संस्थाचालकाचा प्रताप; बनावट कागदपत्रांच्या आधारे उचलले ४ कोटी ९४ लाखांचे कर्ज

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2026 18:52 IST2026-03-27T18:52:07+5:302026-03-27T18:52:31+5:30

संस्थाचालक मजहर खान, अस्मा खानचा प्रताप : सिटीचौक ठाण्यात गुन्हा दाखल

Institutional leader's arrogance; Loan of 4 crore 94 lakhs taken on the basis of fake documents | संस्थाचालकाचा प्रताप; बनावट कागदपत्रांच्या आधारे उचलले ४ कोटी ९४ लाखांचे कर्ज

संस्थाचालकाचा प्रताप; बनावट कागदपत्रांच्या आधारे उचलले ४ कोटी ९४ लाखांचे कर्ज

छत्रपती संभाजीनगर : खुलताबाद येथील कोहिनूर शिक्षण संस्थेचा वादग्रस्त अध्यक्ष मजहर खान आणि सचिव अस्मा मजहर खानच्या विरोधात बनावट कागदपत्रांच्या आधारे धर्मादाय आयुक्त कार्यालयाची परवानगी न घेताच संस्थेची मालमत्ता गहाण ठेऊन ४ कोटी ९४ लाख २० हजार ३९९ रुपयांचे कर्ज घेतले. हे कर्ज संस्थेच्या बँक खात्यातून स्वत:च्या खात्यात वळती केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी दोघांसह इतरांच्या विरोधात सिटी चौक ठाण्यात बुधवारी गुन्हा नोंदविला आहे.

सिटीचौक ठाण्यात झेबा इद्रीस खान यांच्या तक्रारीनुसार कोहिनूर शिक्षण संस्थेची स्थापना त्यांचे वडील इद्रीस खान यांनी १९९२ साली केलेली असून, संस्थेतर्फे दोन महाविद्यालये चालविण्यात येतात. फिर्यादीसह त्यांचे पती मोहसीन अन्वर खान हे अजीव सभासद आहेत. या संस्थेच्या मालमत्तेवर बनावट कागदपत्रांच्या आधारे ४ कोटी ९४ लाख २० हजार ३९९ रुपये कर्ज मंजूर करून स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी वापरल्याची तक्रार २४ नोव्हेंबर २०२५ रोजी पोलिस आयुक्तांकडे केली होती. या तक्रारीच्या चौकशीमध्ये मजहर खान व अस्मा खान यानी चोला मंडलम इनव्हेस्टमेंटकडून मौजे बादलाबाई गट नंबर २१ मधील ५५ आर जमीन गहाण खत ठेऊन २ कोटी ९४ लाख २० हजार ३९९ रुपये आणि प्रोफेक्ट्स कॅपिटल प्रा.लि. कंपनीकडे मौजे बादलाबाई गट नंबर २० मधील १ हेक्टर ३५ आर व मौजे नांद्राबाद गट नंबर-३९ मधील १ हेक्टर २१ आर एवढी मालमत्ता गहाण खत करून देत २ कोटी रुपयांचे कर्ज उचलले. त्यासाठी धर्मदाय आयुक्त कार्यालयाचा बनावट सही, शिक्यांचा वापर केला. दोन्ही संस्थांकडून कर्ज घेण्यासाठीही धर्मदाय कार्यालयाची मंजुरी घेतली नाही. त्याशिवाय घेतलेले कर्ज संस्थेच्या बँक खात्यातून स्वत:च्या खात्यात वर्ग केले. यात संस्थेसह धर्मादाय कार्यालयाचीही फसवणूक केल्याचे म्हटले आहे. अधिक तपास गुन्हे शाखेचे वरिष्ठ निरीक्षक संभाजी पवार करीत आहेत.

मजहर खानच्या विरोधात १२ गुन्हे
संस्थाचालक मजहर खान यांच्या विरोधात या गुन्ह्यासह आतापर्यंत विविध ठिकाणी १२ गुन्हे दाखल आहेत. त्यात सर्वाधिक फसवणुकीचे गुन्हे आहेत. बनावट पदव्यांच्या प्रकरणात कर्नाटकातील बंगळुरू, उत्तर प्रदेशातील जौनपूर, शहरातील बेगमपुरा ठाण्यात गुन्हा नोंद आहे. या सगळ्या प्रकरणात मजहरला अटक केलेली आहे. त्याशिवाय एमआयडीसी सिडको, खुलताबाद, सिटीचौक, हर्सुल, क्रांती चौक ठाण्यातही गुन्हा नोंद आहे.

सध्या जौनपुरच्या कारागृहात मुक्काम
जौनपूर येथील एका महाविद्यालयाची बनावट पदवी तयार करून बार कौन्सिल ऑफ इंडियाचे सदस्यत्व मिळविले होते. या प्रकरणात सर्वोच्च न्यायलयाने जामीन फेटाळल्यानंतर मजहर खानने आत्मसमर्पण केले आहे. त्यानुसार सध्या मजहर खानचा मुक्काम हा जौनपूर येथील कार्यालयात असल्याची माहिती संबंधितांनी दिली.

Web Title : ट्रस्टी का घोटाला: फर्जी दस्तावेजों से ₹4.94 करोड़ का ऋण प्राप्त किया

Web Summary : छत्रपति संभाजीनगर में एक कोहिनूर शिक्षा सोसायटी के अधिकारी पर जाली दस्तावेजों का उपयोग करके ₹4.94 करोड़ की धोखाधड़ी से प्राप्त करने और धन को व्यक्तिगत लाभ के लिए निकालने का आरोप है। पुलिस ने ट्रस्टी के खिलाफ मामला दर्ज किया है, जिस पर पहले से ही धोखाधड़ी सहित 12 अन्य आपराधिक आरोप हैं।

Web Title : Trustee's Fraud: ₹4.94 Crore Loan Secured with Fake Documents

Web Summary : A Kohinoor education society official in Chhatrapati Sambhajinagar is accused of fraudulently obtaining ₹4.94 crore using forged documents and diverting the funds for personal gain. Police have registered a case against the trustee, who already faces 12 other criminal charges, including fraud.