शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

शेती औजारांसाठी लाकडाऐवजी लोखंडाचा वापर

By admin | Updated: June 9, 2014 01:13 IST

मदन बियाणी , कनेरगाव नाका दिवसेंदिवस जंगले नष्ट होत असल्याने खेड्यापाड्यात शेतीसाठी वापरली जाणारी लाकडी अवजारे दुर्मिळ होत चालली आहेत.

मदन बियाणी , कनेरगाव नाकादिवसेंदिवस जंगले नष्ट होत असल्याने खेड्यापाड्यात शेतीसाठी वापरली जाणारी लाकडी अवजारे दुर्मिळ होत चालली आहेत. त्यांची जागा आता लोखंडी अवजारांनी घेतल्याचे चित्र असून सुतारांच्या व्यवसायावर संकट आले आहे. सध्या खरिपाच्या पेरणीची लगबग चालू झालेली असली तरी सुताराकडे शेतीऔजारे बनविण्याचे काम कमी झाल्याचे दिसत आहे. आपल्याकडच्या सामाजिक व्यवस्थेत बारा बलुतेदारांना महत्वाचे स्थान होते. संपूर्ण जनजीवन या बलुतेदारांभोवती फिरायचे. वस्तूंची देवाणघेवाण होऊन व्यवहार व्हायचे. बलुतेदार पिढ्यानपिढ्या तोच व्यवसाय करायचे. सुतार, लोहार, चांभार, कुंभार, सोनार अशा बलुतेदारांच्या अनेक पिढ्यांनी त्यांंच्या कामाबरोबरच एक कलाही जोपासली, वाढविली आहे. विकासाच्या ओघात काही बलुतेदारांनी इतर शिक्षण घेऊन, पारंपारिक शिक्षण घेऊन अन्य मार्ग पत्करले आहेत. मात्र बहुतांश सुतार व्यावसायिक समाज आजही आपल्या पारंपारिक कलेवर उपजीविका करीत आहेत. शेतकऱ्याला आवश्यक असणारी अवजारे बनविणे व दुरूस्ती करण्याचे काम सुतार या बलुतेदाराकडे असे. शेतीसाठी लागणारे नांगर, पाभर, तिफण, वखर, बैलगाडी इत्यादी अवजारे सुतार बनवित असे. प्राचीन काळी मंदिरे ही लाकडाची बनवली जात असत. एवढेच नाहीतर देवमूर्तीही लाकडाच्या असायच्या. कालांतराने लाकडी मंदिरे मागे पडली असली तरी सुतारकामाचे महत्व संपले नाही फर्निचर आणि लाकडी मूर्ती, शिल्पे यांच्यापुरताच मर्र्यादित राहिल्याचे चित्र आहे. अलीकडच्या काळात सुताार व्यवसाय हा परंपरागत बैलगाड्या, नांंगर, लाकडी चाके अदृश्य होऊ लागली आहेत. औद्योगिक क्रांतीचा हा एक अपरिहार्य परिणाम आहे. कनेरगावनाका परिसरात बाभूळ, साग, शिसव, सादोडा, धामोडी असे विविध प्रकारचे वृक्ष मोठ्या प्रमाणात होते. मात्र इमारतीचे बांधकाम, फर्निचर तसेच जळतनासाठी वृक्षतोड झाल्याने परिसर नाहीसा झाला आहे. विशेष म्हणजे या भागातून वाहणाऱ्या पैनगंगना नदीच्या काठावर असलेल्या कनेरगावनाका, पारडा परिसरात एके काळी धावंड्याची अनेक झाडे होती. या लाकडांचा उष्मांक चांगला असल्याने त्याचा सर्वाधिक वापर जळतनासाठी केला जातो. अशाप्रकारे बहुपयोगी ठरणारी वनसंपदा नष्ट होत आहे. तसेच सरकारी गायरान जमिनी शेतीसाठी वापरात आणल्या जात आहेत. त्यामुळे लाकूड मिळेनासे झाले. बहुसंख्य शेतकरी लोखंडी अवजारांकडे वळले असल्याने सुतारांच्या व्यवसायावर अवकळा आली आहे.