पैसे दे बाईक ने; उसने पैसे परत मिळविण्यासाठी बाईक हिसकावणे पडले महागात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2021 19:12 IST2021-02-03T19:07:00+5:302021-02-03T19:12:27+5:30

पैसे देत नाही तोपर्यंत दुचाकी मिळणार नाही, असे आरोपीने तक्रारदाराला सांगितले.

It was expensive to snatch the bike to get the money back | पैसे दे बाईक ने; उसने पैसे परत मिळविण्यासाठी बाईक हिसकावणे पडले महागात

पैसे दे बाईक ने; उसने पैसे परत मिळविण्यासाठी बाईक हिसकावणे पडले महागात

ठळक मुद्देतक्रारदाराने आरोपीकडून काही रक्कम घेतली होतीउसनी रक्कम परत न मिळाल्याने आरोपीने बाईक ताब्यात घेतली

औरंगाबाद : उसने दिलेले पैसे परत न करणारा वाहनचालक भेटल्यावर त्याची दुचाकी हिसकावून नेणे एकाला चांगलेच महागात पडले. याप्रकरणी क्रांतीचौक पोलिसांनी त्याला अटक केली. ही घटना समर्थनगर रोडवर १ फेब्रुवारी रोजी दुपारी घडली. दलासिंग सलामपुरे (रा. बेगमपुरा), असे आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी सांगितले की, सिल्लोड येथील कचरू मुकुंद नागरे हे वाहनचालक आहेत. त्यांनी आरोपी सलामपुरेकडून काही रक्कम उसनी घेतली होती. तेव्हापासून ते सलामपुरेला भेटत नव्हते. दरम्यान, १ फेब्रुवारी रोजी दुपारी नागरे हे दुचाकीवरून समर्थनगर येथे रस्त्यावरून जात असताना आरोपीने त्यांच्याकडे पैशांची मागणी केली. यावेळी त्यांच्यात वादावादी झाली. यानंतर नागरे दुचाकीवरून सिल्लेखान्याकडे जाऊ लागले. तेव्हा आरोपीने त्यांना अडवून मारहाण केली आणि त्यांची दुचाकी हिसकावून नेली.

पैसे देत नाही तोपर्यंत दुचाकी मिळणार नाही, असे त्याने तक्रारदाराला सांगितले. या घटनेनंतर नागरे यांनी क्रांतीचौक पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपी सलामपुरे यास अटक केली. त्याच्याकडून नागरे यांची दुचाकी जप्त केली. पोलीस उपनिरीक्षक सोनवणे या घटनेचा तपास करत आहेत.
 

Web Title: It was expensive to snatch the bike to get the money back