शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

इटोलीत बिबट्या जेरबंद

By admin | Updated: July 28, 2014 00:53 IST

संतोष दाभेकर, इटोली जिंतूर तालुक्यातील इटोली परिसरात २७ जुलै रोजी दुपारी बिबट्यास वन कर्मचाऱ्यांनी गावकऱ्यांच्या मदतीने जेरबंद केले. मागील काही दिवसांपासून या भागात बिबट्या असल्याची चर्चा होती.

संतोष दाभेकर, इटोलीजिंतूर तालुक्यातील इटोली परिसरात २७ जुलै रोजी दुपारी बिबट्यास वन कर्मचाऱ्यांनी गावकऱ्यांच्या मदतीने जेरबंद केले. मागील काही दिवसांपासून या भागात बिबट्या असल्याची चर्चा होती. इटोली हा परिसर डोंगराळ आणि जंगल असलेला भाग आहे. पूर्णा नदीकडेला मोठी वनराई आहे. याच भागात अनेकांची शेतीही आहे. या भागात एक बिबट्या असल्याची चर्चा मागील काही दिवसांपासून शेतकऱ्यांत होती. काही शेतकऱ्यांनी बिबट्याला पाहिले असल्याचेही सांगितले. याच दरम्यानच्या काळात एका शेतकऱ्याच्या गायीचे तीन वासरे आणि दोन दिवसांपूर्वी डिग्रस येथील शेतकऱ्याच्या वासरु बिबट्याने फस्त केले होते.२७ जुलै रोजी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास येथील शेतकरी कलंदर भाई यांच्या शेतातील आखाड्यावर बिबट्या असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. कलंदर भाई यांनी लगेच वन विभागाला ही माहिती दिली. दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास वन विभागाचे शेख महेबूब, एफ.ए. अन्सारी, एस.जे. हाश्मी, जी.एल. घुगे हे इटोली येथे दाखल झाले. दुपारी १२ वाजेपासून पकडण्यासाठी प्रयत्न सुरू होते. दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास वन विभागाच्या अधिकाऱ्यांना बछड्याला पकडण्यात यश आले. गावकऱ्यांच्या मदतीने बिबट्याला जेरबंद करण्यात आले. दरम्यान, सायंकाळच्या सुमारास वन विभागाचे शेख महेबूब, एफ.ए. अन्सारी, एस.जे. हाश्मी, जी.एल. घुगे आणि एच.यु. वाळके यांनी बिबट्याला परभणीकडे नेले. दरम्यान बिबट्याला पकडण्यासाठी गजानन टाले, देवीदास हजारे, बळवंते, उत्तम आढे यांच्यासह गावकऱ्यांनी सहकार्य केले.वर्षभरापूर्वी सापडला होता बिबट्या इटोली परिसरातील निलज भागात एक वर्षापूर्वी पूर्णा नदीच्या कडेला एक बिबट्या मृतावस्थेत आढळला होता. त्यामुळे या भागात बिबट्या असल्याची भीती शेतकऱ्यांमध्ये तेव्हापासून आहे. अजूनही एक बिबट्या जंगलात असावा, असे गावकऱ्यांचे म्हणणे आहे.बिबट्याचे वयइटोली परिसरात जेरबंद केलेला हा बिबट्या सहा महिने ते एक वर्षे वयाचा असावा, अशी माहिती वन विभागाच्या वतीने देण्यात आली.