शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
2
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
3
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीड जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
4
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
5
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
6
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
7
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
8
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
9
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
10
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
11
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
12
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
13
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
14
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
15
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
16
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
17
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
18
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
19
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
20
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
Daily Top 2Weekly Top 5

जय़़़ जय़़़ जय़़़ जय शिवाजी !

By admin | Updated: February 20, 2015 00:08 IST

लातूर : दुचाकी, तिचाकी व चारचाकीला बांधलेले भगवे झेंडे़़़ शे-दीडशे नव्हे तर मनात शिवभक्तीची ज्योत घेऊन, सहभागी झालेल्या चार हजार दुचाकीस्वारांची फौज़़़

लातूर : दुचाकी, तिचाकी व चारचाकीला बांधलेले भगवे झेंडे़़़ शे-दीडशे नव्हे तर मनात शिवभक्तीची ज्योत घेऊन, सहभागी झालेल्या चार हजार दुचाकीस्वारांची फौज़़़ आणि त्यांची निघालेली ऐतिहासिक रॅली़़़ रॅलीचे पहिले टोक शिवाजी चौकात तर शेवटचे टोक गुळ मार्केट परिसरात़़़ सोबतीला सळसळणाऱ्या तरुण रक्ताने मुखातून बेहोश होऊन दिलेल्या घोषणा़़़ जय़़़ जय़़़ जय़़़ जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी, छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा नानाविध घोषणांनी गुरुवारी शिवजयंती निमित्त लातूर नगरी दुमदुमून गेली होती़ सारा आसमंत दुमदुमलाहोता़ जणू लातुरात शिवशाही अवतरली होती, असे चित्र दिसत होते़ विविध संस्था, संघटना, सामाजिक कार्यकर्त्यांच्या सहभागातून वेगवेगळ्या दोन रॅली काढण्यात आल्या़ सिद्धेश्वर चौक व क्रीडा संकुलातून निघालेल्या या रॅलींचा मिलाफ शिवाजी चौकात झाला़ भव्य अशा सामुहिक रॅलीत याचे रुपांतर झाले़ पहिले टोक शिवाजी चौकात तर दुसरे टोक गुळ मार्केट परिसरात, अशी ही भव्य रॅली शिवाजी चौकातून, आंबेडर पार्क, गांधी चौक, सुभाष चौक, गंजगोलाई, सराफ लाईन, शाहू चौक, आंबेडकर चौक आणि विवेकानंद चौकातून बालाजी मंदिरापर्यंत ही रॅली गेली़ बालाजी मंदिर येथे अभिषेक केल्यानंतर परत शिवाजी चौकात ही रॅली आली़ सकाळी १० वाजता निघालेली रॅली दुपारी १ वाजता परत शिवाजी चौकात पोहचली़ यावेळी या रॅलीचा समारोप करण्यात आला़ मनोज डोंगरे, श्रीकांत रांजणकर, संतोष पांचाळ, अ‍ॅडग़णेश गोमचाळे, पवन जोशी, अमोल जमादार, सुनील काळे, श्रीकृष्ण माळी, अजय राठोड, मंगेश तिडके, राहूल अंधारे, नितीन लोखंडे, अ‍ॅडग़ोपाळ गुडगुडे, अमोल माने, चंद्रकांत बगडे, बालाजी