कुख्यात हेल्मेट उर्फ विक्की सोनकांबळेची पोलिसाला मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2018 14:14 IST2018-09-24T14:14:15+5:302018-09-24T14:14:51+5:30

पोलिसांच्या रेकॉर्डवरील सराईत गुंड हेल्मेट उर्फ विक्की गौतम सोनकांबळे याला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसाला त्याने फायटरने मारहाण केली.

The infamous Helmmet aka Vicky sonkanbale attacks on policemen | कुख्यात हेल्मेट उर्फ विक्की सोनकांबळेची पोलिसाला मारहाण

कुख्यात हेल्मेट उर्फ विक्की सोनकांबळेची पोलिसाला मारहाण

औरंगाबाद : पोलिसांच्या रेकॉर्डवरील सराईत गुंड हेल्मेट उर्फ विक्की गौतम सोनकांबळे याला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसाला त्याने फायटरने मारहाण केली. ही  खळबळजनक घटना मुकुंदवाडी परिसरातील संतोषीमातानगर येथील विसर्जन विहिरीवर २३सप्टेंबर रोजी दुपारी घडली. याप्रकरणी मुकुंदवाडी ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला.

पोलिसांनी सांगितले की, मुकुंदवाडी ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस नाईक गोकुळ जाधव आणि  कर्मचारी रविवारी दुपारी संतोषीमातानगर येथील गणेश विसर्जन विहिर येथे कर्तव्यावर होते. त्यावेळी आरोपी विक्की उर्फ हेल्मेट हा विहिरीच्या कठड्यावर चढत असल्याचे त्यांना दिसले. त्यावेळी पोलिसांनी त्याला कठड्यावर चढण्यास विरोध केल्याने तो त्यांच्यासोबत हुज्जत घालून अरेरावी करू लागला. 

पोलिसांनी त्यास बाजूला घेतले आणि याबाबतची माहिती पोलीस निरीक्षक नाथा जाधव यांना देऊन गाडी पाठविण्याचे सांगितले. याचा राग आल्याने आरोपीने  नाईक गोकुळ जाधव यांना शिवीगाळ करून त्यांच्यावर अचानक फायटरने हल्लाच चढविला. यावेळी अन्य पोलिसांनी हेल्मेटला पकडून बाजूला केले. या झटापटीत गोकुळ यांच्या अंगावरील युनिफॉर्म फाटला. त्यानंतर त्याला पोलीस वाहनातून ठाण्यात पाठविले. आरोपीला पोलीस ठाण्यातील एका रूममध्ये ठेवल्यानंतर त्याने पोलिसाना शिवीगाळ करीत तेथील कप-बशीवर डोकं आपटून घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. 

Web Title: The infamous Helmmet aka Vicky sonkanbale attacks on policemen