शहरं
Join us  
Trending Stories
1
आईच्या नावाने मुलाला ओळखणार, कागदपत्रांवर मातेचे नाव लागणार! सर्व शाळांमध्ये एकच नियम लागू
2
Watermelon Death Case Mumbai : कलिंगडामुळे मृत्यू नाही! FDA अहवालाने संभ्रम मिटला; मुंबईतील 'त्या' ४ जणांच्या मृत्यूचे गूढ कायम
3
बरगी धरणात देवदूत धावले! स्वतःचा जीव धोक्यात घालून कामगारांनी वाचवले डझनभर प्राण; मुख्यमंत्र्यांनी बक्षीस केले जाहीर
4
IPL 2026 Playoffs Race: पुढचं पुढं बघू, आधी CSK चा बदला घेऊ! याच इराद्याने चेपॉकच्या मैदानात उतरेल MI
5
Post Office Scheme : सोन्यासारखी आहे पोस्ट ऑफिसची 'ही' स्कीम; ₹१ लाख जमा करा, मिळेल ₹४५,००० चं व्याज
6
युद्धामुळे तेलाच्या दराचा भडका! सर्वाधिक फटका भारताला, पेट्रोल-डिझेलच्या किमतींचा ‘टाइम बॉम्ब’
7
‘त्या’ मृतांपैकी एकाच्या अवयवाचा रंग हिरवट; खरे कारण अहवाल आल्यानंतर कळणार?
8
बोट बुडू लागली तेव्हा आतमध्ये काय घडलं? लाईफ जॅकेट कुठे होते? दुर्घटनेच्या व्हिडीओत दिसलं असं काही
9
साडेतीन वर्षांच्या बालिकेचा लैंगिक अत्याचार करून खून; नराधमास ताब्यात द्या, ग्रामस्थ संतप्त, महामार्ग दोन तास रोखला
10
कमर्शियल LPG दरवाढीचा हॉटेल उद्योगाला जोरदार फटका; खाद्यपदार्थांचे दर १५ टक्क्यांपर्यंत वाढण्याची शक्यता
11
भारतीय उद्योगांना चीनचा विळखा; इलेक्ट्रॉनिक, रसायने, औषध क्षेत्र संकटात येण्याची भीती
12
"इराणला अण्वस्त्रे देऊ नका, ते क्षणातच विध्वंस घडवतील", ट्रम्प यांनी 'नाटो'ला केलं सावध!
13
ईव्हीएममध्ये फेरफार केल्याच्या आरोप; बंगालमधील १५ मतदान केंद्रांवर फेरमतदान सुरू
14
आजचे राशीभविष्य - २ मे २०२६, आर्थिक, सामाजिक व कौटुंबिक क्षेत्रांत लाभ होतील, कुटुंबात सुख-शांती नांदेल
15
ट्रम्प चिडले, पण फेमस झाल्या जॉर्जिया मेलोनी! तरुणाई तर त्यांच्यामागे खंबीरपणे उभी राहिली
16
मुंबईत ‘ऑपरेशन व्हाइट स्ट्राइक’, १,७४५ कोटींचे अमली पदार्थ जप्त; ३४९ किलो कोकेनही हस्तगत
17
IPL 2026 : वैभव-यशस्वी सुपरहिट जोडीचा फ्लॉप शो! तरी RR निर्धास्त; KL राहुलच्या खेळीने DC ला दिलासा
18
महामुंबईत सायकल ट्रॅकचा ‘ट्रॅक’च हरवला!, सायकल आहे, पण चालवायची कुठे?; कोट्यवधींचा खर्च वाया
19
पेट्रोल-डिझेल दरवाढ उंबरठ्यावर?; व्यावसायिक गॅस सिलिंडरही महागले, निवडणुका आटोपताच तगडा झटका
Daily Top 2Weekly Top 5

नगराध्यक्षांना कर्मचाऱ्यांचा घेराव

By admin | Updated: June 17, 2014 01:13 IST

तुळजापूर : पगार मिळत नसल्याने संतप्त झालेल्या कर्मचाऱ्यांनी सोमवारी लेखणीबंद आंदोलन केले.

तुळजापूर : मागील १४ महिन्यांपासून नगर परिषदेच्या रोजंदारी कर्मचाऱ्यांना पगार मिळत नसल्याने संतप्त झालेल्या कर्मचाऱ्यांनी सोमवारी लेखणीबंद आंदोलन करुन प्रभारी नगराध्यक्ष गणेश कदम यांना घेराव घातला. यामुळे काहीकाळ कार्यालयीन कामकाज ठप्प झाले होते.नगराध्यक्ष गणेश कदम यांनी संतप्त कर्मचाऱ्यांना शांत करुन त्यांची कैफियत जाणून घेतली. यावेळी ५४ कर्मचाऱ्यांनी मागील १४ महिन्यापासून पगार मिळत नसल्याने आमची उपासमार होत असल्याचे सांगितले. सर्व प्रकारची विनंती, न्यायालय आदेश देवूनही आम्हास पगारापासून वंचित ठेवले जात आहे. आजपासून शाळा सुरु झाल्या असून, मुलांना वह्या, पुस्तके तसेच गणवेश घेण्यासही आमच्याकडे पैसे नाहीत. त्यामुळे पाल्यांचे शैक्षणिक नुकसान होईल, तरी आम्हास तात्काळ वेतन द्यावे, अशी मागणीही यावेळी कर्मचाऱ्यांनी केली.यावर नगराध्यक्ष कदम यांनी मुख्याधिकारी दोन दिवस रजेवर असल्याने आपण आंदोलन स्थगित करावे. मुख्याधिकारी येताच दोन दिवसात २ महिन्यांचे वेतन निश्चित अदा करु, असे आश्वासन दिल्यानंतर रोजंदारी कर्मचाऱ्यांनी घेराव काढून आंदोलन मागे घेतले. या वेतनासंदर्भात भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. निवेदनात जिल्हाधिकारी यांनी दुसरे स्मरणपत्र देऊनही व उच्च न्यायालयाने आदेश देऊनही नगर परिषदेने कर्मचाऱ्यांना वेतन न दिल्याने रोजंदारी कर्मचाऱ्यांनी सदर आंदोलन केल्याचे नमूद करण्यात आले आहे. (वार्ताहर)