जायकवाडी धरण अर्धे भरले!; ४० वर्षांत पहिल्यांदाच विक्रमी आवक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 7, 2019 12:00 PM2019-08-07T12:00:02+5:302019-08-07T12:05:54+5:30

धरणाच्या जलसाठ्यात दर तासाला एक टक्क्याने भर पडली

Jaykwadi dam half full !; Incoming water flow breaks 40 years record | जायकवाडी धरण अर्धे भरले!; ४० वर्षांत पहिल्यांदाच विक्रमी आवक

जायकवाडी धरण अर्धे भरले!; ४० वर्षांत पहिल्यांदाच विक्रमी आवक

googlenewsNext
ठळक मुद्दे२,३५,१९५ क्युसेक क्षमतेने आवक नांदूर-मधमेश्वरसह भंडारदराचेही पाणी दाखल 

पैठण (औरंगाबाद ) : जायकवाडी धरणात मोठ्या क्षमतेने पाण्याची आवक  होत असल्याने गेल्या १२ तासांत जायकवाडी धरणाच्या जलसाठ्यात तब्बल १३.२५ टीएमसीने भर पडली आहे. १२ तासांच्या कालावधीत १३.२५ टीएमसीची झालेली वाढ हा एक विक्रम असून, गेल्या ४० वर्षांत अशी विक्रमी वाढ झालेली नाही. सोमवारी सायंकाळी ७ वाजता धरणात उपयुक्त जलसाठा १९.८८ टीएमसी एवढा होता. मंगळवारी सायंकाळी ७ वा. उपयुक्त जलसाठा  ३३.१३ टीएमसी झाला होता. २८ जुलै रोजी धरणाचा जलसाठा (उणे १०.४३%) एवढा होता. मंगळवारी ५0% झाला आहे. २८ जुलै ते ८ आॅगस्ट १0 दिवसांत जलसाठ्यात ५४.४३% वाढ झाली हाही  विक्रमच आहे, अशी माहिती कार्यकारी अभियंता राजेंद्र काळे यांनी दिली.

नांदूर-मधमेश्वर धरणातून ४ आॅगस्ट रोजी सोडण्यात आलेला २,९४,००० क्युसेकचा महत्तम विसर्ग मंगळवारी दुपारी जायकवाडी धरणात २,३५,१९५ क्युसेक क्षमतेने दाखल झाला. सोबतच भंडारदरा धरणातून सोडलेले पाणीही सकाळी नाथसागरात दाखल झाल्याने आज दुपारनंतर जायकवाडी धरणाच्या जलसाठ्यात दर तासाला एक टक्क्याने भर पडत होती. सायंकाळी ६ वा. धरणाचा जलसाठा ४४ टक्क्यांहून अधिक झाला होता. 
नाशिक जिल्ह्यात गेल्या २४ तासांत पावसाचा जोर मंदावल्याने आज तेथील धरणांतून होणारा विसर्ग मोठ्या प्रमाणावर घटविण्यात आला. मंगळवारी दारणा १३२४, गंगापूर ८९७३, करंजवन ३५५०, पालखेड १५९६६, कडवा ३०३८ व वालदेवी धरणातून ४१७७ क्युसेकपर्यंत विसर्ग कमी करण्यात आला होता. नांदूर-मधमेश्वर वेअरमधून गोदावरी पात्रात होणारा विसर्ग मंगळवारी दुपारी ३ वाजता ६६२९६ क्युसेकपर्यंत घटविण्यात आला. यामुळे गोदावरीची पाणीपातळी झपाट्याने कमी होत असून, सोडलेले पाणी पात्रातच समाविष्ट होत असल्याने पूरग्रस्त भागाला दिलासा मिळाला आहे.

४ आॅगस्ट रोजी नांदूर-मधमेश्वर धरणातून सोडलेला महत्तम विसर्ग मंगळवारी दुपारनंतर जायकवाडी धरणात दाखल होण्यास प्रारंभ झाला. नांदूर मधमेश्वर धरणातून सोडलेला हा विसर्ग सोमवारी सायंकाळच्या सुमारास धरणात दाखल होईल, अशी अपेक्षा जायकवाडी प्रशासनास होती. मात्र, प्रत्यक्षात हा विसर्ग जायकवाडीस तब्बल १० तास उशिरा मिळाल्याने जायकवाडीचे अभियंता याबाबत वास्तविक परिस्थितीचा आढावा घेत होते.   
 सकाळी ७ वाजता धरणात १४८६३३ क्युसेकने आवक सुरू होती. दुपारी १२ वाजता १६१७०१ क्युसेक, तर दुपारी २ वाजता २,०५,७९६ क्युसेक आवक झाली. सायंकाळी ४ वाजता आवक आणखी वाढून ती २,४९,९०० क्युसेक एवढी झाली यामुळे धरणातील जलसाठ्यात गतीने वाढ झाली.
दरम्यान, जायकवाडी धरणात येणारी २,३५,१९५ क्युसेकची आवक लक्षात घेता जायकवाडी धरणाचा जलसाठा मंगळवारी मध्यरात्री २ ते ३ वाजेदरम्यान ५०% होईल, असे जायकवाडीचे कार्यकारी अभियंता राजेंद्र काळे यांनी सांगितले, तसेच गोदावरी पात्रात होणारा विसर्ग जवळपास २ लाख क्युसेकने कमी झाल्याने गोदावरीचा महापूर कमी होणार आहे. जायकवाडी धरणातील आवक लक्षात घेता दरतासाला पाणीपातळीत १% भर पडत असल्याचे धरण नियंत्रण कक्षातून सहायक अभियंता संदीप राठोड, धरण अभियंता बुद्धभूषण दाभाडे, आर.ई. चक्रे, राजाराम गायकवाड, बबन बोधणे, आदींनी सांगितले.

