शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण : ..तोपर्यंत कुठल्याही राजकारण्याने माझ्या घरी येऊ नये;पीडित मुलीच्या वडिलांनी स्पष्टच सांगितले
2
Devendra Fadnavis : "मुलीच्या वडिलांचे आभार, त्या नराधमाला कायद्याने मृत्युदंडाची शिक्षा द्यायचीय!", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा निर्धार
3
थरार! मुलाला उडवलं अन् वडिलांना २ किमी बोनटवर फरफटत नेलं; हैदराबादमधील 'हिट अँड रन'ने देश हादरला!
4
Video - रीलसाठी पाण्याच्या टाकीवर चढले, शिडी तुटल्याने १६ तास अडकले; एकाचा मृत्यू, २ जखमी
5
पंधराशेच्या बदल्यात लेकींवर अत्याचार करण्याचा अधिकार कुणाला दिलाय का? राऊतांचा सरकारला सवाल
6
Video: अजब शॉट! तिलक वर्माने जोरात फटका मारला अन् चेंडूच्या जागी महागडं घड्याळच उडालं...
7
चेन्नई विमानतळावर थरार! धावत्या विमानातून प्रवाशाची उडी; प्रशासनाची उडाली झोप
8
२ किलो सोनं, १५ हिंस्त्र कुत्रे, १५ गोल्ड लोन खाती; अंथरुणात लपलेल्या मोलकरणीचा पर्दाफाश
9
"पप्पा, जगणं अवघड झालंय...", वडिलांना फोन; न्यायाधीशाने संपवलं आयुष्य, पत्नीवर गंभीर आरोप
10
"देवाभाऊंच्या राज्यात ना लाडकी बहीण सुरक्षित, ना ३-४ वर्षांची बालिका"; काँग्रेसची बोचरी टीका
11
Delhi Vivek Vihar Fire : Video - भीषण अग्नितांडव! "...तर लोकांचा जीव वाचला असता"; प्रत्यक्षदर्शीने सांगितला थरार
12
Mamata Banerjee : राजकारण तापलं! "भाजपा ५००-७०० मतांनी पुढे असेल तर..."; ममता बॅनर्जींचा कार्यकर्त्यांना आदेश
13
"या नराधमाचा हा तिसरा गुन्हा, आधी दोनदा जामीन कसा मिळाला?"; सुप्रिया सुळेंचा यंत्रणेला सवाल
14
दहीवडा खाल्ल्यानंतर उलट्या आणि ताप; २७ मुलांसह ५८ जणांची प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल
15
समोरासमोर आले नागा चैतन्य अन् समंथा? रिसेप्शन पार्टीला आपापल्या पार्टनरसोबत लावली हजेरी
16
Delhi Fire: दिल्लीत अग्नितांडव! एसीचा स्फोट होऊन भीषण आग, ९ जणांचा होरपळून मृत्यू
17
हे काय नवीन? मोस्ट एलिजिबल बॅचलर आदित्य रॉय कपूरला डेट करतीये तारा सुतारिया, चर्चांना उधाण
18
आजचे राशीभविष्य, ०३ मे २०२६: कुंभ, मकर राशीला भाग्याची साथ; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस
19
Nasrapur Case: "अशा विकृत प्रवृत्तीच्या गुन्हेगारांवर..." नसरापूर घटनेवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची संतप्त प्रतिक्रिया
20
"दुनिया हिला देंगे हम!" संघर्षातही मुंबई इंडियन्सने रचला नवा इतिहास; टी-२० विश्वात असा अद्वितीय पराक्रम करणारा पहिला संघ
Daily Top 2Weekly Top 5

ज्वारीचे भाव १३५० रुपयांवर

By admin | Updated: May 17, 2014 01:06 IST

नांदेड : सध्या उन्हाळी ज्वारी काढणीला सुरुवात झाली असून नवामोंढा बाजारात ज्वारीची मोठ्या प्रमाणात आवक सुरु झाली आहे

नांदेड : सध्या उन्हाळी ज्वारी काढणीला सुरुवात झाली असून नवामोंढा बाजारात ज्वारीची मोठ्या प्रमाणात आवक सुरु झाली आहे. मात्र पांढर्‍याशुभ्र असलेल्या ज्वारीला उत्पादन खर्चाच्या तुलनेत अल्प भाव मिळत असल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. वाढत्या खत-बियाणाच्या किमती तसेच निंदणी-खुरपणी, कोळपणी आदी ज्वारीला लागणारा लागवडी खर्च वजा करता शेतकर्‍यांच्या पदरात कडब्याच्या पेंड्याशिवाय काही पडेल की, नाही हे सांगणे कठीण आहे. गत तीन वर्षांपूर्वी नांदेडच्या बाजारात ज्वारीला १८०० रुपये ते २ हजार रुपये प्रतिक्विंटलपर्यंत भाव मिळाला होता, तर टाळकी ज्वारी ३८०० ते ४ हजार रुपयापर्यंत पोहोचली होती. यामुळे ग्राहकांना काही प्रमाणात आर्थिक झळ सोसावी लागली, मात्र शेतकर्‍यांना चांगला दाम मिळाल्याने ज्वारी उत्पादकांना दिलासा मिळाला होता. गतवर्षी ज्वारीचे दर प्रतिक्विंटलपर्यंत १२०० रुपयापर्यंत होते, मात्र केंद्र ़शासनाने जाहीर केलेल्या आधारभूत किमतीत अल्प प्रमाणात वाढ केल्याने यंदा ज्वारीचे भाव १२०० ते १३५० रुपये प्रतिक्विंटलवर आले आहेत. गतवर्षी चांगला पाऊस झाल्यामुळे यंदा भूगर्भातील पाणीपातळी वाढली. यामुळे रबी व उन्हाळी हंगामातील गव्हासह उन्हाळी ज्वारीच्या परेणीक्षेत्रात वाढ झाली. यामुळे मोंढा बाजारात सध्या आवक कमी असली तरी येत्या काही दिवसात वाढेल, परंतु दर वाढण्याची शक्यता कमी दिसते. ( प्रतिनिधी )