शहरं
Join us  
Trending Stories
1
उमेदवारी अर्ज मागे घेऊन काँग्रेस उमेदवार भाजपत; तिसऱ्या जागी विजय निश्चित
2
एआयद्वारे फेक व्हिडीओ; अघटित घडविण्याचा डाव; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विराेधकांवर हल्लाबाेल
3
सेक्स स्कँडल : प्रज्वलची पक्षातून हकालपट्टी; माजी पंतप्रधान देवेगौडांचे कुटुंब आरोपांनी घेरले
4
भाजप व रा. स्व. संघाची संविधान बदलण्याची योजना : राहुल गांधी
5
तीन विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी घसरली, तरीही राज ठाकरे महायुतीला का हवे आहेत?
6
पारा वाढता वाढे, देशभरात उकाडा; वाढत्या तापमानाने नागरिक हैराण, राज्यातही उष्णता वाढणार
7
राहुल शेवाळे यांच्या स्थावर मालमत्तेत सात कोटींची वाढ; २०१९'ला स्थावर मालमत्ता नसल्याचे नमूद होते
8
अरविंद सावंत यांच्याकडे एकच कार; संपत्ती पाच वर्षांत दुप्पट
9
अनिल देसाई यांच्या मालमत्तेत पावणेतीन कोटींची वाढ; स्थावर मालमत्तेत वाढ नाही
10
कांद्याची फसवी फाेडणी; सरकारचे शेतमाल निर्यातीचे धाेरण नेहमीच ग्राहकहिताचे
11
मुख्यमंत्री खूप दिवस गैरहजर राहू शकत नाहीत; विद्यार्थ्यांचे हक्क पायदळी तुडवता येणार नाहीत; दिल्ली हायकोर्ट
12
राजन विचारे यांच्या मालमत्तेत ११ कोटींची वाढ; रत्नागिरी जिल्ह्यात शेतजमीन
13
नागपूर विमानतळ उडविण्याची धमकी; ई-मेलनंतर प्रशासन अलर्ट मोडवर; सुरक्षा व्यवस्थेत वाढ
14
‘ठाण्या’चे नाक दाबून तीन मतदारसंघ भाजपने घेतले सोडवून
15
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
16
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
17
भाजप नेते दुष्यंत गौतम यांच्या कारला अपघात, मणक्याला दुखापत
18
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
19
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
20
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे

विद्यापीठाच्या रसायनशास्त्र विभागात नऊ वर्षांत दोनशे विद्यार्थ्यांना ‘जेआरएफ’ शिष्यवृत्ती 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2018 6:17 PM

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या रसायनशास्त्र विभागाने मागील दहा वर्षांपासून संशोधन शिष्यवृत्ती मिळविण्याची यशस्वी परंपरा यावर्षीही राखली आहे.

ठळक मुद्देरसायनशास्त्र विभागाने यावर्षीही राखली यशस्वी परंपराआंतरराष्ट्रीय पातळीवर संशोधनाचा डंका

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या रसायनशास्त्र विभागाने मागील दहा वर्षांपासून संशोधन शिष्यवृत्ती मिळविण्याची यशस्वी परंपरा यावर्षीही राखली आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या सीएसआयआर- राष्ट्रीय पात्रता परीक्षेत (नेट) १३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यातील ९ विद्यार्थ्यांना राष्ट्रीय स्तरावरील ज्युनिअर रिसर्च फेलोशिप जाहीर झाली. मागील नऊ वर्षांत विभागाच्या २०० विद्यार्थ्यांनी ही शिष्यवृत्ती पटकवल्याची माहिती विभागप्रमुख कॅप्टन डॉ. सुरेश गायकवाड यांनी दिली.

