शहरं
Join us  
Trending Stories
1
अग्निमित्रा पॉल यांना दिल्लीतून बोलावणे...! पश्चिम बंगालच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची चर्चा, अमित शाह निवडणार... 
2
Top Marathi News Live: पश्चिम बंगालमध्येही भाजपाचे धक्कातंत्र? मुख्यमंत्रिपदासाठी 'दिल्ली पॅटर्न'?
3
६ राज्ये, १९ जिल्हे आणि ८३ लाख लोकांना थेट फायदा; ₹२३,४०० कोटींमध्ये रेल्वे करणार 'हे' महत्त्वाचं काम
4
पाकिस्तानला अमेरिकेचा मोठा धक्का! सुरक्षेच्या कारणास्तव दूतावास कायमचा बंद केला
5
नसरापूर प्रकरण: …तर राज ठाकरेंवर दाखल होऊ शकतो गुन्हा, असीम सरोदेंचा दावा
6
'प्रोजेक्ट फ्रीडम' बंद, होर्मुझमधील जहाजांना यापुढे सुरक्षा देणार नाही; ट्रम्प यांची मोठी घोषणा
7
'राजा शिवाजी'मध्ये विद्या बालनच्या जागी दिसली असती 'ही' अभिनेत्री, मात्र दिला नकार; कारण...
8
डॉ. संग्राम पाटील यांचा यूकेमध्ये जाण्याचा मार्ग मोकळा; हायकोर्टाने दिला दिलासा, काय म्हटलं?
9
प्रसिद्ध अभिनेत्रीने सांगितलं इंडस्ट्रीतलं वास्तव, म्हणाली, "किसींग सीनला नकार, थकलेले मानधन..."
10
ममता बॅनर्जी राजीनामा देणार नाहीत, निवडणूक आयोगाने नोटिफिकेशन जारी केले; भाजप सत्ता कशी स्थापन करणार?
11
Palghar Crime: अघोरी पूजेसाठी बोलावले अन् १३ वर्षाच्या मुलीवर भोंदूबाबाने केला बलात्कार, पालघर हादरले
12
Samudrik Shastra: गालावरची खळी: केवळ सौंदर्य की भाग्याचं लक्षण? सामुद्रिक शास्त्र काय सांगते?
13
Multibagger Stock : १ लाखाचे बनले ३ कोटी रुपये; या शेअरनं दिला ३१०००% पेक्षा अधिक रिटर्न, एकेकाळी ₹१० पेक्षा कमी होती किंमत
14
आसाम, बंगालमधील विजयानंतर भाजपा ‘या’ राज्यात ऑपरेशन लोटसच्या तयारीत? बड्या नेत्याने दिले संकेत
15
पंजाबमध्ये हायअलर्ट! जालंधरनंतर अमृतसरमध्येही स्फोट; लष्करी तळ आणि BSF मुख्यालयाजवळ खळबळ
16
ममतांचा किल्ला कसा भेदला? काय होता विजयाचा फॉर्म्युला? भाजपचे चाणक्य अमित शाह यांच्या प्लॅनची ‘इनसाइड स्टोरी’
17
पश्चिम बंगालमध्ये मोठा राडा! भाजपने मध्यरात्री हॉग मार्केटमधील तृणमूल काँग्रेसचे कार्यालय पाडले, बुलडोझर आणला अन्...
18
तामिळनाडूत विजय होणार मुख्यमंत्री; काँग्रेसची पाठिंबा देण्याची तयारी, पण त्याबदल्यात काय हवं?
19
पाकिस्तान नौदलाने मदतीसाठी काश्मीर जहाज पाठविले! अरबी समुद्रात अडकलेल्या ७ भारतीय खलाशांची केली मदत
20
आजचे राशीभविष्य ६ मे २०२६: आर्थिक गुंतवणुकीसाठी अनुकूल दिवस, धनलाभ होण्याची शक्यता
Daily Top 2Weekly Top 5

कल्पनाला एडस्ने पुन्हा ‘अनाथ’ केले

By admin | Updated: June 10, 2014 00:41 IST

सोमनाथ खताळ, बीड लहानपणीच आई-बाबा गेले. अनाथाश्रमात वाढत असताना एका महिलेने जवळ केले. मायेची ऊब दिली. लग्नाचे वय झाले. चांगला नवरा पाहून मुलीचे हात पिवळे केले. दीड वर्ष सुखाचा संसार चालला.

