बजाजनगरात ४० हजार लुटणाऱ्या दोघा संशयितांची रेखाचित्रे जारी

By Admin | Updated: September 10, 2014 00:52 IST2014-09-10T00:28:44+5:302014-09-10T00:52:36+5:30

वाळूज महानगर : बजाजनगरात एका ट्रान्स्पोर्ट कंपनीतील कर्मचाऱ्यास मारहाण करून ४० हजार रुपये लुटणाऱ्या दोघा संशयितांची रेखाचित्रे आज एमआयडीसी वाळूज पोलिसांनी जारी केली.

Issue drawings of two suspects who were looting 40 thousand in Bajajnagar | बजाजनगरात ४० हजार लुटणाऱ्या दोघा संशयितांची रेखाचित्रे जारी

बजाजनगरात ४० हजार लुटणाऱ्या दोघा संशयितांची रेखाचित्रे जारी

वाळूज महानगर : बजाजनगरात एका ट्रान्स्पोर्ट कंपनीतील कर्मचाऱ्यास मारहाण करून ४० हजार रुपये लुटणाऱ्या दोघा संशयितांची रेखाचित्रे आज एमआयडीसी वाळूज पोलिसांनी जारी केली.
बजाजनगरातील शेफ कॅरिअर अँड लॉजिस्टिक याट्रान्स्पोर्ट कार्यालयातील कर्मचारी दीपक रामअवतार शर्मा (२२, रा. सिडको वाळूज महानगर) हे ३ जुलै रोजी दुचाकी क्रमांक एमआर-१६, बी-०७५२ वर स्वार होऊन लगतच्या स्टेट बँक आॅफ इंडियात रोख रक्कम भरण्यासाठी चालले होते. यावेळी दुचाकीवरून पाठलाग करणाऱ्या दोघा लुटारूंनी शर्मा यांची दुचाकी दुपारी ३ वाजेच्या सुमारास बिटको ट्रान्स्पोर्टजवळ अडविली. यातील एका दरोडेखोराने शर्मा यांचे तोंड व गुप्तांग दाबून धरले, तर दुसऱ्याने त्यांच्या जवळील रोख ४० हजार रुपये हिसकावून पळ काढला होता. या झटापटीत एका दरोडेखोराच्या खिशातील नामदेव कदम या नावाचे व्हिजिटिंग कार्ड रस्त्यावर पडले होते. या कार्डावरून दरोडेखोरांचा शोध एमआयडीसी पोलिसांनी घेतला होता. मात्र, आरोपीचा शोध लावण्यात पोलिसांना यश आले नव्हते. दरम्यान, दीपक शर्मा हे बँकेत रोख रक्कम भरण्यासाठी बँकेत गेले होते. त्यावेळी या दोघा संशयित आरोपींनी त्यांच्याशी गोडी-गुलाबीने चर्चा करून त्यांच्याविषयी माहिती जाणून घेतली होती. दुपारी बँक बंद झाल्याने शर्मा मी थोड्या वेळात बँकेत येतो असे म्हणून निघून गेले होते. या दोघांनी पाळत ठेवून त्यांचे ४० हजार रुपये लुटले होते. बँकेतील सीसीटीव्ही फुटेजमध्ये हे दोन्ही आरोपी दिसत असून त्यांचा शोध घेण्यासाठी एमआयडीसी वाळूज पोलिसांनी त्यांची रेखाचित्रे आज जारी केली.

Web Title: Issue drawings of two suspects who were looting 40 thousand in Bajajnagar