निकम, राजकुमार सूर्यवंशी, बालाजी सूर्यवंशी, रवी सौदागर, योगेश स्वामी, सागर घोलप, प्रशांत गजभार, नितीन शिंदे, सतिष भोसले, विशाल दीक्षित, विजय कुलकर्णी, पांडुरंग क्षिरसागर, अक्षय नाईक, बालाजी रांजणकर आदींसह शेकडो कार्यकर्ते रॅलीमध्ये सहभागी झाले होते़ शिवाजी चौकात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास विविध संस्था, संघटनांच्या वतीने अभिवादन करण्यात आले़ खा़डॉ़सुनिल गायकवाड, आ़ अमित देशमुख, महापौर अख्तर मिस्त्री, उपमहापौर कैलास कांबळे, मोईज शेख, व्यंकट बेद्रे, संजय बनसोडे, नवनाथ अल्टे, सुपर्ण जगताप, शिवाजी कांबळे, माजी आ़ वैजनाथ शिंदे, पप्पु देशमुख, पापा कावळे, पप्पु धोत्रे, सुधीर धुपेकर, सत्यशील सावंत, लक्ष्मीकांत जोगदंड, अजित चिकलीकर, विठ्ठल तळेकर आदींसह शेकडो कार्यकर्त्यांनी शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले़ जल्लोषपूर्ण वातावरणात छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करण्यात आली़ शिवजयंती निमित्त बाळू पॉर्इंट मित्रमंडळाच्या वतीने गुरुवारी घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात ४१ जणांनी रक्तदान केले़ तर वीरयोद्धा संघटनेच्या वतीने घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात ६७ जणांनी रक्तदान केले़ रक्तदानाची ही परंपरा कायम ठेवत शहरातील क्रीडा संकुल, राजीव गांधी चौक, शिवाजी चौक, या मार्गाने प्रबोधनात्मक रॅली काढली़ढोल-ताशांच्या गजरात रॅली जात असताना चौका-चौकात पुष्पवृष्टीने स्वागत करण्यात आले़ रॅली आयोजकांचे शिवाजी चौकात स्वागत करण्यात आले़ ४खाडगाव रोड, दयानंद गेट, हत्ते नगर कॉर्नर, खोरी गल्ली परिसर, रेणापूर नाका, बसवेश्वर चौकात शिवरायांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले़ ४शहरातील सर्वच रस्त्यांवर तसेच मुख्य रस्त्यांच्या दुभाजकामध्ये भगवे ध्वज लावण्यात आले होते़ सारे शहरच भगवेमय झाले होते़ खाडगाव रोड येथे झालेल्या जयंतीत सिने अभिनेते सचिन दानाई यांनी उपस्थितांना शिवचरित्र उलगडून सांगितले़ शिवाजी चौकात बाळु पॉर्इंट मित्र मंडळाच्या वतीने किल्ल्याची प्रतिकृती तयार केली होती़ शिवजयंती निमित्त या किल्ल्याचे आकर्षण लहान मुलांना होते़ शिवरायांना अभिवादन केल्यानंतर या किल्ल्याची प्रतिकृती पाहण्यासाठी गर्दी झाली होती़ गेल्या दोन दिवसांपासून शिवाजी चौकात बाळू पॉर्इंट मित्र मंडळाच्या कार्यकर्त्यांनी किल्ल्याची प्रतिकृती तयार करण्यासाठी परिश्रम घेतले होते़ आ़अमित देशमुख, खा़डॉ़सुनिल गायकवाड यांनी किल्ल्याची प्रतिकृती पाहून कार्यकर्त्यांचे कौतुक केले़ बालाजी रांजणकर, रवी सौदागर, साईराज पवार, सतिष भोसले, भिमराव सातपुते, सुहास बेद्रे, योगेश स्वामी, दत्ता सुंकरवार, नितीन शिंदे, सागर घोलप,कुणाल सातपुते, अक्षय नाईक, विशाल दीक्षित, मनीष जैस्वाल, विजय कुलकर्णी, वैभव तामटे, कुमार बावगे, विशाल गिरी, नागेश चिकलीकर, शंकर सुरवसे आदींनी परिश्रम घेतले़ महाराष्ट्र विद्यार्थी गर्जना संघटनेच्या वतीने सामाजिक कार्यकर्त्यांचा रॅली दरम्यान पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला़ बसवेश्वर चौकात सेवालयाचे रवी बापटले यांना शिवभूषण पुरस्कार तर उजेड येथील शरद येडले यांना शिक्षकरत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात आले़ रेणापूर येथील दिवंगत बालाजी माले यांच्या मातोश्री सुशिलाबाई बापूराव माले यांना राष्ट्रमाता जिजाऊ पुरस्कार देऊन गौरविण्यात आले़