सोमनाथ खताळ, बीडलहानपणीच आई-बाबा गेले. अनाथाश्रमात वाढत असताना एका महिलेने जवळ केले. मायेची ऊब दिली. लग्नाचे वय झाले. चांगला नवरा पाहून मुलीचे हात पिवळे केले. दीड वर्ष सुखाचा संसार चालला. घरात पाळणा हालला आणि सारेच बदलले. कन्यारत्न पाहून साऱ्यांनाच आनंद झाला असताना आईला एडस्ची लागण झाल्याचे समोर आले. पायाखालची जमीनच सरकली. प्रेम करणारे सारेच हात दुरावले. मुलाचे दुसरे लग्न करण्यासाठी सासरच्यांनी एका क्षणात तिला पुन्हा ‘अनाथ’ करुन टाकले. कल्पना (२७ नाव बदललेले) आई-बाबाविशषयी फारसे आठवत नाही. ते गेल्याने अनाथ आश्रम हेच घर बनले. पुढे पुण्यातील एका कामगार महिलेने दत्तक घेत कल्पनाला मायेची ऊब दिली. पाहता-पाहता कल्पना लग्नाला आली. पुण्यातील कात्रज भागात राहणाऱ्या व एका खासगी कंपनीत नोकरी करणाऱ्या मुलासोबत तिचे लग्न लावून देण्यात आले. काही दिवसांत गुड न्यूज मिळाली. अनाथ कल्पनाला आकाश ठेंगणे झाले. सासरचे लोकही आनंदले. कल्पनाने गोंडस मुलीला जन्म दिला. कल्पनाची प्रसूती झाल्यानंतर डॉक्टरांनी दिलेल्या अहवालात तिला एड्सची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आणि सुखाच्या संसारात मिठाचा खडा पडला. प्रेमाचे हात दुरावले. मुलाचा दुसऱ्या लग्नाचा विचार सुरू झाला. या विचारांनी सोमवारी टोक गाठले. सासू-सासरा आणि एका शेजारच्या महिलेने कल्पनाला उपचाराचे कारण सांगून थेट बीड गाठले आणि इन्फंड इंडिया संस्थेत तिला दाखल केले. तिच्या आठ महिन्यांच्या मुलीला सोबत घेऊन ते सर्वजण पुण्याला परतले. या संस्थेत अशा ५३ एचआयव्हीबाधितांचा सांभाळ केला जात आहे. कल्पना सध्या गरोदर आहे. आपल्या मुलीचा आणि पतीचा अहवाल निगेटीव्ह असल्याचे ती सांगते. एचआयव्हीची लागण झाल्याचे कळल्यानंतर पुन्हा गर्भ ठेवण्याचा निर्णय दोघांनीही घेतला का, या प्रश्नाचे उत्तर ती देऊ शकली नाही. फारसे काही बोलण्याच्या मनस्थितीत नसलेल्या कल्पनाला लहानपणी माकड आणि कुत्र्याने चावले. तब्बल ३९ इंजेक्शन त्यावेळी घ्यावे लागले. यातूनच एड्सची लागण झाली असावी, असा दावा ती करते. कल्पनाला मायेची उब देण्याचे प्रयत्न आम्ही करू असे इन्फंड इंडीया संस्थेचे संचालक दत्ता बारगजे, संध्या बारगजे यांनी सांगितले.बाळाची आठवण येतेय!माझी चिमुकली अवघ्या आठ महिन्यांची आहे. ती खूप गोड आहे. मला इकडे सोडताना तिला भेटूसुद्धा दिले नाही. मला तिची खूप आठवण येतेय. माझ्या चिमुकलीला चांगले सांभाळावे, एवढीच माझी इच्छा असल्याचेप सांगताना कल्पनाच्या आश्रूंचा बांध फुटला.