शहरं
Join us  
Trending Stories
1
US-Iran Ceasefire: इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम
2
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
3
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
4
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
5
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
6
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
7
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
8
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
9
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
10
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
11
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
12
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
13
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
14
लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!
15
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
16
आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?
17
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
18
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
19
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
20
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
Daily Top 2Weekly Top 5

बस खड्ड्यात कोसळली

By admin | Updated: June 9, 2014 01:11 IST

पाथरी : पाथरी- उमरा बस उमरा येथून परत येत असताना गुंज गावाजवळ बसचा स्टेरिंग रॉड तुटल्याने रस्त्याच्या बाजूला दहा फूट खोल खड्ड्यात उलटून अपघात घडला.

पाथरी : पाथरी- उमरा बस उमरा येथून परत येत असताना गुंज गावाजवळ बसचा स्टेरिंग रॉड तुटल्याने रस्त्याच्या बाजूला दहा फूट खोल खड्ड्यात उलटून अपघात घडला. या अपघातात २० प्रवासी जखमी झाले असून १२ जणांवर पाथरी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले. ही घटना ८ जून रोजी सकाळी ८.३० वाजेच्या सुमारस घडली. रस्त्यावर खड्डे असल्यामुळे ते चुकविताना हा अपघात घडला.पाथरी आगाराची बस (क्रमांक एम.एच.०६- एक्स ८७९२) सकाळी ७.३० वाजता पाथरीहून उमरा गावाकडे निघाली होती. पाथरी, बाभळगाव, लोणी, गुंज, अंधापुरी, उमरा या मार्गावरुन ही बस उमरा येथून प्रवासी घेऊन परत निघाली. अंधापुरी ते गुंज या रस्त्यावर गुंज जवळील जायकवाडी कॅम्पच्या बाजूला या बसला सकाळी ८.३० वाजता पाथरीकडे परत येत असताना अपघात झाला. गुंज ते अंधापुरी हा रस्ता अत्यंत खराब झाल्याने या रस्त्यावरील खड्डे चुकविताना बसचा अचानक स्टेरिंग रॉड तुटल्याने बस चालकाच्या बाजूने रस्त्याच्या बाजूला १० फूट खोल खड्ड्यामध्ये कोसळली. या बसमध्ये जवळपास ३० प्रवासी होते. अचानक अपघात घडल्याने बसमधील प्रवाशांनी आरडा-ओरड सुरु केली. याचवेळी बसच्या पाठीमागील संकटकालीन खिडकीमधून प्रवासी बाहेर पडले. अपघात घडल्यानंतर या अपघातील २० प्रवाशांना मार लागला. यातील १२ प्रवाशांना गजानन रामकिशन वाघमारे यांनी आपल्या जीपमधून (एम.एच.४४ बी.२७०२) पाथरी येथे उपचारासाठी आणले. येथील ग्रामीण रुग्णालयात जखमी प्रवाशांवर उपचार करण्यात आले. एवढा मोठा अपघात घडल्यानंतरही प्रवाशांना किरकोळ इजा झाल्या. दोन प्रवाशांना मात्र पायाला गंभीर इजा झाली.जखमी प्रवाशांची नावेअपघातात जखमी झालेल्या १२ प्रवाशांवर पाथरी येथील शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात आले. यामध्ये चंपाबाई गणपतराव पायघन (खादगव्हाण ता.माजलगाव) , शेषराव निवृत्ती इघारे (वय ६०, रा.गौडगाव ता.पाथरी), बाबूराव यादवराव कोल्हे (६५ रा.उमरा), चंद्रशेखर नंदकुमार कोल्हे (१८, रा. उमरा), सीमा शिवाजी हजारे (२६ रा. उमरा), गौतम लक्ष्मण जाधव (रा.गौडगाव), धर्मराज किशनराव हजारे (६५ रा.उमरा), नवनाथ शंकर पायघन (१४, रा.खादगव्हाण ता.माजलगाव), हरिभाऊ भिवा शेळके (रा.उमरा), कुसूम शंकरराव पाईकराव (३९, रा.खादगव्हाण ), रमेश मुरलीधर शहाणे (५०, रा.आहेरबोरगाव), रंगनाथ नारायण शिंदे (४१, रा.परभणी यांचा समावेश आहे.पाथरी-उमरा हा रस्ता अत्यंत खराब झाल्याने यापूर्वीही दोन वेळा बसला अपघात झाला होता. खराब रस्त्यामुळे आणि बस नादुरुस्त असल्याने महामंडळाच्या बसमधून प्रवासी प्रवास करताना आता धजावत नाहीत. जखमी झालेल्या काही प्रवाशांनी बस नादुरुस्त असल्याचे सांगितले. दरम्यान, घटना घडल्यानंतर शिवसेनेचे तालुकासंघटक मुंजाभाऊ कोल्हे यांनी घटनास्थळाला भेट देऊन काही जखमी प्रवाशांना गुंज आणि पाथरी येथे उपचारासाठी हलविले. खराब रस्त्यामुळेच हा अपघात घडल्याची तक्रार यावेळी केली.