संदीप जगताप यांना आंतरराष्ट्रीय शिखर पुरस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:12 IST2021-02-05T04:12:09+5:302021-02-05T04:12:09+5:30
औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे क्रीडा मंडळ सदस्य तसेच फुलंब्री येथील श्रीसंत सावता माळी ग्रामीण महाविद्यालयाचे क्रीडाविभाग ...

संदीप जगताप यांना आंतरराष्ट्रीय शिखर पुरस्कार
औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे क्रीडा मंडळ सदस्य तसेच फुलंब्री येथील श्रीसंत सावता माळी ग्रामीण महाविद्यालयाचे क्रीडाविभाग प्रमुख डॉ. संदीप जगन्नाथ जगताप यांना क्रीडा व शारीरिक शिक्षण क्षेत्रामध्ये केलेल्या संशोधनाबद्दल प्रजासत्ताकदिनी आंतरराष्ट्रीय शिखर पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
व्हर्चुअल माध्यमातून एनटायर रीसर्च आंतरराष्ट्रीय कमिटीतर्फे विविध देशांतील शारीरिक शिक्षण क्रीडा व विविध विषयांतील संशोधन करणाऱ्या ३७ प्राध्यापक व शिक्षकांना प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी आंतरराष्ट्रीय शिखर पुरस्कार प्रदान करण्यात आला. यामध्ये डॉ. जगताप यांनी अनेक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर क्रीडा विषयात संशोधन पेपर प्रकाशित केले आहेत. हा पुरस्कार अयोध्या विद्यापीठाचे माजी कुलगुरू प्रा. मनोज दीक्षित, युनिव्हर्सिटी ऑफ जयेवरदेणेपूराचे (श्रीलंका) प्रा. डॉ. प्रियंथी गुणसेना, योग इन्स्टिट्यूट लोणावळ्याचे डॉ. मीनानाथ घरोटे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. हा कार्यक्रम डॉ. बलवंत सिंग यांनी आयोजित केला होता.