
ट्रम्प यांचा इराणला थेट इशारा! 'युद्धविराम संपला तर एवढे बॉम्ब पडतील की...', इस्लामाबाद चर्चेआधी तणाव वाढला!
19
...तर इराणवर पुन्हा ड्रोन-क्षेपणास्त्रांचा वर्षाव? "मोहीम अद्याप संपलेली नाही"; व्हाइट हाऊसनंतर आता नेतन्याहू यांचाही थेट इशारा
20
GT vs MI : हा माझा प्रॉब्लेम नाही! तिलक-बुमराहसंदर्भातील कळीच्या मुद्यावर पांड्या स्पष्टच बोलला
Daily Top 2Weekly Top 5

उटी ग्रामपंचायतचे ‘कन्या’ प्रोत्साहन

By admin | Updated: August 24, 2014 00:20 IST

औसा : मुलींची संख्या घटत असल्याने त्यावर चिंता व्यक्त करीत औसा तालुक्यातील उटी बु़ येथील ग्रामपंचायतीने वर्षभराच्या कालावधीत जन्मलेल्या मुलीच्या नावे

औसा : मुलींची संख्या घटत असल्याने त्यावर चिंता व्यक्त करीत औसा तालुक्यातील उटी बु़ येथील ग्रामपंचायतीने वर्षभराच्या कालावधीत जन्मलेल्या मुलीच्या नावे पाच हजार रूपयांची बचत ठेवण्याचा उपक्रम राबविण्यास सुरुवात केली आहे़ मुलगा-मुलगी एकसमान असा नारा देण्यात येत असला तरी ग्रामीण भागातील नागरिकांच्या मनामध्ये अद्याप ही भावना रूजली नाही़ त्यामुळे मुलगा-मुलगी यांच्या संख्येतील अंतर कायम राहत आहे़ शासनाच्या वतीने विविध उपक्रम राबवून हा दुरावा दूर करण्याचा आणि मुलींची संख्या वाढविण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे़ शासनाच्या या उपक्रमास आणखी बळ मिळावे म्हणून औसा तालुक्यातील उटी बु़ येथील ग्रामपंचायतीने कन्या प्रोत्साहन योजना राबविण्यास सुरुवात केली आहे़ उटी बु़ हे केवळ २ हजार लोकसंख्येचे गाव आहे़ गावातील निरक्षर नागरिकांत मुलगा-मुलगी समान असल्याची भावना रूजावी़ तसेच स्व़ विलासराव देशमुख यांच्या स्मृति आठवणीत रहाव्यात म्हणून विलासराव देशमुख यांच्या स्मृतीदिनाचे औचित्य साधून ही योजना सुरु केली आहे़ येत्या १५ आॅगस्ट २०१५ पर्यंत गावात जन्मलेल्या प्रत्येक मुलीच्या नावे ५ हजार रूपयांची बचत करण्यात येणार आहे़ ही रक्कम सदरील मुलगी उपवर झाल्यानंतर तिला मिळणार आहे़ त्यामुळे या योजनेला स्व़ विलासराव देशमुख कन्या प्रोत्साहन योजना नाव देण्यात आले आहे़ या नाविण्यपूर्ण योजनेचे गावकऱ्यांतून स्वागत होत असल्याने मुला-मुलींतील दरी कमी होण्यास मदत होणार आहे़ (वार्ताहर) ग्रामीण भागातील नागरिकांत मुलीबद्दल आजही अनास्था असल्याचे दिसून येते़ त्यामुळे मुलगी ही परक्याचे धन असल्याचे चर्चिले जाते़ ही मानसिकता दूर व्हावी म्हणून आपण ग्रामपंचायतीच्या वतीने कन्या प्रोत्साहन योजना राबविण्यास सुरुवात केल्याचे सरपंच अ‍ॅड़ भालचंद्र पाटील यांनी सांगितले़ विशेष म्हणजे ग्रामपंचायतीच्या सर्व सदस्यांनी या योजनेस उत्स्फूर्तपणे पाठींबा दिला असल्याचे त्यांनी सांगितले़