शहरं
Join us  
Trending Stories
1
"मला पक्षात पद..."; उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होण्याच्या चर्चांवर आदित्य ठाकरेंची सूचक पोस्ट
2
अमेरिकन नौदलाला इराणचा खुलं आव्हान! डोळ्यांदेखत टँकरने ओलांडली 'होर्मुझ'; ट्रम्प यांचे सैन्य पाहतच राहिले
3
याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले
4
५९१ कोटींचा तोटा; ३१ पैकी ८ विभाग नफ्यात, STचा तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश
5
कधी राहुल गांधी, कधी खर्गे, आता सिद्धरामय्या! काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांच्या कानात काय बोलले मोदी? 'तो' फोटो देशभर व्हायरल!
6
हायप्रेशर स्टील ट्यूब फुटली अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं; ७०० डिग्री वाफेने वेढलं अन् १७ जणांचा कोळसा झाला
7
पाकिस्ताननं पाठवले १३००० सैनिक; आता सौदीने दिले ३ अब्ज डॉलर, एका सैनिकाची किंमत किती?
8
Latest Marathi News LIVE Updates: अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
9
IPL 2026: MS Dhoni च्या चाहत्यांची धाकधूक वाढली... १६ एप्रिलला 'थाला' मोठा निर्णय घेणार!
10
"उबाठा गट ताब्यात घेण्याचे संजय राऊतांचे प्रयत्न, आदित्य ठाकरेंशी 'सामना"; भाजपा नेत्याचा दावा
11
होर्मुझ तणावात पुतिन यांचा मास्टरस्ट्रोक! इराणी युद्धावर चीनमध्ये बनणार 'गेमप्लॅन'; अमेरिकेला शह?
12
२०२६चा पहिला गुरुपुष्यामृत योग कधी? ‘इतके’ तास आहे शुभ मुहूर्त; पाहा, महत्त्व अन् मान्यता
13
खळबळजनक! ओडिशातील सरकारी शाळेत अन्नातून विषबाधा; १०० विद्यार्थी आजारी, एकाचा मृत्यू
14
कानपूर किडनी रॅकेटचा असा झाला पर्दाफाश, गर्लफ्रेंडची एक चूक नडली अन् पकडला गेला गुन्हेगार!
15
Video - इन्स्टा रीलमुळे वाचला जीव; बोट दुर्घटनेवेळी मृत्यूशी झुंज, महिलेने सांगितला थरारक प्रसंग
16
Travel: ओमानमध्ये भारताचे १० हजार रूपये घेऊन जाताय; इतक्या पैशात काय काय खरेदी करू शकाल?
17
युक्रेनच्या रोबो आर्मीने केली कमाल, रशियन सैनिकांना सरेंडर करण्यास भाग पाडून पोस्टवर केला कब्जा
18
अक्षय्य तृतीयेपूर्वी २९३८ रुपयांनी महागलं सोनं, चांदीच्या दरातही १३ हजारांपेक्षा अधिक तेजी; पाहा नवे दर
19
'आप'ने राघव चड्ढांवर केली आणखी एक कारवाई; पंजाब सरकारने Z+' सुरक्षा काढून घेतली
20
“आयुष्यभराची इच्छा पूर्ण झाली”; कर्नाटकातील १४ काँग्रेस आमदार अयोध्येत, घेतले रामदर्शन
Daily Top 2Weekly Top 5

केवळ मलमपट्टी!

By admin | Updated: September 4, 2014 01:26 IST

सोमनाथ खताळ , बीड शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. हे खड्डे बुजविण्यास बुधवारी सुरूवात केली मात्र खड्ड्यांमध्ये मोठ मोठे दगड असलेला