नुकत्याच जाहीर झालेल्या सीएसआयआर नेट परीक्षेत विभागातील १३ विद्यार्थ्यांनी यश मिळवले. यात आकाश वाघमारे, स्वाती दिलवाले, अमृता भगत, स्नेहा ठाकूर, गीता खराबे, बालाजी साळुंखे, अरुण कुटे, राधाकिसन खारगुडे, चंद्रकांत जाधव, मोहसील शेख, दीक्षा वाहूळ, सोनी जगदिवे आणि शंकर रेड्डी यांचा समावेश आहे. या विद्यार्थ्यांना डॉ. गायकवाड यांच्यासह डॉ. अंजली राजभोज, डॉ. मच्छिंद्र लांडे, डॉ. सुनील शंकरवार, डॉ. गिरीबाला बोंदले, डॉ. बापूराव शिंगटे, डॉ. भास्कर साठे आणि प्रा. अनुसया चव्हाण यांनी मार्गदर्शन केले. ‘नॅक’ची रंगीत तालीम झाल्यानंतर विभागातर्फे यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात येणार असल्याची माहिती डॉ. गायकवाड यांनी दिली. 

नऊ वर्षांत २१४ विद्यार्थी उत्तीर्ण२०१० पासून रसायनशास्त्र विभागातील तब्बल २१४ विद्यार्थी सीएसआयआर नेट परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत. यातील २०० विद्यार्थ्यांना राष्ट्रीय संशोधन शिष्यवृत्ती प्राप्त झाली. यावेळी राज्य पात्रता परीक्षेतही (सेट) उत्तीर्णतेचा मोठा आकडा आहे. मात्र, राष्ट्रीय स्तरावरची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर देशभरातील कोणत्याही संशोधन संस्थेत संशोधनाची संधी विद्यार्थ्यांना मिळते, यात विभाग राज्यात आघाडीवर असल्याचेही डॉ. गायकवाड यांनी सांगितले.

आंतरराष्ट्रीय पातळीवर संशोधनाचा डंकारसायनशास्त्र विभागातील प्राध्यापकांनी मागील पाच वर्षांत आंतरराष्ट्रीय संशोधन नियतकालिकांमध्ये तब्बल १४५ शोधनिंबध प्रकाशित करीत आंतरराष्ट्रीय पातळीवर डंका वाजविला आहे. यात विशेष म्हणजे ‘केमिकल रिव्हिव्यूज’ या नियतकालिकेत प्रकाशित झालेल्या डॉ. बापू शिंगटे यांच्या शोधनिंबधाचा ‘इम्पॅक्ट फॅक्टर’ हा ५२.६१३ इतका आहे. राज्यातील विद्यापीठांमध्ये सर्वांधिक ‘इम्पॅक्ट फॅक्टर’ असणारा हा शोधनिबंध असल्याचे डॉ. गायकवाड यांनी स्पष्ट केले. सध्या १३ विद्यार्थी प्रतिमहिना २५ ते ३५ हजार रुपयांची शिष्यवृत्ती मिळवून विभागात संशोधन करीत आहेत. तसेच डीएसटी-फिस्टअंतर्गत १ कोटी आणि यूजीसी सॅपअंतर्गत १ कोटी ४० रुपयांचे प्रकल्प विभागात सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

वर्षनिहाय नेट उत्तीर्णांची संख्या २०१०     -२६ २०११     -५२२०१२     -३३ २०१३     -९२०१४     -१५ २०१५     -१९ २०१६    -३४ २०१७     -१३ २०१८     -१३ 

यशात सातत्य...विभागातील प्राध्यापकांची एकजूट, विद्यार्थ्यांप्रती असणारी भावना आणि अतिशय कडकपणे केली जाणारी अंमलबजावणी यामुळे यशात सातत्य टिकून आहे. विभागातील प्राध्यापक रात्री उशिरापर्यंत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतात. तसेच एमएस्सीसाठीचा अभ्यासक्रमही अतिशय महत्त्वपूर्ण असल्यामुळे हे यश मिळत आहे.- कॅप्टन डॉ. सुरेश गायकवाड, विभागप्रमुख, रसायनशास्त्र

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabadडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादEducationशिक्षणStudentविद्यार्थी