एकतर्फी प्रेमातून तरुणीस अमानुष मारहाण, सिल्लोड भराडी रस्त्यावरील घटना..

By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2023 08:42 PM2023-08-01T20:42:27+5:302023-08-01T20:42:36+5:30

मारहाणीचा व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे.

Inhuman beating of young woman due to one-sided love, incident on Sillod Bharadi road | एकतर्फी प्रेमातून तरुणीस अमानुष मारहाण, सिल्लोड भराडी रस्त्यावरील घटना..

एकतर्फी प्रेमातून तरुणीस अमानुष मारहाण, सिल्लोड भराडी रस्त्यावरील घटना..

googlenewsNext

श्यामकुमार पुरे
सिल्लोड: तरुणीचे दुसऱ्याशी प्रेम असल्याच्या संशयावरून  एकतर्फी प्रेम करणाऱ्या रोडरोमिओने तिला एकदा मला भेटायला ये असे म्हणून बोलावले अन् अमानुषपणे बदडले. ही घटना सिल्लोड शहरातील भराडी सिल्लोड रस्त्यावर एका मोकळ्या जागेत रविवारी दुपारी घडली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. सदर मुलगी २० वर्षाची तर तो मुलगा २७ वर्षाचा आहे.

सिल्लोड तालुक्यातील वसई येथील ही मुलगी तर बोदवड येथील हा मुलगा असून रविवारी हा प्रकार घडला. मारहाण करतानाचा व्हिडीओ रस्त्याने जाणाऱ्या कुणीतरी शूट केला व सोशल मीडियावर व्हायरल केला. सोमवारी  सिल्लोड शहर पोलिसांनी याची चौकशी केली असता ते वरील गावचे राहणार असल्याचे कळाले. त्यानंतर सोमवारी त्या दोघा मुला-मुलींना सिल्लोड शहर पोलीस ठाण्यात बोलावले पण आम्ही एकमेकांना केवळ ओळखतो त्याचे माझ्यावर एकतर्फी प्रेम आहे, त्याला माझ्यावर संशय आला त्यावरून त्याने मला मारहाण केल्याचे तरुणीने सांगितले. तसेच, समाजात बदनामी होईल असे म्हणून त्या मुलीने पोलिसांना तक्रार न घेण्यास सांगितले. पोलीस निरीक्षक शेषराव उदार यांनी ही माहिती दिली.

तक्रार नाही पण आम्ही कार्यवाही करणार...
सदर मुलीने समाजात बदनामी होईल या भीतीने तक्रार नसल्याचे लेखी दिले आहे, मात्र सार्वजनिक ठिकानी त्याने केलेल्या कृत्यामुळे आम्ही या प्रकरणी त्या मुलावर  प्रतिबंधात्मक कार्यवाही करणार आहोत.- शेषराव उदार पोलीस निरीक्षक सिल्लोड शहर.

Web Title: Inhuman beating of young woman due to one-sided love, incident on Sillod Bharadi road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.