सोमनाथ खताळ , बीड शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. हे खड्डे बुजविण्यास बुधवारी सुरूवात केली मात्र खड्ड्यांमध्ये मोठ मोठे दगड असलेला मुरूम टाकून केवळ मलमपट्टी करण्याचे काम संबंधित विभाग करीत होता. या मलमपट्टीमुळे अपघात रोखण्याऐवजी वाढण्याचीच अधिक भीती वर्तविली जात आहे. खड्डे बुजविण्यास सुरूवात झाली असली तरी अपघाताची मालिका मात्र काही केल्या थांबत नव्हती. अनेक दिवसांपासून हुलकावणी दिलेल्या पावसाने मागील पंधरा दिवसांपासून जिल्ह्यात ठिकठिकाणी बरसायला सुरूवात केली आहे. या पावसामुळे बळीराजा खूश झाला आहे. याच पावसाने महामार्गाचे निकृष्ट दर्जाचे झालेले काम जनतेसमोर आले आहे. जालना रोडहून बार्शीनाका हे अंतर पार करण्यासाठी वाहनचालकांना तब्बल अर्ध्या तासाचा अवधी लागतो. या रस्त्यावरून अवजड वाहनांची वाहतूक खूप मोठी असून त्यांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. अगोदरच बीड शहराला बायपास आणि उड्डाणपूल नसल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. यातच आणखी भर म्हणून महामार्गावर खड्डे पडले आहेत. याच खड्ड्यांंमुळे सध्या छोटे-मोठे अपघात मोठया प्रमाणात घडत आहेत. मागील पंधरा दिवसांपासून दुचाकी घसरणे, चारचाकी वाहन खड्ड्यांंमध्ये आदळून पार्ट तुटणे, अवजड वाहने पुढे चालत असताना मागील वाहन खड्ड्यांत आदळून अपघात होणे, यासारखे अनेक छोटेमोठे अपघात घडत आहेत. मंगळवारी जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी महामार्गावरील खड्ड्यांची पाहणी केली होती. त्यानंतर बुधवारी महामार्गावरील खड्डे बुजविण्यास सुरूवात करण्यात आली होती. मात्र हे खड्डे मोठ मोठे दगड असलेला मुरूम टाकून बुजविले जात होते. त्यामुळे जी अपघाताची मालिका सुरू होती, ती काही केल्या बंद झाली नव्हती. संघटना, पुढारी झोपले! एवढे जीवघेणे खड्डे महामार्गावर पडले असताना कोणतीही सामाजिक संघटना, पुढारी यावर आवाज उठविण्यास तयार नाहीत. एरव्ही प्रसिद्धीसाठी पुढे पुढे करणारे सामाजिक कार्यकर्ते, पुढारी गेले कुठे? असा सवाल सर्वसामान्यांमधून उपस्थित केला जात आहे. नगर रोडवर टाकली बारीक खडी बुधवारी नगर रोडवरीलही खड्डे बुजविण्यास सुरूवात केली होती. या खड्ड्यांमध्ये टाकण्यात येणारा मुरूमही खराब होता. तसेच मुरूम टाकल्यानंतर पाणी टाकून १० एमएमची बारीक खडी त्यावर टाकण्यात येत होती. मात्र बुजविलेले खड्डे किती दिवस टिकतील? हे सांगणे कठीणआहे. मोठा पाऊस आला तर लवकरच हे खड्डे उखडतील आणि नाही आला तर किमान दोन महिने हे खड्डे टिकू शकतात, असे सा.बां.चे उपविभागीय अधिकारी एस.सी.दंडे यांनी सांगितले. शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक कोंडी, अरूंद रस्ता, अतिक्रमण, बायपास व उड्डाणपुल नसणे आदींमुळे विद्यार्थ्यांपासून ते पोलिसांपर्यंत बळी गेलेले आहेत. ४अपघात झाल्यानंतरच संघटना, पुढारी यांना जाग येते आणि मोर्चे, आंदोलने करतात. ४काही कालावधीनंतर हेच लोक अपघात विसरून जातात आणि जैसे थे परिस्थिती पुन्हा पहावयास मिळते. ४त्यानंतर पुन्हा अपघात झाल्यावर याच संघटना व पुढारी पहिल्यासारखेच करतात. ४प्रशासन ढिम्म तर संघटना थंड असल्याचे चित्र निर्माण झाले आहे़ ४त्यामुळे सामान्यांना खड्ड्यांचा त्रास सहन करावा लागत आहे़