शहरं
Join us  
Trending Stories
1
पक्ष विलीन करा अन् विधान परिषदेची आमदारकी घ्या; शिंदेसेनेची बच्चू कडूंना अट, निर्णयाकडे लक्ष
2
Train waiting Ticket Rules: ट्रेनचं कोणतं तिकीट सर्वात पहिले होतं कन्फर्म? GNWL आणि PQWL चा काय आहे अर्थ?
3
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२६: मेष आणि धनु राशीला आर्थिक लाभ, 'या' राशीनं राहावं सावध!
4
चीन-पाकिस्तानची धडधड वाढली! होर्मुझची सामुद्रधुनीतून पुरवठा बंद; तेल आणि गॅससाठी दोन्ही देश अडचणीत
5
दात तुटला, डोळाही सुजला..., इन्फ्लुएन्सरच्या मित्राकडून अभिनेत्रीला मारहाण, नक्की काय घडलं?
6
इंडोनेशियातील भयंकर घटना! रेल्वे स्थानकावर उभ्या असलेल्या ट्रेनला एक्सप्रेसची धडक, ४ ठार
7
Hingoli Earthquake: वसमत तालुक्यात भूकंपाचे सत्र सुरूच; एकाच महिन्यात चौथ्या धक्क्याने नागरिक धास्तावले!
8
'पद पाहिजे? मग माझ्यासोबत झोप, नाहीतर...', भाजपा नेत्याने दिली ऑफर, महिलेचा गंभीर आरोप
9
शिकाऊ डॉक्टरांच्या हलगर्जीमुळे बाळाचा मृत्यू?; आईची भोईवाडा पोलिसांत तक्रार, कारवाईची मागणी
10
परवडणारी घरे गेली कुठे? मुंबईकरांची ‘म्हाडा’कडे पाठ; आतापर्यंत २,६४० घरांसाठी आले ४५,८१० अर्ज
11
आधी मैत्री अन् मग लग्नाचं आमिष दाखवून आर्किटेक्ट महिलेवर अत्याचार; BMC सहायक आयुक्ताला अटक
12
कुजबुज! लोकप्रिय व्यक्तिमत्व डॉ. अभिजित बिचुकलेंना विधान परिषदेवर संधी द्यावी, शिंदेंकडे मागणी
13
महामार्गांवरील वाहतूक चिन्हांचे आता होणार ऑडिट; आयआयटी रुरकीची नेमणूक प्रस्तावित
14
फरार ‘मार्क’सोबत जियाचे जॉइंट अकाउंट; पोलिस कोठडीत वाढ, १४.९५ लाख ड्रग्ज विक्रीचे?
15
भाईंदरपाड्यात सुरक्षा रक्षक, गावकऱ्यांत हाणामारी; १२ गुंठे जमिनीवरून पेटला वाद, सरनाईकांवर आरोप
16
अखेरच्या व्हिडिओ कॉलवर कृष्णानं वडिलांना सांगितले; ‘पप्पा, मी येतोय’...पण तो आलाच नाही
17
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
18
रात्रीत सर्व संपलं...उरला फक्त चपलांचा खच; स्मशानशांतता अन् बाजारातून कलिंगड गायब
19
ड्रेनेजच्या सफाईमुळे हत्याकांडाचा उलगडा! ३ महिन्यांपूर्वी बहिणीची हत्या करणारा आरोपी भाऊ अटकेत
20
‘सुपर एल निनो’च्या उंबरठ्यावर! १५० वर्षांपूर्वीसारखी महाप्रलयंकारी स्थिती निर्माण होण्याची भीती
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेना इच्छुकांच्याही मुंबईत मुलाखती

By admin | Updated: September 17, 2014 00:26 IST

नांदेड : नांदेड दक्षिण आणि उत्तर विधानसभा मतदारसंघात शिवसेनेच्या उमेदवारासाठी माजी खासदार सुभाष वानखेडे, माजी आमदार अनुसयाताई खेडकर यांच्यासह दोन्ही जिल्हाप्रमुख मैदानात उतरले आहेत़

नांदेड : नांदेड दक्षिण आणि उत्तर विधानसभा मतदारसंघात शिवसेनेच्या उमेदवारासाठी माजी खासदार सुभाष वानखेडे, माजी आमदार अनुसयाताई खेडकर यांच्यासह दोन्ही जिल्हाप्रमुख मैदानात उतरले आहेत़ सेनेच्या उमेदवारीसाठी मातोश्रीवर मुलाखती सुरू असून नांदेडातील इच्छुक उमेदवार व त्यांचे समर्थक मुंबईत तळ ठोकून आहेत़ विधानसभा निवडणुकीत शिवसेनेकडून इच्छुकांची संख्या वाढतच चालल्याचे दिसत आहे़ त्याचवेळी यातील अनेक इच्छुकांकडून आपली बाजू कशी वरचढ आहे, हे दाखविण्यासाठी इतरांच्या कमकुवत बाजू पक्षापुढे ठेवल्या जात आहेत़ त्याचवेळी स्पर्धकांचा मागील निवडणुकातील परफॉरमन्स पक्षप्रमुखांपुढे ठेवला जात आहे़ नांदेड उत्तर मतदारसंघातून माजी खासदार वानखेडे, माजी आमदार श्रीमती खेडकर यांच्यासह जिल्हाप्रमुख प्रकाश कौडगे, माजी महापौर सुधाकर पांढरे, बंडू खेडकर यांनी उमेदवारी मागितली आहे़ त्याचवेळी डॉ़ सुनील कदम यांच्याकडूनही उत्तरेतील उमेदवारीसाठी प्रयत्न केले जात आहेत़ नांदेड दक्षिणमध्ये २००९ च्या विधानसभा निवडणुकीत पराभव पत्करावे लागलेले सेनेचे जिल्हाप्रमुख हेमंत पाटील, मनपातील विरोधी पक्षनेते दीपक रावत, जिल्हा परिषद सदस्या वच्छलाताई पुयड, बालाजी पुयड, बाळू खोमणे यांनी मुलाखत देवून उमेदवारीसाठी दावा केला आहे़ त्यात विष्णूपुरी येथील डॉ़ संतुकराव हंबर्डे यांनीही ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत उडी घेताना शिवसेनेचा शिवबंध धागा मनगटावर बांधला आहे़ त्यांचे नावही नांदेड दक्षिण मतदारसंघातील उमेदवारीसाठी पुढे आले आहे़ वच्छलाताई पुयड यांच्यासह बालाजी पुयड यांच्याशी उमेदवारीसाठी स्पर्धा करताना आता आणखी एक स्पर्धक शिवसेनेचे जिल्हाप्रमुख हेमंत पाटील यांच्यापुढे उभा राहिला आहे़ शैक्षणिक क्षेत्राशी संबंधित डॉ़ हंबर्डे यांच्या सेना प्रवेशाने सेनेतील उमेदवारीची स्पर्धा चुरशीची झाली आहे़दरम्यान, विद्यापीठात उपकुलसचिव असलेले हंबर्डे यांच्या सेना प्रवेशाबाबत कुलगुरू डॉ़ विद्यासागर म्हणाले, त्यांनी निवडणूक लढविण्याबाबत परवानगी मागणारे पत्र विद्यापीठाला दिले आहे़ याबाबत शासनाकडून मार्गदर्शन मागविले आहे़ (प्रतिनिधी)