शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
2
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
3
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
4
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
5
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
6
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
7
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
8
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
9
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
10
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
11
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
12
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
13
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
14
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
15
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
16
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
17
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
18
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
19
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
20
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
Daily Top 2Weekly Top 5

तब्बल अडीच वर्षांनंतर कळाले अपात्र उमेदवार

By admin | Updated: November 25, 2014 01:00 IST

औरंगाबाद : सहायक कुलसचिवाच्या ४ जागांपैकी खुल्या प्रवर्गातून २ पुरुष व १ महिला, तर विमुक्त भटक्या जमातीच्या १ जागेसाठी अर्ज मागविण्यात आले होते

औरंगाबाद : सहायक कुलसचिवाच्या ४ जागांपैकी खुल्या प्रवर्गातून २ पुरुष व १ महिला, तर विमुक्त भटक्या जमातीच्या १ जागेसाठी अर्ज मागविण्यात आले होते. त्यासाठी खुल्या प्रवर्गातून ४९ व विमुक्त भटक्या प्रवर्गातून १५ उमेदवारांनी अर्ज केले होते. या दोन्ही पदांसाठी आवश्यक शैक्षणिक अर्हता, अनुभवाची खातरजमा न करता विद्यापीठ प्रशासनाने या सर्व उमेदवारांची २० नोव्हेंबर २०१३ रोजी लेखी परीक्षा घेतली. त्यानंतर २३ व २४ डिसेंबर २०१३ रोजी मुलाखतीचा कार्यक्रम आयोजित केला. तेव्हा त्यातील काही उमेदवारांनी मुलाखत कार्यक्रमावरच आक्षेप घेतला. त्यामुळे तत्कालीन कुलगुरू डॉ. विजय पांढरीपांडे यांनी मुलाखतीचा कार्यक्रम स्थगित केला. त्यामुळे काही जणांनी न्यायालयात धाव घेतली. महिनाभरापूर्वी न्यायालयाने निर्णय दिला की, एकतर ही जाहिरातच रद्द करावी किंवा दोन्ही पदांसाठी प्राप्त अर्जांची सक्षम छाननी समितीमार्फत पडताळणी करावी. जे पात्र उमेदवार असतील त्यांच्या मुलाखती घेतल्या जाव्यात. त्यानुसार विद्यमान कुलगुरू डॉ. बी.ए. चोपडे यांच्या आदेशानुसार विद्यापीठ प्रशासन प्रमुख कुलसचिव डॉ. धनराज माने यांनी आज २४ व उद्या २५ नोव्हेंबर रोजी मुलाखतीचा कार्यक्रम आयोजित केला. त्यासाठी कॅप्टन डॉ. सुरेश गायकवाड, डॉ. साधना पांडे, डॉ. सतीश पाटील यांची एक सक्षम छाननी समिती स्थापन केली. छाननी समितीने आज सकाळी ११ ते १२.३० वाजेपर्यंत उपकुलसचिव पदासाठी प्राप्त सर्व अर्जांची छाननी केली, तेव्हा या पदासाठी एकही पात्र उमेदवार नसल्याचा अभिप्राय कुलगुरूंना दिला. दुसरीकडे मुलाखत समितीचे सचिव डॉ. धनराज माने, व्यवस्थापन समितीचे ज्येष्ठ सदस्य डॉ. शिवाजी मदन, प्राचार्य डॉ. दत्तात्रय आघाव, राज्यपालांचे प्रतिनिधी उल्हास उढाण, शासनाचे प्रतिनिधी डॉ. गुप्ता हे मुलाखतीसाठी विद्यापीठात उमेदवारांची प्रतीक्षा करीत बसले होते.तेव्हा कुलगुरू डॉ. चोपडे यांनी उपकुलसचिव पदासाठी एकही पात्र उमेदवार नसल्याचे सांगून आजच्या मुलाखती रद्द केल्या. त्यामुळे मुलाखत समितीमधील सदस्यांना दुपारी १.३० वाजेपर्यंत ताटकळत बसावे लागले.