शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

गुंतवणूकदार त्रस्त

By admin | Updated: July 29, 2014 01:12 IST

आंबा चोंढी : वसमत तालुक्यातील चोंढी या छोट्याशा गावातही केबीसी कंपनीचे तीन एजंट कार्यरत होते.

आंबा चोंढी : वसमत तालुक्यातील चोंढी या छोट्याशा गावातही केबीसी कंपनीचे तीन एजंट कार्यरत होते. त्यांनी अनेकांना गंडविले असून गुंतवणूकदार अडचणीत आले तरी एजंट मात्र सुरक्षित असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. सुरूवातीला एक वर्षाच्या हप्त्यानंतर मुद्दल रक्कम परत मिळायची व पुन्हा तेवढीच रक्कम व्याज म्हणून एकेक वर्षाच्या अंतराने मिळत होती. त्यामुळे एका पुढारी असलेल्या एजंटाने सुरूवातीला नातेवाईक व नंतर मित्रमंडळींना गाठून त्यांच्याकडून ८६ हजारांची रक्कम घेतली. तीन समान हप्त्यात ती परतही केली होती. संबंधित मंडळी हॉटेलमध्ये बसून पाच-पाच लाख रुपये लोकांना वाटप करायचे. त्यामुळे लोकांचा विश्वास वाढला. या भागातील ६८० जणांनी गुंतवणूक केली. दुसरा एजंट तालुक्याच्या ठिकाणी राहून दोन्ही लाईनमध्ये ७५६ ग्राहक त्याच्या गळाला लागले. त्यामुळे सदर एजंटाचे मासिक कमिशन ६० हजारांच्या पुढे गेले. या दोन्ही एजंटांची कामगिरी पाहून तिसरा एजंटही ‘हम भी कुछ कम नहीं’ अशा गर्वामुळे हळदीचे कुकर भाड्याने देता देता हाही धंदा जोमात करायला लागला. त्यामुळे या एजंटाना लाखो रुपयांत खेळण्याची सवय लागली. मागील महिन्यात केबीसी कंपनीने गाशा गुंडाळताच या एजंटांची झोप उडाली. मात्र तक्रार कुणीही दिलेली नसल्याने गुंतवणूकदारच फसले आहेत. (वार्ताहर)