निळवंडेचा विसर्ग दाखल
अहमदनगर जिल्ह्यातील भंडारदरा ९५.०४% व निळवंडे धरण ८७.३२% भरले आहे. त्यातच गेल्या २४ तासांत भंडारदरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात १२५ मि.मी. पावसाची सोमवारी नोंद झाल्याने भंडारदरा धरणातून सोमवारपासून विसर्ग करण्यात येत आहे. मंगळवारी भंडारदरा धरणातून ३४,०६० क्युसेक विसर्ग निळवंडेत करण्यात येत होता. निळवंडेतून ओझरवेअरमध्ये ९,१८० क्युसेक व ओझरवेअरमधून प्रवरेच्या पात्रात १७,१८८ क्युसेक विसर्ग करण्यात येत आहे. हे पाणी सकाळी ९ वाजता प्रवरासंगम येथे येऊन गोदावरीला मिळाले.

दर तासाला टक्क्याची भर
गोदावरीच्या महापुराचे पाणी मोठ्या क्षमतेने आज जायकवाडीत दाखल झाल्याने जलसाठ्यात दरतासाला १ टक्क्याने भर पडत होती. सायंकाळी ६ वा धरणात २,२०,५०० क्युसेक, अशी आवक होत होती. १,५२२ फूट जलक्षमता असलेल्या धरणाची पाणीपातळी ६ वा १,५०९.७७ फूट झाली होती. धरणात एकूण जलसाठा १,६७६.३९४ दलघमी ( ५९.१९ टीएमसी) झाला होता. यापैकी ९३८.२८८ दलघमी (३३.१३ टीएमसी) जिवंत साठा आहे. 

निळवंडेचा विसर्ग दाखल
अहमदनगर जिल्ह्यातील भंडारदरा ९५.०४% व निळवंडे धरण ८७.३२% भरले आहे. त्यातच गेल्या २४ तासांत भंडारदरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात १२५ मि.मी. पावसाची सोमवारी नोंद झाल्याने भंडारदरा धरणातून सोमवारपासून विसर्ग करण्यात येत आहे. मंगळवारी भंडारदरा धरणातून ३४,०६० क्युसेक विसर्ग निळवंडेत करण्यात येत होता. निळवंडेतून ओझरवेअरमध्ये ९,१८० क्युसेक व ओझरवेअरमधून प्रवरेच्या पात्रात १७,१८८ क्युसेक विसर्ग करण्यात येत आहे. हे पाणी सकाळी ९ वाजता प्रवरासंगम येथे येऊन गोदावरीला मिळाले.

जलसाठ्यात मंगळवारी अशी वाढ झाली
सकाळी ११     ३६.३५%
दुपारी १२     ३७.११%
दुपारी १     ३७.८७%
दुपारी २     ३८.८७%
दुपारी ४     ४१.०८%
संध्या. ५      ४२.१८%
संध्या. ६    ४३.२२%
रात्री  ७    ४४.१३%
रात्री  ८    ४५.0५%
रात्री  ९    ४५.९७%
रात्री  १0    ४६.८९%
रात्री ११    ४७.७९%
रात्री १२    ४८.७९%
रात्री १    ४९.५५%
रात्री २    ५०.५०%

नांदूर-मधमेश्वरचा विसर्ग असा घटविला
सकाळी १० वा  -     १,००,२८९ क्युसेक
सकाळी ११ वा  -      १,००,२८९ क्युसेक
दुपारी    १२ वा  -     १,००,००० क्युसेक
दुपारी    ०१ वा   -    ९५,०९२ क्युसेक
दुपारी    ०२ वा   -    ७०,९६२ क्युसेक
दुपारी    ०३ वा   -     ६६,२९६ क्युसेक

Web Title: Jaykwadi dam half full !; Incoming water flow breaks 40 years record

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.