शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

गैरहजर कर्मचाऱ्यांची चौकशी

By admin | Updated: April 21, 2016 00:58 IST

ढोकी : उस्मानाबाद तालुक्यातील ढोकी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचा गोंधळी कारभार ‘लोकमत’ने स्टिंग आॅपरेशनच्या माध्यमातून चव्हाट्यावर आणला होता.

ढोकी : उस्मानाबाद तालुक्यातील ढोकी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचा गोंधळी कारभार ‘लोकमत’ने स्टिंग आॅपरेशनच्या माध्यमातून चव्हाट्यावर आणला होता. याची दखल घेत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. फुलारी यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. चौकशीअंती जे कोणी दोषी आढळून येतील, त्यांच्याविरूद्ध कारवाई केली जाणार आहे.ढोकी आरोग्य केंद्रात अपघातग्रस्तांसह सातत्याने रूग्णांची वर्दळ असते. ही बाब लक्षात घेवून आरोग्य यंत्रणेकडून येथे तीन डॉक्टरांसह वीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. परंतु, एवढ्या मोठ्या प्रमाणात यंत्रणा असून रूग्णांना उत्तम सेवा मिळत नसल्याबाबत सातत्याने ओरड होत आहे. मंगळवारी तर कर्मचाऱ्यांनी कहरच केला. वीस पैकी अवघे दोनच कर्मचारी उपस्थत होते. कार्यालयालाही कुलूप लावले होते. रूग्णालाच्या दरवाजावरच ‘डॉक्टर सुटीवर आहेत’, असा फलक लावण्यात आला होता. त्यामुळे येथे येणाऱ्या ग्रामीण रूग्णांना फलक बघूनच खाजगी दवाखान्याचा रस्ता धरावा लागला. तर काही रूग्णांनी उस्मानाबाद येथील जिल्हा रूग्णालय गाठले. हा गोंधळी कारभार ‘लोकमत’ने स्टिंग आॅपरेशनच्या माध्यमातून चव्हाट्यावर आणला. दरम्यान, सदरील वृत्त प्रकाशित होताच खडबडून जाग्या झालेल्या आरोग्य विभागाने ढोकी आरोग्य केंद्रातील गोंधळी कारभाराच्या चौकशीचे आदेश काढले आहेत. त्यानुसार तालुकास्तरीय अधिकाऱ्यांनी बुधवारी एका कर्मचाऱ्यास ढोकी केंद्रावर पाठवून सर्व कर्मचाऱ्यांचे म्हणणे लेखी स्वरूपात घेतले आहे. सदरील म्हणणे प्राप्त झाल्यानंतर त्याची शहानिशा करण्यात येणार आहे. या माध्यमातून दोषी आढळून येणाऱ्या कर्मचाऱ्यांविरूद्ध कठोर कारवाई केली जाईल, असे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. फुलारी यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. (वार्ताहर)