कंधार आगाराची मराठवाड्यात भरारी
By Admin | Updated: June 11, 2014 00:23 IST2014-06-10T23:54:07+5:302014-06-11T00:23:54+5:30
डॉ. गंगाधर तोगरे, कंधार रस्त्याची दयनीय अवस्था चालक-वाहक, यांत्रिकी, लिपिक आदी कर्मचाऱ्यांची अपुरी संख्या खिळखिळ्या बसेस आदी अडथळ्यावर मात करत कंधार आगाराने नवा इतिहास रचला आहे.
कंधार आगाराची मराठवाड्यात भरारी
डॉ. गंगाधर तोगरे, कंधार
रस्त्याची दयनीय अवस्था चालक-वाहक, यांत्रिकी, लिपिक आदी कर्मचाऱ्यांची अपुरी संख्या खिळखिळ्या बसेस आदी अडथळ्यावर मात करत कंधार आगाराने नवा इतिहास रचला आहे. आगाराने मराठवाड्यात द्वितीय व जिल्ह्यात सर्वाधिक गुणांक प्राप्त करत नवी भरारी मारली आहे. एप्रिल २०१४ मधील पॅरामीटरमधील गुणतालिकेची ही किमया साधली आहे.
कंधार आगारात बसेसची संख्या ६६ आहे. त्यात ३ मिडी बसेस आहेत. लांब पल्ल्यासाठी २६ बसेसची सोय करण्यात आली आहे. चालक संख्या १४५, वाहक संख्या १३८ असून त्यात महिला वाहकसंख्या २५ आहे. यांत्रिकी कर्मचारी संख्या ३९ असून पर्यवेक्षक, लेखापाल, लिपिक, सेवक आदी कर्मचारी २३ आहेत. यांत्रिकी कर्मचाऱ्यांची संख्या बसेस संख्येएवढी अपेक्षित आहे. परंतु २७ ने कमी आहे. चालकसंख्या १५३ असावी. तेथेही ८ ने कमी आहे. वाहकाची संख्या सुद्धा १५३ अपेक्षित आहे. परंतु १५ ने कमी वाहक आहेत.
कर्मचाऱ्यांची अपुरी संख्या, रस्त्यावरील खड्डे व बसेसचीसुद्धा कमालीची बकालअवस्था आहे. तरीही आगारप्रमुखांचे नियोजन, सर्व कर्मचाऱ्यांची प्रयत्नांची पराकाष्ठा, प्रवाशांच्या सोयीसाठीची समर्पित भावना, जिद्द आदीमुळे एप्रिल २०१४ मध्ये यशाला गवसणी घालण्यात सामूहिक यश मिळाले आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांत नवचैतन्य निर्माण झाल्याचे दिसत आहे. परॉमिटरमधील निकषानुसार आगाराला मिळालेल्या गुणांची सरशी नजरेत भरणारी आहे. समस्यांचा बागूलबुवा न करता त्यावर यशस्वी मात करण्यात आली.
प्रति कि. मी. इंधन वापर व त्यातून केलेली बचत यासाठी १० गुण होते. त्यात कंधार आगाराला १३ गुण मिळाले. प्रति कि. मी. अर्निंगसाठी २५ पैकी २३.७२ गुण, कास्ट प्रति कि. मी. साठी २५ पैकी ३२.३५ गुण, बसेसचा वापर ७ पैकी १० गुण, ताफ्यातील बसचा वापर ३.६ पैकी ६ गुण, फेऱ्या रद्दसाठी ५ पैकी ३.९६ गुण, नवीन टायर वापर ६ पैकी २.२०, रिमोल्ड टायर ५ पैकी ८ गुण, किती वेळा रिमोल्ड ५ पैकी ३ गुण वजा, किती टक्के रिमोल्ड ४ पैकी ०.२० गुणवजा, अपघाताचे प्रमाण ५ पैकी ८ गुण असे १०० पैकी कंधारला १०३.७३ गुण प्राप्त झाल्याने नांदेड विभाग मराठवाड्यात द्वितीय राहिला. जालना विभाग प्रथमस्थानी राहिला आहे. नांदेड विभागात नांदेड, किनवट, भोकर, देगलूर, हदगाव, बिलोली, कंधार, माहूर, मुखेड असे ९ आगाराची संख्या आहे. कंधार आगाराने १०३.७३ गुण मिळवित सरशी साधली. मुखेड आगाराने ९७.०९ गुण व माहूर आगाराने ८६.१४ गुणांची कमाई करत चांगली कामगिरी केली. परंतु नांदेड, भोकर, किनवट, देगलूर, हदगाव व बिलोली आगार बरेच दूर राहिल्याने चांगल्या गुणांची कमाई करण्यात अपयश आले. आगाराने सात वर्षांपूर्वी राज्यात छाप सोडली होती. त्या दिशेने वाटचाल व्हावी, प्रवाशांना सोयी-सुविधा घाव्यात, काटकसर, बचत करुन आगारश्रेणी व गुणांक वाढवावा, अशी अपेक्षा प्रवाशांतून व्यक्त केली जात आहे.
आगारात ६६ बसेस
कंधार आगारात ६६ बसेसची संख्या आहे. त्यात ३ मिडी बसेस आहेत. लांब पल्ल्यासाठी २६ बसेसची सोय केली आहे. चालक संख्या १४५, वाहक संख्या १३८ असून त्यात महिला वाहकसंख्या २५ आहे. यांत्रिकी कर्मचारी संख्या ३९ असून पर्यवेक्षक, लेखापाल, लिपिक, सेवक आदी कर्मचारी २३ आहेत. यांत्रिकी कर्मचाऱ्यांची संख्या बसेस संख्येएवढी अपेक्षित आहे. परंतु २७ ने कमी आहे. चालक संख्या १५३ असावी. तेथेही ८ ने कमी आहे. वाहकाची संख्यासुद्धा १५३ अपेक्षित आहे. परंतु १५ ने कमी वाहक आहेत.
आगारातील सर्व संघटना व त्यांच्या प्रतिनिधींनी चालक-वाहक, यांत्रिकी कर्मचारी आदींनी आपली व्यक्तिगत कामांना बगल दिली. अनेकांनी हक्काच्या रजा उपभोगल्या नाहीत. त्यामुळे आगार चांगली कामगिरी करु शकले. सर्वांचे सहकार्य घेऊन राज्य पातळीवर लौकीक वाढविण्याचा प्रयत्न करणार आहे- के. व्ही. कऱ्हाळे
आगारप्रमुख, कंधार