जालन्यात पाणीपट्टीची केवळ २ टक्केच वसुली

By Admin | Updated: December 30, 2014 01:07 IST2014-12-30T01:07:45+5:302014-12-30T01:07:45+5:30

जालना : शहरात गेल्या अनेक दिवसांपासून पाणीपुरवठा कराची थकबाकी ७ कोटींवर पोहोचली असून मागील काळात वसुली केवळ २ टक्केच झाल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे.

Just two percent of the water tax recovery in Jalna | जालन्यात पाणीपट्टीची केवळ २ टक्केच वसुली

जालन्यात पाणीपट्टीची केवळ २ टक्केच वसुली


जालना : शहरात गेल्या अनेक दिवसांपासून पाणीपुरवठा कराची थकबाकी ७ कोटींवर पोहोचली असून मागील काळात वसुली केवळ २ टक्केच झाल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी वसुली पथकातील १० कर्मचाऱ्यांना मुख्याधिकाऱ्यांनी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
चार लाख लोकसंख्येच्या या शहरात सुमारे १८ हजार अधिकृत जोडण्या आहेत. परंतु मालमत्ता कराबरोबरच पाणीपट्टी कराची थकबाकीही वाढत गेली. २०१२ च्या दुष्काळी परिस्थितीत काही नवीन भागात जलवाहिन्या अंथरण्यात आल्या. तेथे काहींनी अधिकृत जोडण्या केल्या. मात्र काही अनधिकृत जोडण्या आहेत. त्यासाठी स्वतंत्र पथक तयार करण्यत आलेले आहे.
गेल्या दीड वर्षांपासून जालना शहरासाठी जायकवाडी पाणीपुरवठा योजना तयार करण्यात आली. त्यासाठी दरमहा ४० लाखांच्या विद्युत देयकाचा भरणा पालिकेला करावा लागतो. परंतु पाणीपुरवठा कराची वसुली अपेक्षेप्रमाणे होत नसल्याने या थकबाकीची रक्कम ७ कोटींवर पोहोचली.
एकीकडे थकबाकीचे वाढते प्रमाण आणि दुसरीकडे शहरवासियांना नियमित पाणीपुरवठा करण्यासाठी विद्युत देयकाची रक्कम भरताना पालिका प्रशासनाला करावी लागणारी कसरत यामुळे अनेकवेळा मोठा पेच निर्माण होत असे. (प्रतिनिधी)

Web Title: Just two percent of the water tax recovery in Jalna